Join us

१ चमचा कॉफी-१ ग्लास पाणी, कॉफीच्या पाण्याने केस धुवून तर पाहा- केस चमकदार-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2023 17:56 IST

Coffee For Hair: Benefits, How To Use, And Precautions कॉफीच्या पाण्याने केस धुण्याचे भन्नाट फायदे

सायंकाळ झाल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा होते. कॉफी फक्त शरीरात तरतरी निर्माण करत नसून, त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.  कॉफीचे फेस पॅक, स्क्रब आणि फेस मास्क केले जातात. पण आपण कधी कॉफीचा वापर केस धुण्यासाठी केला आहे का?

कॉफीने केस धुतल्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांचे अनेक समस्या सोडवण्यासाठी कॉफी मदत करते. यासह केसांना अँटी ऑक्सिडंट सपोर्ट देखील प्रदान करते. निरोगी केसांसाठी कॉफीचा वापर कशा प्रकारे करावा हे पाहूयात(Coffee For Hair: Benefits, How To Use, And Precautions).

कॉफीने केस धुण्याचे फायदे

केसांची वाढ

कॉफीमध्ये जीवनसत्त्वांसह अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. कॉफीच्या पाण्याने केस धुतल्याने हेअर फॉलिकलला फायदा होतो. कॉफीमुळे मॅट्रिक्स सेल्स बूस्ट होतात, ज्यामुळे केसांच्या वाढीला गती मिळते आणि केस निरोगी होतात.

ना व्हॅक्सिंग, ना थ्रेडिंग, एक चमचा मैद्याचे करा फेशियल हेअर रिमुव्हल पेस्ट, फेशियल केसांपासून मिळेल सुटका

कोरडेपणा दूर करते

कॅफिन रक्ताभिसरण वाढवते यासह केसांमधील फॉलिकल्स बूस्ट करते. ज्यामुळे केस मऊ, लांब आणि दाट दिसतात. कॉफी केसांवर  कंडिशनरसारखे काम करते, ज्यामुळे केस सिल्की स्मूथ होतात. कॉफीमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स केसांना कोरडेपणापासून वाचवण्यास मदत करतात. तसेच केस गळतीची समस्येपासून सुटका मिळते.

कोंडा दूर करते

कॉफी पावडर टाळूची चांगली सफाई करते, ज्यामुळे टाळूच्या पृष्ठभागावर जमा झालेला कोंडा सहज निघून जातो.

घामामुळे केसातून दुर्गंधी येते, केस चिकट होतात? २ सोपे उपाय, वारंवार केस धुण्याची गरजच भासणार नाही

नैसर्गिक डाय करते

कॉफीच्या पाण्याने केस धुतल्याने केसांचा रंग गडद होतो. जर आपण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर, कॉफी हेअर मास्क किंवा कॉफीने हेअर वॉश करू शकता. याचा नियमित वापर केल्याने पांढरे केस हळूहळू काळे होऊ लागतात.

कसे वापरायचे

एक स्ट्राँग कॉफी तयार करा, व याचे पाणी थंड होऊ द्या. आता हे पाणी डोक्याला लावा. याशिवाय तळहातावर कॉफी पावडर घेऊन संपूर्ण डोक्यावर ४ ते ५ मिनिटे लावून मसाज करा. यानंतर आपले डोके धुवा, व केस कोरडे करा. हा उपाय आठवड्यातून २ वेळा करा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स