Join us  

पाडव्याचा मेकअप 'असा' करा भारी, की रोमँटिक होऊन जाईल संध्याकाळ सारी! त्यासाठी 'खास' टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2021 12:18 PM

दिवाळीचा पाडवा म्हणजे नवरा- बायकोसाठी अतिशय खास दिवस. हा खास दिवस अजून झकास व्हावा आणि कायम आठवणीत रहावा, असं वाटतं ना? म्हणूनच तर या दिवशी स्वत:वर जरा जास्त मेहनत घ्या आणि या मेकअप टिप्स फॉलो करून सुंदर दिसा.

ठळक मुद्देपड्यांकडे जेवढं लक्ष द्याल तेवढंच लक्ष तुमच्या मेकअपवरही द्या.

दिवाळीचा प्रत्येक दिवसच तसा खास असतो. पण त्यातल्या त्यात विवाहित तरूणींसाठी पाडव्याचा दिवस अधिक महत्त्वाचा असतो. यादिवशी नवऱ्याला औक्षण करून त्याच्याकडून भरपूर ओवाळणीही मिळवायची असते ना. शिवाय दुसऱ्या दिवशी भाऊबीजेसाठी अनेक जणींना माहेरीही जायचं असतं. त्यामुळे पाडव्याचा दिवस नवरा- बायको दोघांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या दिवसासाठी तर अनेक कपल कपड्यांची मॅचिंग थीमदेखील करतात. तुम्हीही असं काही करण्याच्या विचारात असाल, तर जरूर करा. पण कपड्यांकडे जेवढं लक्ष द्याल तेवढंच लक्ष तुमच्या मेकअपवरही द्या. जेणेकरून असा सुरेख मेकअप पाहून नवराच काय, सासरची सगळीच मंडळी खुश होऊन जातील. 

 

असा करा मेकअपखूप ग्लॉसी मेकअप नकोपाडव्याचा मेकअप छान असावा, यात वादच नाही. पण तो खूप जास्त ग्लॉसी आणि भडक करू नका. कारण यादिवशी अनेक जणी भरजरी साडी नेसण्याला प्राधान्य देतात. साडी ग्लॉसी असते आणि अशी साडी असली की त्यावर दागिनेही तसेच निवडले जातात. या सगळ्यात जर मेकअपही खूप जास्त झाला, तर चेहरा उठून दिसणार नाही. त्यामुळे साडी आणि दागिने पाहून मेकअप कितपत ग्लॉसी असावा, हे ठरवा.

 

आयब्रोजवर फोकस करा.भुवया जाड आणि ब्रॉड ठेवण्याचा ट्रेण्ड सध्या इन आहे. कोरीव भुवयांमुळे तुमचा चेहरा अधिक प्राैढ दिसू शकतो. त्यामुळे भुवया एकतर खूप जास्त बारीक करू नका. बारीक झाल्याच असतील तर त्याच्यावर आयब्रो पेन्सिल फिरवायला विसरू नका. रात्रीच्या वेळी मेकअप करणार आहात. त्यामुळे आयब्रो पेन्सिल काळ्या रंगाची न वापरता ब्राऊन किंवा ग्रे रंगाची वापरली तरी चालेल. आय लायनर ब्रॉड लावणार असाल तर काजळ नाही लावले किंवा खूप बारीक लावले तरी चालते. 

 

लिपस्टिकचा कलर परफेक्ट हवाजर तुम्ही नेहमीच ब्राऊन शेडच्या डार्क, मॅट लिपस्टिक वापरत असाल, तर पाडव्याच्या दिवशी लिपस्टिकच्या शेडमध्ये थोडा बदल करून पहा. ब्राऊनऐवजी पिंक, चेरी, पीच, कॉपर असे कलर वापरून पहा. भरजरी कपडे घातल्यावर  रात्रीच्या वेळी असे रंग आकर्षक दिसतात आणि त्यामुळे चेहऱ्याचा रंगही उठून दिसतो. 

 

हेअर स्टाईलवर लक्ष द्या हेअरस्टाईल छान झाली की आपले व्यक्तिमत्त्वही आपोआपच खुलते. त्यामुळे हेअर स्टाईलवर फोकस करायला विसरु नका. सध्या पफ करण्याची स्टाईल खूप ट्रेण्डमध्ये आहे. त्यामुळे मोकळे केस सोडायचे असतील, तरी मध्ये भांग पाडून मोकळे सोडू नका. पुढे पफ करा आणि मागचे केस मोकळे सोडा. काठपदराची साडी नेसणार असाल आणि ट्रॅडिशनल दागिने घालायचा विचार असेल तर छानपैकी अंबाडा घाला. डिझायनर साडी असेल तर इंडोवेस्टर्न हेअरस्टाईल करण्यावर भर द्या. 

 

अशी लावा टिकलीसगळा मेकअप झाल्यावर चेहऱ्याला शोभा आणण्याचं काम टिकली करते. त्यामुळे टिकलीची निवड योग्य झाली पाहिजे. काठपदर साडी आणि ट्रॅडिशनल लूक असेल तर गोल आकाराची मोठी टिकली छान दिसेल. अशी मोठी, गोल टिकली लावताना ती साडीच्या रंगाशी मॅचिंग असावी. स्टोन टिकलीची फॅशनही सध्या इन आहे. पण काठपदराच्या साडीपेक्षा डिझायनर साडीवर ही टिकली लावण्यास प्राधान्य द्यावे. 

 

दागिन्यांची निवड काळजीपुर्वक कराखूप जास्त दागिने घातले किंवा खूप कमी दागिने घातले तरी आपला सगळा लूक मार खातो. त्यामुळे दागिन्यांची निवड अतिशय काळजीपुर्वक करावी. साडीचा काठ जर खूप हेवी असेल, तर गळ्यात शक्यतो एकच काहीतरी गळ्यातलं घाला आणि ते ही अतिशय सोबर डिझाईनचं निवडा. हेवी वर्कचा काठ असेल तर गळ्यात फक्त एखादी साखळी आणि कानात मोठे झुमके असा लूकही छान दिसतो. काठ साधारण वर्क असणारा असेल तर दोन गळ्यातले घालू शकता. यापैकी एक मोठे आणि एक अगदी गळ्यालगत असावे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सत्वचेची काळजी