८० - ९० च्या दशकांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री (Dimple Kapadia) डिंपल कपाडिया... बॉलिवूडमधील या सौंदर्यवतीने केवळ अभिनयानेच नव्हे, तर आपल्या नैसर्गिक सौंदर्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली. डिंपल कपाडिया (Dimple Kapadias Iconic Haircare Routine) उत्तम अभिनयासोबतच स्वतःचा फिटनेस आणि सौंदर्य जपण्याकडे देखील तितकेच बारकाईने लक्ष देतात. डिंपल कपाडिया स्किनकेअर आणि हेअर केअरवर देखील तितकाच भर देतात. वयाची ६८ वर्षे पूर्ण करूनही डिंपल कापडियांचे (Natural hair care like Dimple Kapadia) केस आजही घनदाट, चमकदार आणि निरोगी दिसतात, यामागे आहे त्यांचे खास घरगुती (Dimple Kapadia hair secrets) हेअर केअर सिक्रेट! वयाच्या साठीनंतरही त्यांच्या केसांचं सौंदर्य अनेक तरुणींनाही लाजवणारं आहे. हे सौंदर्य त्यांनी केवळ महागड्या उत्पादनांनी नाही तर घरगुती, नैसर्गिक उपायांनी टिकवून ठेवलं आहे. आयुर्वेदिक आणि पारंपरिक पद्धतीचा अवलंब करून त्यांनी केसांचं आरोग्य जपलं आहे(Dimple Kapadia haircare tips).
महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स आणि पार्लर ट्रिटमेंट्सऐवजी डिंपल कापडिया घरगुती, पारंपरिक उपायांवर अधिक भर देतात. योग्य आहार, केसांसाठी हेअर मास्क व तेलं, आणि घरगुती आयुर्वेदिक पद्धती यांच्या मदतीने त्या आजही केसांचं सौंदर्य सहजतेने टिकवून ठेवतात. वय वाढत असतानाही केसांमध्ये नैसर्गिक चमक आणि सौंदर्य व आरोग्य राखायचं असेल, तर त्यांचे हेअर केअर रुटीन फॉलो आपल्याला फायदेशीर ठरु शकत.
वयाची साठी उलटूनही डिंपल कपाडिया यांचे केस आहेत सुंदर...
१. डिंपल कपाडिया नेहमीच आपल्या केसांना तेल लावून ऑइलिंग करतात. वयाच्या ६८ व्या वर्षीही त्यांचे केस सुंदर, घनदाट आणि निरोगी दिसतात, यामागे नियमित तेल लावण्याची सवय हे एक मोठं सिक्रेट आहे. त्या प्रामुख्याने केसांना खोबरेल, बदाम, आणि कधीकधी भृंगराज किंवा आवळा तेल लावून मालिश करतात. काहीवेळा त्या गरम तेलाने मॉलिश करून केसांना खोलवर पोषण देतात.
२. केसांना ऑइलिंग करण्यासोबत त्या केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती हेअर मास्कचा देखील वापर करतात. त्या एक खास प्रकारचा घरगुती हेअर मास्क तयार करतात, ज्यात त्या अंड्याचा पांढरा बलक व एक पूर्ण अंड आणि एक केळ हे एकत्रित करुन त्यापासून एक खास असा घरगुती हेअर मास्क तयार करतात. हा हेअर मास्क केसांवर लावून ३० ते ६० मिनिटे तसाच केसांवर ठेवून द्यावा मग केस धुवून घ्यावेत.
डोळ्यात पाणी आणणारा कांदा केस मात्र करतो सुंदर! जावेद हबीब सांगतात, कांद्याचा रस ‘असा’ लावा...
३. यासोबतच, केसांसाठी कांद्याचा रस म्हणजे वरदानच असं त्या म्हणतात. केसांसाठी त्या कांद्याचा रसाचा वापर करतात. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा त्या केसांवर कांद्याचा रस लावून मालिश करतात. केसांसाठी कांद्याचा रस व कांद्याचे तेल या दोन्हींचा वापर त्या आवर्जून करतात.
४. केसांची बाहेरुन तर त्या काळजी घेतातच, सोबतच आतून पोषण मिळावे यासाठी त्या आहाराकडे देखील विशेष लक्ष देतात. आहारात त्या प्रोटीनयुक्त पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुटस, सीड्सचा समावेश करतात. एवढंच नव्हे तर एकूणच संपूर्ण आरोग्यासाठी त्या बॅलेन्स डाएट घेतात.
चमचाभर शिळा भात चेहऱ्यालाही लावा- चेहरा चमकवणारा फेसपॅक तयार! पाहा उरलेल्या भाताची कमाल...
५. डिंपल कपाडिया त्याचे हे हेअरकेअर रुटीन त्यांच्या पुढच्या पिढीला देखील बारकाईने फॉलो करण्यास सांगतात. याचबरोबर, हेअर केअर रुटीन फॉलो करताना केसांना चुकूनही कलर न करण्याचा उत्तम उपाय त्या सांगतात.