Join us

पुन्हा नव्याने केस उगवण्यासाठी कोणतं तेल लावावं? करा तेलाने मस्त चंपी - केस वाढतील जोमाने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 15:05 IST

castor oil vs coconut oil for hair growth : which oil is best for new hair growth : best oil for hair regrowth naturally : hair growth tips with natural oils : डोक्यावर नवीन केस उगवण्यासाठी कोणत्या तेलाने मसाज करणं फायदेशीर....

आजकाल केसांशी संबंधित अनेक समस्या बहुतेकांना सतावतात. सध्या केस गळणे आणि टक्कल पडणे ही समस्या पुरुषांप्रमाणेच महिलांमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. या समस्येत केस गळून पडतात आणि हळूहळू केसांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने टक्कल पडू लागते. डोक्यावरील काही भागातील केसगळती होऊन टक्कल पडले तर अनेकदा ही खूपच लाजिरवाणी गोष्ट वाटते. केस विरळ झाल्यामुळे अनेकजणी चिंतेत असतात आणि डोक्यावर नवीन केस उगवण्यासाठी अनेक उपाय शोधत असतात(which oil is best for new hair growth).

केसांची काळजी घेण्यासाठी भारतीय परंपरेत तेलाचा वापर हा एक महत्त्वाचा भाग आहे. दोन तेलं, जी केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी फारच बहुगुणी मानली जातात ती म्हणजे खोबरेल तेल आणि एरंडेल तेल. बाजारात अनेक हेअर ऑइल्स उपलब्ध असले तरी नैसर्गिक तेलांप्रमाणे परिणामकारक दुसरा पर्याय नाही. पण नेमकं एरंडेल तेल आणि खोबरेल तेल यापैकी कोणतं तेल, केस पुन्हा नव्याने उगवण्यासाठी जास्त उपयोगी ठरतं? हा प्रश्न अनेकांना पडतो. दोन्ही तेलं केसांना पोषण देतात, पण त्यांच्या गुणधर्मात थोडा फरक आहे. या दोन नैसर्गिक तेलांपैकी कोणतं तेल डोक्यावर नवीन केस उगवण्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणत्या प्रकारे वापरल्यास जास्त (castor oil vs coconut oil for hair growth) फायदा होतो ते पाहूयात... 

१. एरंडेल तेल केसांसाठी कसे आहे फायदेशीर ?

एरंडेल तेलात रीसिनोलेक अ‍ॅसिड असतं, जे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून रक्ताभिसरण सुधारतं आणि नवीन केस वाढवण्यात मदत करतं. हे तेल जंतुनाशक आणि बुरशीनाशक गुणधर्म असलेले असल्यामुळे स्काल्पवरील इन्फेक्शन कमी होतं आणि केसगळती नियंत्रित करता येते. एरंडेल तेलाने नियमित मसाज केल्यास केस दाट होतात, तुटणे थांबते आणि नैसर्गिक काळेपणा टिकून राहतो. जाडसर टेक्स्चरमुळे हे तेल स्कॅल्पमध्ये खोलवर शोषून घेतलं जात आणि केसांच्या मुळांना पोषण देते यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते. 

दिवाळीसाठी घ्या खास 'कलरफुल' मीनाकारी बांगड्या! घरच्या लक्ष्मीचे हात दिसतात देखणे, पाहा डिझाइन्स...

२. खोबरेल तेल केसांसाठी कसे आहे फायदेशीर ?

खोबरेल तेलात व्हिटॅमिन 'ई' आणि नैसर्गिक फॅटी अ‍ॅसिड असतात जे केसांना नैसर्गिक चमक देतात. खोबरेल तेल डोक्याच्या त्वचेला ओलावा देते, कोंडा आणि खाज येणे कमी करते. हे तेल केसांच्या मुळांमधील प्रोटीन टिकवून ठेवते, ज्यामुळे केस तुटत नाहीत. नियमित वापराने हे तेल केसांच्या वाढीस मदत करते  आणि केसांना मऊपणा देते.

महागड्या क्रीम्स, स्किनकेअर रूटीन फॉलो करूनही येतात पिंपल्स! 'हे' आहे कारणं - रोज झोपताना करता १ चूक...

३. नवीन केस उगवण्यासाठी कोणतं तेल आहे जास्त फायदेशीर ? 

जर केस खूपच गळत असतील, पातळ झाले असतील आणि नवीन केस उगवावेत यासाठी एरंडेल तेल (Castor Oil) अधिक फायदेशीर ठरते. पण जर तुम्हाला केस मऊ, चमकदार आणि निरोगी ठेवायचे असतील तर खोबरेल तेल (Coconut Oil) उत्तम पर्याय आहे. सर्वोत्तम परिणामांसाठी दोन्ही तेलांचे एकत्रित मिश्रण  करून वापरणं हा सर्वोत्तम उपाय मानला जातो.

४. केसांसाठी तेल वापरण्याची पद्धत :-

खोबरेल तेल व एरंडेल समान प्रमाणात मिसळा. हे तेल कोमट गरम करून बोटांच्या टोकांनी डोक्यावर हलक्या हाताने मसाज करा. १ ते २ तास ठेवून सौम्य शॅम्पूने धुवा. आठवड्यातून २ वेळा वापरल्यास काही आठवड्यांत फरक दिसतो. या दोन्ही तेलांच्या मिश्रणाच्या नियमित वापरामुळे केसगळती कमी होते आणि केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळून नवीन, दाट आणि मजबूत केस उगवण्यास मदत होते. दोन्ही तेलं केस वाढवण्यासाठी उत्तम आहेत, पण एरंडेल तेल नवीन केस उगवण्यासाठी थोडं अधिक फायदेशीर आहे, तर खोबरेल तेल केसांना पोषण आणि चमक देण्यासाठी योग्य आहे. नियमित वापर, संतुलित आहार आणि ताणतणाव कमी ठेवणं हेही  उपाय नवीन केस उगवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Best oils for hair regrowth: Coconut vs Castor, usage and benefits.

Web Summary : Battling hair fall? Coconut and castor oils offer solutions. Castor oil stimulates growth, while coconut oil nourishes and adds shine. Combining both maximizes benefits for thicker, healthier hair. Regular use and a healthy lifestyle are key.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय