केस निरोगी, सुंदर दिसावेत म्हणून त्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक असते केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केस व्यवस्थित धुणे गरजेचे आहे. आठवड्यातून दोनदा केस नीट धुण्याने केसांशी संबंधित अनेक समस्याही कमी होतात. घनदाट, जाड, मुलायम, मजबूत केस कोणाला नको असतात. आपले केस सुंदर, निरोगी असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु जर चांगले केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे असते. त्यासाठी केस आठवड्यातून दोन वेळा धुणे, केसांचा मसाज करणे आवश्यक आहे. काहीवेळा हे सर्व करूनही केस चांगले दिसत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. आपण सगळेच आपल्या केसांची खूप काळजी घेतो, परंतु काळजी घेताना आपण काही छोट्या चुका करतो. या लहान - सहान चुकांमुळेच केसांचे सौंदर्य व आरोग्य बिघडू शकते(Complete Guide To After Shower Hair Care).
केस धुतल्यानंतर केसांची योग्य ती काळजी कशी घ्यावी ?
१. कंडिशनर लावावे :- केस धुताना तुम्ही शाम्पू वापरत असाल तर शाम्पू केल्यानंतर केसांवर कंडिशनर लावायला विसरु नये. त्यामुळे शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरचाही वापर करा. केसांना कंडिशनर लावा कंडिशनर लावल्याने केस रेशमी तर होतीलच सोबतच केसांना कंडिशनिंग केल्याने केसांचे आरोग्य व सौंदर्य चांगले राखण्यास मदत होते.
२. केसातील गुंता सोडावा :- केस धुतल्यानंतर ते असेच बांधून ठेवण्यापेक्षा कंगव्याने केस विंचरून केसातील गुंता सोडवून घ्यावा. केसातील गुंता वेळीच सोडवल्याने केसांत फारसा गुंता होत नाही. यामुळे केस एकमेकांत अडकून तुटत नाहीत. त्यामुळे केस धुतल्यानंतर सर्वात आधी केसांचा गुंता सोडवावा.
३. केसांसाठी हेअर सिरम वापरा :- केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी तुम्ही हेअर सीरमचा वापर करु शकता. हेअर सीरम केसांना पूर्ण पोषण देते आणि त्याचा योग्य वापर केल्याने केस सुंदर दिसतात.
४. खोबरेल तेल वापरा :- केस धुतल्यानंतर काही तासांनी कोरड्या केसांवर खोबरेल तेल लावा आणि यासाठी तुम्ही खोबरेल तेलचा वापर करु शकता. त्याचबरोबर तेल लावताना केस पूर्णपणे कोरडे असतील याची विशेष काळजी घ्यावी.
केस सुंदर आणि आकर्षक दिसावेत म्हणून लक्षात ठेवा...
१. केस निरोगी ठेवण्यासाठी तेल लावा.२. तेल लावल्यानंतर केस चांगले धुवावेत.३. केस धुण्यासाठी योग्य शाम्पू आणि कंडिशनर वापरा.४. हिटिंग टूल्सचा वापर कमी करा.५. आठवड्यातून २ दिवस केसांना सूट होईल असा चांगला हेअरपॅक लावा.