Join us

कुरळे केस कोरडे, निर्जीव दिसतात? ३ उपाय - कुरळे केस होतील चमकदार सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 15:23 IST

Curly Hairs Styling कुरळे केस दिसतात सुंदर, पण कुरळे आणि कोरडे केसांवर स्टायलिंग करणे होते अवघड

सरळ मुलायम केस सगळ्याच महिलांना आवडतात. पण कुरळे केस केवळ अशाच स्त्रियांना सूट करतात जे त्यांची योग्य काळजी घेतात. आपल्या कुरळ्या केसांसाठी योग्य प्रॉडक्ट्स निवडणे महत्वाचे आहे. आपले केस खूप कुरळे आणि कोरडे असले की ते कितीही वेळा विंचरले तरी न विंचरल्यासारखेच दिसतात. केसांचा रफनेस कमी करुन ते जास्तीत जास्त सिल्की, शायनी राहावेत यासाठी आपण आवर्जून काही गोष्टी करायला हव्यात. ज्यामुळे आपल्या केसांचा पोत चांगला राहण्यास मदत होईल. पाहूयात कोरड्या आणि कुरळ्या केसांची काळजी कशापद्धतीने घ्यायला हवी. 

केशरचना उत्पादनांची मदत घ्या

कुरळे केसांसाठी अशी अनेक उत्पादने आहेत जी केस व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. परंतु अनेक वेळा स्त्रिया या प्रकारच्या उत्पादनांचा अजिबात वापर करत नाहीत. त्यामुळे केस निर्जीव दिसतात. जर आपण केसांवर स्टायलिंग स्प्रे आणि सीरम लावून केस सेट कराल. तर, आपले कुरळे केस खूप आकर्षक दिसतील. यासह नवी चमक केसांवर दिसेल.

कुरळ्या केसांवर अधिक उत्पादनांचा करा वापर

बर्याच स्त्रिया आपल्या केसांवर हेअरस्टाइल उत्पादनांचा वापर करतात. पण तरीही त्यांचे केस व्यवस्थित स्टाईल होत नाहीत.कारण अनेक जण आपल्या केसांवर कमी प्रमाणात उत्पादनांचा वापर करतात. ज्यामुळे केस अधिक कुरळे आणि कोरडे दिसतात. त्यामुळे केसांवर जर तुम्ही सिरम किंवा जेल लावत असाल तर जास्त प्रमाणात लावा.

केसांवर प्रोडक्ट्स योग्यवेळी लावावे

कुरळे केसांना स्टाइल करण्यासाठी, योग्य वेळी केसांना स्टाइलिंग उत्पादन लावणे महत्त्वाचे आहे. ओल्या किंवा कोरड्या केसांवर उत्पादन लावल्याने ते उत्पादन केसांवर काम करत नाही. केस हलके ओले असताना उत्पादन लावल्याने केस सुंदर आणि हायड्रेटेड दिसतात. कारण पाणी हे उत्पादन केसांमध्ये व्यवस्थित शोषण्यास मदत करते. तसेच केसांना ओल्या केसांमध्ये स्टाइल केल्याने ते दिवसभर राहतात.

टॅग्स :केसांची काळजीस्टायलिंग टिप्स