आपले केस हे सौंदर्यात अधिक भर घालतात. घनदाट, काळेभोर, मजबूत केस सगळ्यांनाचं आवडतात. असे असले तरी, सध्याची बदलती लाईफस्टाईल, प्रदूषण, असंतुलित आहार, हार्मोन्समधील असंतुलन, चुकीच्या ब्यूटी प्रॉडक्स्टचा वापर यांसारख्या असंख्य कारणांमुळे केसांच्या अनेक समस्या सतावतात. दररोज ठराविक (How to Use Curd & Flaxseed for Hair Growth) प्रमाणात केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी जेव्हा ही गळती जास्त प्रमाणात (Curd & Flax Seeds for hair fall) होऊ लागते, तेव्हा केसगळतीचे टेंन्शन येते. ही केसगळती थांबविण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. या उपायांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची तेल व शाम्पू वापरुन पाहतो(Curd & Flaxseeds For Hair Fall Control Suggested By Dietician).
एवढंच नाही तर केसांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्स्टचा वापर करतो. परंतु, केसांवर फक्त बाह्य उपाय करुन केसगळती थांबत नाही तर, केस आतून मजबूत होण्यासाठी आहारात पौष्टिक व केसांना पोषण देणारे पदार्थ खाणे गरजेचे असते. भरपूर प्रमाणात होणारी केसगळती थांबविण्यासाठी दही आणि अळशीच्या बिया अतिशय फायदेशीर ठरतात. दही आणि अळशीच्या बिया खाण्यासोबतच आपण त्याचा हेअर मास्क करून केसांना देखील लावू शकतो. यासाठीच, केसगळती रोखण्यासाठी दही आणि अळशीच्या बिया कशा फायदेशीर ठरतात ते पाहूयात.
आपल्या शरीरातील पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळू लागले तर, डाएटिशियन लावलीन कौर यांनी केसगळती थांबवण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे. डाएटिशियन लावलीन कौर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केसगळती थांबवण्यासाठी दही आणि अळशीच्या बियांचा वापर कोणत्या दोन पद्धतीने करावा याबद्दल अधिक माहिती व्हिडीओमध्ये शेअर केली आहे.
केसगळती रोखण्यासाठी दही आणि अळशीच्या बिया फायदेशीर...
डाएटिशियन लावलीन कौर यांच्यामते, केसगळती रोखण्यासाठी दुपारच्या जेवणात दही आणि भाजलेल्या अळशीच्या बियांची पूड एकत्रित करुन खाणे फायदेशीर ठरते. हे दोन्ही पदार्थ पोषणमूल्यांनी समृद्ध असून केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात.
अमोनियायुक्त हेअर कलर्सना म्हणा नाही! मेथी दाणे, हळद, अळशीचा नॅचरल हेअर कलर - केस दिसतील काळेभोर...
यासाठी गाईच्या दुधापासून शक्यतो घरीच तयार केलेले दही वापरणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी एक वाटी दहीत एक चमचा भाजून घेतलेल्या अळशीच्या बियांची पावडर मिसळा आणि असे दही रोजच्या आहारात समाविष्ट करा. अळशीच्या बिया भाजल्यावर त्यातील पोषकतत्त्वे अधिक सक्रिय होतात आणि पचायला देखील सोपे जाते.
रात्रभर लॅपटॉपवर काम केल्याने, डोळयांच्या पफीनेस वाढला, फक्त २ स्टीलचे चमचे करतील जादू...
अळशीमध्ये नैसर्गिकरित्या ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे केसगळती कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याचबरोबर, दह्यात असलेले प्रोबायोटिक्स पचनसंस्थेला मजबूत करतात आणि पोषणशक्ती वाढवतात. हे दोन्ही पदार्थ एकत्रित करुन खाल्ल्यास आपले शरीर चरबीमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचे (जसे की व्हिटॅमिन A, D, E, K) अधिक चांगले शोषण करू शकते, जे केसांच्या मुळांना योग्य पोषण देण्यासाठी आवश्यक असते. यासाठीच, आहारतज्ज्ञ केसगळती थांबवण्यासाठी दररोजच्या आहारात दही आणि अळशी यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
केसांवर हेअर मास्क देखील करून लावू शकता...
दही आणि अळशीच्या बिया फक्त खायच्याच नाही, तर त्यांचा हेअर मास्क करून देखील आपण केसांवर लावू शकतो. या उपायामुळे केसगळती थांबवण्याबरोबरच, अळशी केसांना मऊ, मजबूत आणि दाट बनवते. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात २ ते ३ चमचे अळशीच्या बिया घाला. हे मिश्रण मध्यम आचेवर उकळा. बिया उकळू लागल्यावर त्यातून जेलसारखा घट्ट अर्क बाहेर येऊ लागतो. जेव्हा पाणी जरा गडद आणि चिकटसर वाटू लागते, तेव्हा गॅस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या. नंतर ते एका स्वच्छ सूती कपड्याने गाळा आणि हे जेल केसांना लावा. हे जेल थेट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावून ३० ते ४५ मिनिटे ठेवा आणि नंतर शाम्पूने धुवा. यामुळे केस मऊ, चमकदार आणि निरोगी होतात.
या उपायाबरोबरच, दह्यामध्ये अळशीचे जेल किंवा अळशीची पावडर मिसळून देखील हेअर मास्क तयार करू शकता. दह्याचे प्रोबायोटिक्स आणि अळशीतील ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स एकत्र येऊन केसांना खोलवर पोषण देतात. हा मास्क केसांवर लावून ३० ते ४५ मिनिटांनी धुतल्यास केसांच्या अनेक समस्या दूर होऊन केसांची वाढ होऊन केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.