Lokmat Sakhi >Beauty > प्या कपभर कडीपत्त्याचा चहा! केसांची खुंटलेली वाढ, केसगळती होईल कमी - केस वाढतील भराभर...

प्या कपभर कडीपत्त्याचा चहा! केसांची खुंटलेली वाढ, केसगळती होईल कमी - केस वाढतील भराभर...

Curry Leave For Hair Growth : Try This 5 Minute Curry Leaves Tea For Strong Silky Hair : Curry leaves tea for hair growth : Curry leaves tea for strong hair : Simple curry leaves drink for hair : केसांची वाढ होण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असाल तर एकदा कडीपत्त्याचा चहा पिऊन तर पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 12:42 IST2025-08-19T12:36:57+5:302025-08-19T12:42:11+5:30

Curry Leave For Hair Growth : Try This 5 Minute Curry Leaves Tea For Strong Silky Hair : Curry leaves tea for hair growth : Curry leaves tea for strong hair : Simple curry leaves drink for hair : केसांची वाढ होण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असाल तर एकदा कडीपत्त्याचा चहा पिऊन तर पाहा...

Curry Leave For Hair Growth Try This 5 Minute Curry Leaves Tea For Strong Silky Hair Curry leaves tea for hair growth Simple curry leaves drink for hair | प्या कपभर कडीपत्त्याचा चहा! केसांची खुंटलेली वाढ, केसगळती होईल कमी - केस वाढतील भराभर...

प्या कपभर कडीपत्त्याचा चहा! केसांची खुंटलेली वाढ, केसगळती होईल कमी - केस वाढतील भराभर...

सुंदर, घनदाट, काळेभोर, लांबसडक केस सगळ्याचजणींना हवे असतात. आपल्या केसांचे अस्सल सौंदर्य कायमच टिकून राहावे, अशी जरी आपली इच्छा असली तरी केसांच्या समस्या काय आपली पाठ सोडतच नाही. केस गळणे, केसांची वाढ खुंटणे अशा एक ना अनेक समस्या आपल्यापैकी प्रत्येकीला हैराण करतातच. केसांच्या समस्या खूप वाढल्या असल्या तरी  आपण यावर ( Simple curry leaves drink for hair) अनेक उपाय करुन पाहतोच, कित्येकदा हे अनेक उपाय करूनही ( Try This 5 Minute Curry Leaves Tea For Strong Silky Hair) म्हणावा तसा फरक दिसतच नाही. आपल्याच घरात (Curry leaves tea for strong hair) उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण केसांच्या समस्यां कमी करू शकतो. कडीपत्ता, ज्याचा वापर आपण रोजच्या जेवणात करतो, तो फक्त पदार्थांची चवच वाढवत नाही, तर केसांसाठीही अत्यंत गुणकारी आहे(Curry Leave For Hair Growth).

आयुर्वेदात, कडीपत्ता केसांच्या आरोग्यासाठी अमृतासमान मानला जातो. स्वयंपाकात चव आणि सुगंध वाढवणाऱ्या कडीपत्त्याचा चहा घेतल्यास शरीराला आतून पोषण देतो आणि केसांची वाढ नैसर्गिकरीत्या होण्यास मदत मिळते. कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि बीटा-कॅरोटीन असतात. हे सर्व घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात, केसांना पोषण देतात आणि त्यांच्या वाढीस मदत करतात. कडीपत्त्याचा चहा प्यायल्याने केसांना आवश्यक घटक व आतून पोषण मिळते, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, कोंडा कमी होतो आणि नव्या केसांची वाढ होण्यास मदत मिळते. यासाठीच, केसगळती थांबवून केसांची वाढ होण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असाल तर एकदा हा कडीपत्त्याच्या पानांचा चहा पिऊन तर पाहा... 

केसांची वाढ होण्यासाठी कडीपत्त्याच्या पानांचा चहा... 

केसांच्या अनेक समस्या कमी करुन केसांची वाढ नैसर्गिक व योग्य पद्धतीने होण्यासाठी कडीपत्त्याच्या पानांचा चहा पिणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी, haircarewithsomya या इंस्टाग्राम अकाऊंटवरून कडीपत्त्याच्या पानांचा चहा कसा करायचा आणि त्याचे केसांच्या वाढीवर होणारे चांगले परिणाम याबद्दल अधिक माहिती दिली आहे. 

कडीपत्त्याच्या पानांचा चहा... 
 
केसांसाठी कडीपत्त्याच्या पानांचा चहा तयार करण्यासाठी आपल्याला १५ ते २० कडीपत्त्याची पाने आणि अर्धा लिंबू इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. सगळ्यात आधी एका भांड्यात ग्लासभर पाणी ओतून घ्यावे. पाणी व्यवस्थित गरम होऊ द्यावे. पाणी हलकेच उकळू लागल्यावर त्यात कडीपत्त्याची पाने घालावीत. मग हे पाणी मंद आचेवर ठेवून उकळवून घ्यावे, ग्लासभर पाण्याचे अर्धे पाणी होईपर्यंत हे मिश्रण उकळवून घ्यावे. मग हे पाणी गाळून त्यात आपल्या आवडीनुसार थोडा लिंबाचा रस घालावा, कडीपत्त्याच्या पानांचा चहा पिण्यासाठी तयार आहे. 

मासिक पाळीत रक्तस्त्राव खूप कमी होतो? आहारात नियमित हवे ५ पदार्थ- तब्येतही सुधारेल लवकर...

टेम्पल डिझाईन मंगळसूत्राचे ५ नवीन पॅटर्न! सणासुदीसाठी खास ठसठशीत-भरीव दागिना, दिसतो शोभून...

चहा नेमका कधी आणि कसा प्यावा ? 

केसांना मजबूती देण्यासाठी, तुम्ही ३० दिवस रोज हा चहा तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करणे फायदेशीर ठरेल. याचबरोबर, आपण दिवसातील कोणत्याही वेळी  हा चहा कधीही पिऊ शकता, पण जर तुम्ही तो सकाळी प्यायलात तर जास्त फायदा होईल. तसे पाहिल्यास, हा चहा पूर्णपणे नैसर्गिक आहे, पण जर तो प्यायल्यानंतर तुम्हाला काही त्रास जाणवला, तर लगेच तो चहा पिणं थांबवा. 

काखेतल्या घामाने उर्फी जावेदही हैराण! काखेत घाम न येण्यासाठी घेतली भलतीच ट्रिटमेण्ट, म्हणते नकोच डिओ परफ्यूम...

केसांसाठी कडीपत्त्याच्या पानांचा चहा पिण्याचे फायदे...

१. केसगळती कमी होते.

२. केसांची वाढ होण्यास मदत होते.

३. केसांमधील कोंडा कमी होतो.

४. केस मजबूत आणि चमकदार बनतात.

५. केसांना नैसर्गिक पोषण मिळते. 

६. केस लवकर पांढरे होण्याची शक्यता कमी होते.

७. लिंबातील व्हिटॅमिन 'सी' स्काल्प स्वच्छ ठेवते.


Web Title: Curry Leave For Hair Growth Try This 5 Minute Curry Leaves Tea For Strong Silky Hair Curry leaves tea for hair growth Simple curry leaves drink for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.