केसगळती ही सध्याच्या पिढीमधला सगळ्यात मोठा ताण बनला आहे. सकाळी उठल्यावर उशीवर चिकटलेले केस, केस धुताना वाढलेली केसगळती किंवा विंचरताना कंगव्यात अडकणाऱ्या केसांमुळे आपल्यापैकी अनेक जण त्रस्त आहेत.(Hair fall prevention) इतकंच नाही आता टक्कलच पडते की काय अशी भीती देखील आपल्याला जाणवू लागते. अशावेळी उपाय म्हणून आपण अनेक प्रॉडक्ट्स बदलत राहतो.(Hair oiling mistakes) पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या सवयींमुळे केसांना जास्त प्रमाणात हानी पोहोचते. (Stop hair fall naturally)लहानपणी आपल्या केसांना आई-आजी भरपूर तेल लावायची. ज्यामुळे आपले केस जाड आणि लांबसडक होते. या तेलामुळे टाळूला पोषण मिळाते.(Hair care tips) केस मजबूत होत होते आणि रक्ताभिसरण देखील सुधारते. सध्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे, वाढता ताण यामुळे आपल्या केसांची व्यवस्थितपणे काळजी घेता येत नाही. चुकीच्या पद्धतीने तेल लावल्याने केसांवर परिणाम होतो.(Reasons for hair thinning) ज्यामुळे केस तुटत राहतात, निर्जीव होतात आणि यामुळे केसांची वाढ देखील थांबते. केसांना तेल लावताना आपण कोणत्या चुका करु नये जाणून घेऊया.
अप्सरा आली..! लग्नसोहळ्यात मानानं मिरवावे ५ अस्सल मराठी दागिने, काठापदराची साडी की नऊवारी-साज मराठीच
अनेकांना असं वाटतं जास्त प्रमाणात केसांना तेल लावले की भरपूर पोषण मिळते. पण टाळूला जास्त तेल लावल्याने केसांची वाढ मंदावते आणि केसांच्या कोशांमध्ये अडथळा निर्माण होतो. आपल्या केसांसाठी चमचाभर तेल पुरेसे असते. इतकेच नाही तर केसांच्या लांबीनुसार आपण त्याचे प्रमाण वाढवू शकतो. केसांना तेल लावताना त्याच्या मुळांवर नाही तर टाळूवर लक्ष केंद्रित करा.
बऱ्याचदा घाईघाईत लोक केसांच्या मुळांना तेल लावतात आणि टाळूला तेल लावत नाही. यामुळे तेलातील पोषक घटक शोषले जात नाही आणि रक्ताभिसरण सुधारते. ५ ते १० मिनिटे टाळूची बोटांनी मालिश करा. यामुळे तेल शोषण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होईल.
केसांना रात्रभर तेल लावू नका. यामुळे टाळू चिकट होते. आपल्या केसांसाठी १ ते २ तास तेल पुरेसे असते. आपल्या केसांसाठी नारळाचे, तीळाचे किंवा एरंडेल तेल लावू शकतो.
Web Summary : Hair fall is a major concern. Avoid excessive oil, focus on scalp massage for better absorption and blood circulation, and limit oiling time to 1-2 hours. Use coconut, sesame, or castor oil for best results.
Web Summary : बाल झड़ना एक बड़ी चिंता है। ज़्यादा तेल लगाने से बचें, बेहतर अवशोषण और रक्त परिसंचरण के लिए खोपड़ी की मालिश पर ध्यान दें, और तेल लगाने का समय 1-2 घंटे तक सीमित रखें। सर्वोत्तम परिणामों के लिए नारियल, तिल, या अरंडी का तेल प्रयोग करें।