हिवाळा सुरू झाला की, त्वचेच्या समस्यांसोबतच केसांची एक मोठी समस्या खूपच त्रास देते, ती म्हणजे केसांत भरपूर कोंडा होणे. अनेकदा थंड हवा आणि कोरडेपणा वाढल्यामुळे केसांतील आर्द्रता कमी होते आणि स्काल्प कोरडी होऊन कोंडा केसांतून पडू लागतो. हा कोंडा फक्त डोक्यांत खाज आणि जळजळ होण्याचे मुख्य कारणं असते, इतकेच नाही तर खांद्यावर पडलेल्या कोंड्याच्या पांढऱ्याशुभ्र बारीक कणांमुळे अनेकदा लाजिरवाणे देखील वाटते. काही केल्या हा कोंडा जाण्याचे नावच घेत नाही, अशी तक्रार अनेकजणी करतात. यासाठी महागडे अँटी-डँड्रफ शाम्पू वापरूनही निराशाच हाती येते(Coconut Oil & Lemon Juice Use to Reduce Dandruff).
केसांतील हा हट्टी कोंडा घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले तरी, कोंडा काही केल्या केसांतून पूर्णपणे जात नाही. केसातील कोंडा घालवण्यासाठी अनेक नैसर्गिक आणि घरगुती उपाय देखील आपण अगदी सहज घरच्याघरीच करु शकतो. केसातील कोंडा घालवण्याचे हे साधेसुधे उपाय केवळ कोंड्याची समस्या मुळापासून कमी करत नाहीत, तर केसांचे नैसर्गिक आरोग्य आणि चमक टिकवून ठेवण्यासही मदत करतात. हिवाळ्यात केसांतील कोंडा कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय फायदेशीर (reduce dandruff naturally) आणि असरदार ठरतो ते पाहूयात.
केसांतील कोंड्यावर खोबरेल तेल आणि लिंबाचा रस असरदार...
उपयोग करण्याची पद्धत :-
सर्वात आधी दोन चमचे खोबरेल तेल घ्या. आता यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. या दोन्हीच्या एकत्रित मिश्रणाने केसांच्या मुळांना आणि केसांना हलकेच मसाज करा. आता आपल्या हातांनी हलका मसाज करत केसांमध्ये कमीत कमी ३० मिनिटे हे मिश्रण लावा. त्यानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवा. एकदा शाम्पूने केस स्वच्छ धुतल्यावर कोणत्याही वेगळ्या कंडीशनरची गरज भासणार नाही. असे केल्याने केसांतील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.
७ पदार्थ खा वय ४० असेल तरी दिसाल २० वर्षांच्या, चेहऱ्यावर कायम दिसेल चमक आणि तारुण्य टिकेल कायम...
केसांना खोबरेल तेल आणि लिंबाचा रस लावण्याचे फायदे...
१. हिवाळ्याच्या ऋतूंत खोबरेल तेल केसांच्या मुळांना आतून मॉइश्चराईझ करते. असे केल्याने स्काल्पचा कोरडेपणा कमी होतो, जो कोंड्याचे मुख्य कारण आहे.
२. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे स्काल्पवर जमा झालेली घाण आणि कोंड्याचा थर साफ करण्यास मदत करतात.
३. खोबरेल तेल आणि लिंबामध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीचे प्रमाण कमी करतात.
४. लिंबाचा रस लावल्याने डोक्यांत किंवा स्काल्पला येणारी खाज देखील कमी होते.
Web Summary : Winter dandruff can be tackled with a simple home remedy: coconut oil and lemon juice. This mixture moisturizes the scalp, removes buildup, and reduces itchiness, promoting healthy, dandruff-free hair naturally.
Web Summary : सर्दियों में रूसी की समस्या से नारियल तेल और नींबू के रस से छुटकारा पाया जा सकता है। यह मिश्रण स्कैल्प को मॉइस्चराइज़ करता है, गंदगी हटाता है और खुजली कम करता है, जिससे स्वस्थ और रूसी मुक्त बाल मिलते हैं।