Lokmat Sakhi >Beauty > इवलसा कडीपत्ता केसांसाठी वरदान, घनदाट-लांबसडक केस हवे असतील तर हा घ्या रामबाण उपाय

इवलसा कडीपत्ता केसांसाठी वरदान, घनदाट-लांबसडक केस हवे असतील तर हा घ्या रामबाण उपाय

curry leaves benefits: hair falls: curry leaves for hair loss: curry leaves: curry leaves for hair growth: curry leaves for hair benefits: curry leaves home remedies: thick and long hair curry leaves benefits : केसगळतीमुळे वैतागले आहात? कडीपत्त्याचा यापद्धतीने वापर करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 10:41 IST2025-02-14T10:40:25+5:302025-02-14T10:41:42+5:30

curry leaves benefits: hair falls: curry leaves for hair loss: curry leaves: curry leaves for hair growth: curry leaves for hair benefits: curry leaves home remedies: thick and long hair curry leaves benefits : केसगळतीमुळे वैतागले आहात? कडीपत्त्याचा यापद्धतीने वापर करुन पाहा.

curry leaves benefits for hair falls home remedies thick and longer hair follow this simple tips | इवलसा कडीपत्ता केसांसाठी वरदान, घनदाट-लांबसडक केस हवे असतील तर हा घ्या रामबाण उपाय

इवलसा कडीपत्ता केसांसाठी वरदान, घनदाट-लांबसडक केस हवे असतील तर हा घ्या रामबाण उपाय

सध्या लांब- घनदाट केस प्रत्येकालाच हवेसे वाटतात. त्यासाठी आपण सगळेच जण अतोनात मेहनत करत असतो. (curry leaves benefits) केसांवर अधिक मेहनत घेऊन देखील आपल्याला हवा तसा परिणाम मिळत नाही. वाढता ताण, कामाची बदलेली वेळ, बाहरेचे प्रदूषण, जंक फूड यामुळे आपल्या आरोग्यावरच नाही तर याचा केसांवरही परिणाम होताना पाहायला मिळत आहे. 
केसगळणे ही समस्या त्रासदायक ठरत आहे. (curry leaves for hair growth) बिघडलेल्या दैनंदिन सवयी या समस्यांचे सर्वात मोठे कारण आहे. लांबसडक केस मिळवण्यासाठी आपण बाजारातील अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो. (thick and long hair curry leaves benefits) जे केसांसाठी हानिकारक ठरतात. जर तुम्हाला देखील केसांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर कडीपत्ता वरदान ठरणार आहे. याचा वापर कसा करायचा जाणून घेऊया. 

1. कडीपत्ता आणि नारळाचे तेल 


केसांसाठी हेअर टॉनिक बनवण्यासाठी नारळाचे तेल आणि कडीपत्ता फायदेशीर असतो. नारळाच्या तेलात फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे असतात. जे केसांना जाड आणि निरोगी बनवण्यास मदत करतात. हे तेल बनवण्यासाठी सर्वात आधी पॅन घेऊन त्यावर नारळाचे तेल घाला, मुठभर कडीपत्ता घाला. तेल गरम करुन मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर गाळून केसांना लावा. 

2. दही आणि कडीपत्ता हेअर पॅक

दही आपल्या स्कॅल्पला हायड्रेटिंग क्लींज म्हणून काम करते. स्कॅल्पवरील मृत पेशी आणि कोंडा काढून टाकते. हे स्कॅल्प तयार करण्यासाठी कडीपत्त्याची घट्ट पेस्ट बनवा. त्यानंतर फेटलेल्या दह्यात एक चमचा कडीपत्त्याची पेस्ट घाला. मिश्रण चांगले मिसळून घ्या. मास्क लावून डोक्याला चांगला मसाज करा. ३० ते ४० मिनिटे तसेच ठेवून केस शॅम्पूने धुवा. यामुळे केसांतील कोंडा कमी होईल आणि केसांना चमक येईल. 

3. केसांसाठी कडीपत्त्याचे  फायदे 

  • कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि अमीनो आम्ल आहे. ज्यामुळे केसांची वाढ जलद गतीने होते. 
  • कडीपत्त्यामध्ये असलेले पोषक घटक केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करतात. ज्यामुळे केस जाड होतात. 
  • याचा नियमितपणे वापर केल्यास केसांचे अकाली पांढरे होणे दूर होते. तसेच केस नैसर्गिकरित्या काळे होतात. 
  • यात असणारे अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. ज्यामुळे टाळू निरोगी राहाते. 
  • कडीपत्त्याचा स्कॅल्पवर नियमितपणे वापर केल्यास डोक्यातील कोंडा कमी होतो. 
     

Web Title: curry leaves benefits for hair falls home remedies thick and longer hair follow this simple tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.