वाढत्या वयोमानानुसार केस पांढरे होणे सहाजिक आहे, परंतु ऐन तारुण्यात अवघी तिशी ओलांडली नाही तरी केस पांढरे होण्याची समस्या सतावते. आपल्यापैकी बऱ्याचजणांचे केस तारुण्यात पांढरेशुभ्र होतात. अकाली अशा प्रकारे ऐन तारुण्यात केस पांढरे होऊ लागले की थोडे लाजिरवाणे वाटते. अशा परिस्थितीत, डोक्यावरील पांढरे केस लपवण्यासाठी आपण अनेक (chutney recipe for black hair growth) उपाय करतो. कुणी केसांना (eat curry leaves and sesame chutney daily for black hair) डाय लावतात तर कुणी रंग इतकंच नाही तर पांढरे केस दिसू नयेत म्हणून केसांवर वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या, आर्टिफिशियल ट्रिटमेंट किंवा पार्लरमध्ये जाऊन उपाय केले जातात. या सगळ्या उपायांचा परिणाम केसांवर तात्पुरता असतो, एका ठराविक कालांतराने आपले केस पुन्हा पहिल्यासारखे पांढरे होऊ लागतात(curry leaves and black sesame seeds chutney for white hair).
ऐन तिशीतच, पिकलेल्या केसांचा पांढरेपणा लपवण्यासाठी प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक खास उपाय शेअर केला आहे. त्यांनी सांगितलेला खास उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून, केसांच्या मुळांपासून त्यांना पांढरे होण्यापासून रोखू शकतो. केसांसाठी आर्टिफिशियल किंवा कोणत्याही महागड्या ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा, या घरगुती नैसर्गिक उपायांचे परिणाम अधिक फायदेशीर ठरतात. पांढरे केस लपवण्यापेक्षा हा साधासुधा घरगुती उपाय केल्यास केस गळणे, अकाली पांढरे होणे या समस्या कमी होऊन केस अधिक काळ काळे, मजबूत आणि निरोगी होतात.
पोषणतज्ज्ञ काय सांगतात?
पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, आपल्या केसांना 'मेलानिन' नावाच्या रंगद्रव्यामुळे काळा रंग येतो. जेव्हा शरीरात कॉपर आणि आयर्न यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते, तेव्हा मेलानिनचे उत्पादन कमी होते आणि केस लवकर पांढरे होऊ लागतात. याचाच अर्थ, केसांच्या आरोग्यासाठी शरीरात कॉपर आणि आयर्न योग्य प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहे.
पांढरे केस डोक्यावर परत उगवणारच नाहीत...
लवनीत बत्रा यांच्या मते, केसांना रंग देण्याऐवजी त्यांना योग्य पोषण देऊन पांढरे होण्यापासून रोखता येते. यासाठी काळे तीळ आणि कढीपत्त्याची चटणी खूप फायदेशीर ठरते, कारण त्यात कॉपर आणि आयर्न या दोन्ही पोषक तत्वांचे प्रमाण चांगले असते.
ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरत नाही ? टिफिनमध्ये न्या २ पदार्थ - झोप अजिबातच येणार नाही...
चटणी कशी तयार करायची ?
१. काळे तीळ हलका सुगंध येईपर्यंत कोरडे भाजून घ्या.
२. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडे तूप किंवा कोल्ड-प्रेस्ड तेल गरम करा.
३. या पॅनमध्ये मूठभर कढीपत्ता, थोडे जिरे आणि लसूण घालून परतून घ्या.
४. आता त्यात थोडे खोबरे आणि चिंच घालून मिक्स करा.
५. शेवटी, हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात एकत्रित करून बारीक वाटून घ्या.
पौष्टिक अशी औषधी चटणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही चटणी डोसा, इडली किंवा चपातीसोबत खाऊ शकता.
केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...
केसांमध्ये नेमका फरक कधी दिसेल ?
पोषणतज्ज्ञ लवलीन बत्रा सांगतात की, ही चटणी नियमित खाल्ल्यास तुम्हाला फक्त चार आठवड्यांतच तुमचे केस मजबूत झाल्याचे दिसेल आणि केस तुटण्याचे प्रमाणही कमी होईल. सहा महिन्यांनंतर, पांढरे केस कमी झालेले दिसतील आणि तुमचे केस अधिक दाट व निरोगी होतील. कॉपर आणि आयर्न यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त अशी ही चटणी केसांच्या मुळांना आतून पोषण देते. ही चटणी तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास तुम्ही नैसर्गिकरित्या केसांचा रंग दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता.