सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये, रात्रभर जागून लॅपटॉपवर काम करणे, स्क्रीनकडे सतत पाहणे हे अगदी कॉमन झाले आहे. आपल्यापैकी बरेचजण रोज रात्री जागून लॅपटॉप, कम्प्युटरवर तासंतास काम करत बसतात. काहीजणांना तर अशी रात्रभर काम (Cold Spoon Therapy To Reduce Eye Bags Find Out What It Is) करण्याची सवय लागलेली असते, परंतु याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. सतत एकाच स्क्रीनकडे बघत काम केल्याने डोळ्यांखाली सौम्य सूज येणे, पफीनेस (Try This Cool Method 'Cold Spoon Therapy' To Depuff Your Eye Bags) जाणवणे आणि डोळे थकलेले दिसणे यांसारख्या समस्या सतावू लागतात, यामुळे चेहऱ्यावर दमलेपणाची छाप पडते आणि आपले डोळे देखील थकलेले दिसतात(Home Remedy To Reduce Eye Puffiness).
खरंतर, रात्रभर जागून लॅपटॉप, कम्प्युटरवर काम केल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर दिसून येतो. अशा परिस्थितीत, डोळ्यांखाली आलेली सौम्य सूज म्हणजेच त्याला पफीनेस असे देखील म्हटले जाते. सुदैवाने, हे लक्षण तात्पुरते असते आणि सोप्या घरगुती उपायांनी सहज कमी करता येते. रात्रभर जागरणामुळे आलेली डोळ्यांची सूज आणि पफीनेस कसा कमी करावा, आणि डोळ्यांचे आरोग्य कायम चांगले ठेवण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा ते पाहूयात.
फक्त २ स्टीलचे चमचे करतील जादू...
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त २ स्टीलचे चमचे लागतील. हे स्टीलचे चमचे सुमारे ५ ते १० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर ते बाहेर काढा आणि एकदम हलक्याने हे चमचे दोन्ही डोळ्यांवर ठेवून काही वेळ तसेच ठेवा. या थंड चमच्यांमुळे रात्रभर जागून डोळ्यांना आलेली सौम्य सूज काही वेळातच कमी होऊन डोळे पुन्हा पाहिल्यासारखे सामान्य दिसायला लागतील. पण एवढंच नाही तर डोळ्यांवर थंड चमचे ठेवण्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास आणि स्ट्रेस दूर होण्यासही मदत होते. यासाठी आता रात्री कितीही स्क्रीन पाहिलं, तरी सकाळी सुजलेल्या डोळ्यांनी ऑफिसला जाण्याची गरज भासणार नाही कारण हा घरगुती उपाय तुमचं काम अगदी मिनिटभरात सोपं करेल.
भारती सिंग केस काळे करण्यासाठी वापरते 'असे' घरगुती हेअर डाय, पांढरे केस दिसतच नाहीत...
इतरही उपाय ठरतील फायदेशीर...
१. ग्रीन टी तयार केल्यावर टी बॅग्स टाकून न देता, फ्रीजरमध्ये ठेवा. हे बॅग्स थंड झाल्यावर काही वेळ डोळ्यांवर ठेवून द्या. यामुळे डोळ्यांच्या पफीनेसची समस्या नैसर्गिकरित्या कमी होते.
२. काकडीचे थंड काप डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांचा पफीनेस कमी होतो. काकडीत नैसर्गिक थंडावा आणि सूज कमी करणारे घटक असतात.
३. शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) असल्यास डोळ्यांखाली सूज येते. दिवसभर पुरेसे पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील आणि पफीनेस आपोआप कमी होईल.
४. डोळ्यांभोवती थोडा बर्फ फिरवल्यास थंडावा मिळतो आणि सूज कमी होते. पण बर्फ थेट न लावता कपड्यात गुंडाळून हलक्या हाताने लावा.