Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल्स पिच्छा सोडत नाहीत? पाहा हमखास काय चुकतं आणि काय करायला हवं.

डार्क सर्कल्स पिच्छा सोडत नाहीत? पाहा हमखास काय चुकतं आणि काय करायला हवं.

Dark Circles Troubling ? See What To Do : डार्क सर्कल्स कधी ना कधी सगळ्यांनाच होतात. घरगुती उपाय जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 17:46 IST2025-01-07T17:44:56+5:302025-01-07T17:46:20+5:30

Dark Circles Troubling ? See What To Do : डार्क सर्कल्स कधी ना कधी सगळ्यांनाच होतात. घरगुती उपाय जाणून घ्या.

Dark Circles Troubling ? See What To Do. | डार्क सर्कल्स पिच्छा सोडत नाहीत? पाहा हमखास काय चुकतं आणि काय करायला हवं.

डार्क सर्कल्स पिच्छा सोडत नाहीत? पाहा हमखास काय चुकतं आणि काय करायला हवं.

वाढत्या त्वचेच्या समस्यांपैकी एक म्हणजे डार्क सर्कल्स. ते घालवण्यासाठी आपण सतत उपाय शोधत असतो. पण डार्क सर्कल्स का होतात? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आपल्या गुगल हिस्ट्रीमध्ये उपाय शोधलेले असतील पण कारणे नाही. कारणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.(Dark Circles Troubling ? See What To Do) डॉक्टर हंसाजी योगेंद्र सांगतात, डार्क सर्कल्सच सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, बदललेले राहणीमान. आजकाल आपलं झोपेचं, खाण्याचं सगळ्याचंच चक्र बदललं आहे. भारतात राहून अमेरीकेच्या घड्याळानुसार काम करणारे लोक असतील किंवा रात्रपाळ्या करणारे लोक असतील. अशांना डार्क सर्कलस जास्त होतात.(Dark Circles Troubling ? See What To Do) कारण डार्क सर्कलस झोपेच्या आभावामुळे होतात. तसेच सुर्यप्रकाशाच्या अतिसंपर्कात आल्यानेही होतात. एक्जिमामुळे(त्वचेचा रोग)देखील हा त्रास होतो. ताणतणावामुळे डोळ्यांच्या खाली काळपट रंग येतो. अतिकाम करणाऱ्यांच्या डोळ्यांवर ताण जास्त येतो. अशी अनेक कारणे आहेत.

हे नियम पाळा.
१. योग्य झोप घ्या. जसं अति झोपणं वाईट तसंच कमी झोपणंही. डोळ्यांना आराम मिळणं गरजेचं असतं. 
२. आहार योग्य घ्या. कोणत्याही त्रासाची सुरवात पोटापासून होते. जीभेवर ताबा ठेवा.
३.आनंदी राहा. डोक्याला ताण दिला की संपूर्ण शरीरच थकून जाते.  मन प्रसन्न ठेवा.(Dark Circles Troubling ? See What To Do)
४.दिवसभरात सतत काही तासांनी हातावर हात चोळून डोळ्यांना लावा. असे केल्याने डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो.

हे उपाय करा.
१. त्वचा छान ठेवण्याचा मस्त मार्ग म्हणजे तुपाचा वापर. थोड्याशा तुपाने डोळ्याखाली रोज मसाज करा. तुपाने चेहरा उजळतो व मऊ होतो.
२. काकडीचे पाणी व गुलाबजल एकत्र करून लावा. काकडी थंड असते. उष्णता खेचून घेते.
३.कोरफड व बदाम तेल एकत्र करा. तयार झालेला अर्क डोळ्यांखाली लावा. 
४. दही व हळद यांचे मिश्रण करा. डोळ्याखाली लावा. सुखले की पुसून टाका. दही थंड असते आणि हळद काळपटपणा कमी करते.
५. ताजं निरस दुध घ्या. त्यात कापसाचा बोळा बुडवा आणि डोळ्यांवर ठेवा. डोळे मऊ पडतील आणि काळेपणा कमी होईल.


 

Web Title: Dark Circles Troubling ? See What To Do.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.