Join us

केस विंचरताना हातात मोठी गुंतवळ येते? ६ सवयींमुळे गळतात केस-टक्कलही पडू शकतं लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2025 16:47 IST

How to reduce hair fall naturally at home : Hair care routine for strong and healthy hair : Hair fall causes: आपल्या रोजच्या चुकांमुळे केसगळती वाढू शकते, त्यासाठी योग्य काळजी कशी घ्यायला हवी? पाहूया.

केसांना लांबसडक-सुंदर करण्यासाठी आपण नियमितपणे केस लावतो. (Hair care Tips) अनेकदा तर काही घरगुती उपाय करतो पण विंचरताना मात्र केसांचा हातात पुंजका येतो.(Hair loss) सध्या केसगळतीच्या समस्येमुळे प्रत्येक वयोगटातील लोकांना जाणवत आहे.(Hair care routine) दिवसाला ५० ते १०० केस गळणं हे नैसर्गिक मानलं जातं पण त्याऐवजी नवीन केस उगवत राहतात. पण सध्या केसांच वाढणं कमी आणि गळणं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. (Hair loss habits)केसगळण्याच्या समस्येला आपण तेल, शाम्पू किंवा महागड्या उत्पादनांना दोष देतो.(Hair loss in women) पण केस गळतीची अनेक कारणे असू शकतात. आपल्या रोजच्या चुकांमुळे केसगळती वाढू शकते.(Hair loss) पण योग्य काळजी घेतली, तर केसगळतीवर नियंत्रण मिळवून आरोग्यदायी, दाट आणि चमकदार केस पुन्हा मिळवणं शक्य आहे.

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

1. केसांच्या मुळांना पोषणाची आवश्यकता अधिक प्रमाणात असते. जर आपण आहारात प्रथिने, लोह , बायोटिन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडसारखे पदार्थ खात नसून तर केस कमकुवत होऊन गळू लागतात. जंक फूड आणि अनहेल्दी पदार्थ केसांचे शत्रू आहेत. केसगळती रोखण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. 

2. सतत ताणतणावात राहणे आणि पुरेशी झोप न घेतल्याने केसांवर त्याचा परिणाम होतो. ताण वाढल्याने शरीरातील हार्मोनल असंतुलित होतात. ज्यामुळे केसगळती वाढते. जर तुम्हालाही असं होऊ नये असे वाटतं असेल तर दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आणि मेडिटेशन करणं खूप महत्त्वाचे आहे. 

3. गर्भधारणेदरम्यान, मासिक पाळी दरम्यान किंवा रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे केस गळू शकतात. अशावेळी डॉक्टारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यामुळे केसगळती काही प्रमाणात कमी होईल. 

4. केसगळतीचे सगळ्यात मोठे कारण अनुवांशिकता. जर आपल्या घरात केसगळण्याची समस्या ही सगळ्यांच असेल तर अनुवांशिकता हे कारण आहे. ही स्थिती पूर्णपणे रोखता येत नाही. पण योग्य प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या नियंत्रणात आणता येते. 

5. केसांची काळजी चुकीच्या पद्धतीने घेतल्यास केसगळतीच्या समस्या वाढतात. खूप गरम पाण्याने केस धुणे, रोज केसांना हीट स्टाईलिंग करणे किंवा ओल्या केस विंचरणे. या सर्वांमुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याशिवाय दररोज शाम्पू करणे किंवा चुकीची उत्पादने वापरणे हे देखील केसांना कमकुवत करते. 

6. तज्ज्ञांच्या मते, डोक्यातील कोंडा, टाळूचा संसर्ग किंवा तेलकट त्वचा यामुळे देखील केस गळू लागतात. जेव्हा टाळू निरोगी नसते तेव्हा केसांच्या वाढीवर परिणाम होतो आणि केस तुटू लागतात. त्यासाठी स्काल्प स्वच्छ आणि निरोगी असणं अधिक महत्त्वाचे आहे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी