Join us

अगदी १० रुपयांत घरीच करा हेअर स्पा; ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन महागडे स्पा केल्यासारखे चमकतील केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2024 10:20 IST

Do Hair Spa At Home In Less Than Rs. 10 : घरच्या घरी सोप्या स्टेप्समध्ये करा हेअर स्पा; पार्लरसारखे सुंदर केस अगदी घरच्या-घरी..

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन अधिक खर्च करतो. हेअर कट, हेअर स्पा यासह विविध केसांवर ट्रिटमेण्ट घेतो. पण बऱ्याचदा केसांवर ट्रिटमेण्ट घेताना केस खराब होण्याची शक्यता वाढते. कधी-कधी महागडे हेअर स्पा करूनही केसांवर हवा तसा फरक दिसून येत नाही. किंवा केसांचे अधिक नुकसान होते. ब्यूटी पार्लरमध्ये खर्च करण्यापेक्षा आपण घरातच हेअर स्पा करू शकता (Hair Care Tips).

घरगुती हेअर स्पा केल्याने केसांचे नुकसान होत नाही. शिवाय केस सिल्की-स्मूथ आणि शाईन करतील (Hair Spa). आपण हेअर स्पा करण्यासाठी अळशीच्या बियांचा वापर करू शकता. यामुळे केस लांबसडक, दाट आणि शाईन करतील(Do Hair Spa At Home In Less Than Rs. 10).

केसांसाठी अळशीच्या बियांचे फायदे

अळशीच्या बियांमुळे केस लांबसडक व जाड होतात. त्यात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर आणि प्रोटीन यासारख्या पोषणतत्त्वांची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केसांना याचा पुरेपूर फायदा होतो.

चमचाभर गव्हाच्या पिठाची पाहा जादू; टॅनिंग-सुरकुत्या होतील दूर; चेहरा दिसेल इतका टवटवीत की...

घरगुती हेअर स्पा करण्यासाठी लागणारं साहित्य

अळशीच्या बिया

दही

खोबरेल तेल

या पद्धतीने तयार करा हेअर स्पा जेल

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात दोन चमचे अळशीच्या बिया घाला. मध्यम आचेवर अळशीच्या बिया १० मिनिटांसाठी शिजवून घ्या. १० मिनिटानंतर जेल तयार होईल, व तयार जेल गाळणीने गाळून बिया वेगळे करा. तयार जेलमध्ये २ चमचे दही, २ चमचे खोबरेल तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. अशा प्रकारे अळशीच्या बियांचा हेअर स्पा जेल वापरण्यासाठी रेडी.

अशा पद्धतीने करा हेअर स्पा

केस गळून भांग रुंद होत चालला आहे? स्काल्पवर लावा एक खास प्रकारचे पाणी; निरोगी केसांचं रहस्य

सर्वप्रथम, केस विंचरून घ्या. तयार जेल मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत लावा. नंतर थोड्या वेळासाठी हाताने स्काल्पवर मसाज करा. २० मिनिटांसाठी जेल तसेच केसांवर ठेवा. २० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. अशा प्रकारे घरातच केसांचा हेअर स्पा होईल. कमी पैश्यात काही मिनिटात नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून हेअर स्पा होईल. आपण हे घरगुती हेअर स्पा महिन्यातून २ वेळा करू शकता.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स