Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > २० रुपयांत केस होतील काळेभोर! तव्यावर 'या' पद्धतीने भाजा बदाम, दिवाळीत पार्लरचा खर्च वाचेल

२० रुपयांत केस होतील काळेभोर! तव्यावर 'या' पद्धतीने भाजा बदाम, दिवाळीत पार्लरचा खर्च वाचेल

Natural hair darkening tips: Almond hair treatment: Black hair home remedy: केसांना काळे करण्यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय केल्यास फायदा होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2025 12:00 IST2025-10-20T12:00:00+5:302025-10-20T12:00:02+5:30

Natural hair darkening tips: Almond hair treatment: Black hair home remedy: केसांना काळे करण्यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय केल्यास फायदा होईल.

Diwali special natural hair darkening trick How to get black hair naturally at home with almonds Simple 20 rupee home remedy for black hair | २० रुपयांत केस होतील काळेभोर! तव्यावर 'या' पद्धतीने भाजा बदाम, दिवाळीत पार्लरचा खर्च वाचेल

२० रुपयांत केस होतील काळेभोर! तव्यावर 'या' पद्धतीने भाजा बदाम, दिवाळीत पार्लरचा खर्च वाचेल

दिवाळीच्या सणात सर्वांनाच सुंदर दिसायचे असते. नवीन कपडे, दागिने, मेकअप या सगळ्यांसोबत आपण केसांवर विशेष लक्ष दिले नाही, तर आपला संपूर्ण लूक खराब होतो.(Natural hair darkening tips) सणासुदीच्या काळात साफसफाई, फराळ आणि इतर गोष्टींमुळे महिलांना स्वत:साठी वेळ मिळत नाही.(Almond hair treatment) ज्यामुळे चेहरा डल दिसणे, केस पांढरे होणे याकडे दुर्लक्ष केले जाते.(Diwali hair care)    
आपले केस सुंदर, दाट आणि काळेभोर असावेत असं प्रत्येकाला वाटतं. पण प्रदूषण, चुकीचा आहार, स्ट्रेबस आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्समुळे केस अकाली पांढरे होणे ही समस्या सामान्य बनली आहे. यासाठी अनेकजण पार्लरमधील महागडे ट्रीटमेंट्स, कलरिंग आणि सिरम्सकडे वळतात. ज्यामुळे केस काळे होण्याऐवजी ते अधिक पांढरे होतात. केसांना काळे करण्यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय केल्यास फायदा होईल.(Homemade hair oil) काही नैसर्गिक उपाय केल्यास केसांना हानी सुद्धा पोहोचणार नाही. 

नारळाचं तेल लावल्यानं कमी होतात स्ट्रेच मार्क्स? डॉक्टरांचा सल्ला, ‘असे’ लावा नारळाचे तेल

केस काळे करण्यासाठी आपल्याला २ ते ३ चमचे बदामाचे तेल, ७ ते ८ बदाम, मोहरीचे तेल आणि कोरफड जेल लागेल. सगळ्यात आधी आपल्याला तवा गरम करुन मंद आचेवर ५ ते ६ बदाम भाजावे लागतील. भाजून काळे झाल्यावर ते गॅसवरुन काढा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर पावडर करा. आता २ ते ३ चमचे बदाम तेल आणि समप्रमाणात मोहरीचे तेल मिसळा. या तेलात १ ते २ चमचे कोरफडीचा गर घाला. हे सर्व घटक चांगले मिसळा. ज्याचा गुळगुळीत बेस तयार होईल. यात आता बदाम पावडर घालून चांगले मिसळा. मंद आचेवर ठेवून फक्त ५ मिनिटे हलक्या हाताने गरम करा. 

आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर केसांना सहज लावता येईल. त्यामुळे केसांना केमिकल्समुक्त पोषण मिळेल. हे आपल्या केसांच्या लांबी आणि मुळांना लावा. २ तासानंतर केस थंड पाण्याने धुवा. हे मिश्रण केसांना मुळापासून टोकापर्यंत पोषण देते. जर आपल्याला कोणत्याही प्रकारची स्कॅल्प अॅलर्जी असेल तर केसांना काही लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. टाळूवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
 

Web Title : 20 रुपये में काले बाल! बादाम भूनें, पार्लर का खर्च बचाएं।

Web Summary : घर पर प्राकृतिक रूप से काले बाल पाएं! बादाम भूनें, तेल और एलोवेरा मिलाएं। धोने से पहले दो घंटे लगाएं। यह घरेलू उपचार बालों को पोषण देता है, सफेदी कम करता है और पैसे बचाता है।

Web Title : Black hair for 20 rupees! Roast almonds, save parlor costs.

Web Summary : Get naturally dark hair at home! Roast almonds, mix with oils and aloe vera. Apply for two hours before washing. This homemade treatment nourishes hair, reduces graying, and saves money.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.