Join us  

ना रस - ना पेस्ट; ५ रुपयांच्या काकडीने करा फेशिअल; चेहरा करेल ग्लो - टॅनिंग होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 10:00 AM

Cucumber Facial at Home(Get Fresh and Bright Skin) : उन्हात गेल्यावर चेहरा काळवंडला असेल तर, काकडीचा वापर करून टॅनिंग घालवा..

काकडीची कोशिंबीर अनेकांना आवडते. काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो (Skin Care Tips).  उन्हाळ्यात काकडी खाण्याचे प्रमाणही वाढते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काकडी खाल्ली जाते (Beauty Tips). काकडी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Cucumber Facial). काकडीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे उन्हाळ्यातही शरीर निरोगी राहते.

पण खाण्याव्यतिरिक्त काकडीचा वापर स्किनसाठीही केला जातो. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे स्किनला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. पण स्किनसाठी काकडीचा वापर कसा करावा? यामुळे टॅनिंगची समस्या निघेल का? काकडीचा नेमका वापर कसा करावा? पाहूयात(Cucumber Facial at Home Get Fresh and Bright Skin).

काकडीचा फेशिअल करण्यासाठी लागणारं साहित्य

काकडी

बेसन

कॉफी

टोमॅटो पल्प

मिक्सरच्या भांड्यात कोण ढोकळा करते? पाहा ही युक्ती, करा जाळीदार हलका ढोकळा

व्हिटॅमिन ई

गुलाब जल

अशा पद्धतीने करा काकडी फेशिअलचा वापर

सर्वप्रथम, जाड आकारामध्ये काकडीची स्लाईज कट करा. त्यावर सुरीने हलके लहान छिद्र पाडा. जेणेकरून काकडीचा रस सहस बाहेर पडेल. त्यावर छोटा अर्धा चमचा बेसन, छोटा अर्धा चमचा कॉफी, छोटा अर्धा चमचा टोमॅटो पल्प, व्हिटॅमिन ई कॅपस्युल आणि गुलाब जल घालून बोटाने मिक्स करा.

उन्हाळ्यात मिठाचे पाणी प्यावे असं म्हणतात ते कितपत खरं? खरंच शरीर हायड्रेट राहते?

नंतर हलक्या हाताने हात किंवा पायावर काकडी घासा. ५ मिनिटांसाठी काकाडीने घासून डेड स्किन आणि टॅनिंग घालवण्याचा प्रयत्न करा. काही वेळ तसेच ठेवा. काही वेळानंतर पाण्याने हात-पाय धुवा. यामुळे नक्कीच फरक दिसेल. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

स्किनसाठी काकडीचा फायदे

काकडी फक्त शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नसून, स्किनसाठीही फायदेशीर ठरते. त्यात  व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण जास्त असते. यात पाण्याचे देखील प्रमाण जास्त असते. या पाण्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते.

टॅग्स :समर स्पेशलब्यूटी टिप्सत्वचेची काळजी