एखाद फंक्शन किंवा काही खास प्रसंग, कार्यक्रम, समारंभ असला की हमखास आपण पार्लर गाठतो. पार्लरमध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या हेअर (DIY The perfect Balloon Curl) स्टाईल करतो. केसांच्या हेअर स्टाईल (How to Curl hair with a Balloon) करण्यात सगळ्यात बेसिक आणि कॉमन केले जाणारे प्रकार म्हणजे स्ट्रेटनिंग आणि कर्ल्स. एखाद्या खास फंक्शनसाठी आपण किमान २ ते ३ दिवस राहतील असे इन्स्टंट स्ट्रेटनिंग किंवा कर्ल्स करून घेतो. या हेअर स्टाईल केसांवर पुढील २ ते ३ दिवस राहतात. त्यानंतर मात्र आपले केस आधी होते तसेच होतात(Balloon Heatless Curls for Curly Hairstyle).
केसांना कर्ल्स करण्यासाठी आपण एकतर कर्ल्स मशीनचा वापर करतो किंवा थेट पार्लरमध्ये जातो. परंतु केसांसाठी वारंवार असे हीटिंग टूल्स वापरणे केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. याचबरोबर, पार्लरमध्ये अशा हेअर ट्रिटमेंट करण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात, तसेच या हेअर ट्रिटमेंट्स करण्यासाठी अनेक केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा (How to Make Balloon Curls Really Easily) वापर केला जातो. यासाठीच, आपण घरच्याघरीच केसांचे कर्ल्स करण्यासाठी चक्क फुग्यांचा वापर करु शकतो... होय! फुगेच.... फुगवलेल्या फुग्यांचा वापर करून आपण अगदी तासाभरात केसांना पार्लरसारखा कर्ल्स लुक्स देऊ शकतो. फुग्यांचा वापर करून घरच्याघरीच केसांना कार्ल्स करण्याची सोपी व भन्नाट ट्रिक पाहूयात.
फुग्यांचा वापर करून केस करा पार्लर सारखे कर्ल्स...
पार्लरमध्ये जाऊन केसांसाठी महागडी व केमिकल्सयुक्त कर्ल्स ट्रिटमेंट करण्यापेक्षा आपण घरच्याघरीच फुग्यांचा वापर करून केस कर्ल्स करु शकतो. अशा भन्नाट ट्रिकने केस कर्ल्स करण्यासाठीची पद्धत इंस्टाग्रामवरील theriaaminnn या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.
चेहरा धुण्यासाठी केमिकल्सयुक्त फेसवॉशपेक्षा वापरा 'हे' ६ पदार्थ, त्वचेला मिळतील अनेक फायदे...
केस घरच्याघरीच कर्ल्स करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत भरपूर फुगे. परंतु हे फुगे आपल्या नेहमीच्या फुग्यांसारखे गोलाकार फुगणारे नसून लांबलचक फुगणारे असे हवेत.
केस कर्ल्स करण्यासाठी सर्वातआधी आपल्या केसांच्या लांबीनुसार किती फुगे लागतील याचा अंदाज घेऊन तितके फुगे आधीच फुगवून घ्यावेत. आता हे फुगवलेले फुगे घेऊन त्याभोवती केसांच्या छोट्या छोट्या बटा घेऊन गोल गोल गुंडाळून घ्याव्यात. या फुग्याभोवती केस गुंडाळून झाल्यावर मग फुग्याला गाठ मारून घ्यावी.
चेहऱ्याला बेसन लावताना दुधात कालवावे की दह्यात? बघा नक्की काय लावल्याने चमकतो चेहरा...
त्यानंतर रात्रभर किंवा किमान ४ ते ५ तास हे फुगे केसांवर असेच लावून ठेवावे. मग काही तासानंतर हे फुगे चक्क फोडून घ्यावेत. त्यानंतर केस पाहिले तर आपले केस पार्लर सारखेच परफेक्ट कर्ल्स झालेले असतील. अशा पद्धतीने केस कर्ल्स करण्यासाठी आपल्याला नाही कोणते सिरम किंवा नाही कोणत्या हीटिंग टूल्सची गरज भासणार. अशा प्रकारे कोणत्याही ब्यूटी प्रॉडक्ट्स किंवा हीटिंग टूल्सचा वापर न करता देखील आपण पार्लरसाखरा कर्ल्स लूक घरच्याघरीच स्वस्तात करु शकतो. आहे की नाही स्वस्त आणि मस्त देसी जुगाड...