Join us
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुंदर अस्सल संबळपुरी साडी, पाहा संबरपुरी हातमाग साडीची सुंदर गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 15:56 IST

Budget 2026: द्रौपदी मुर्मू यांनी नेसलेली साडी नेमकी कशी होती हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे..

ठळक मुद्देही साडी जर प्युअर सिल्क प्रकारात तुम्हाला घ्यायची असेल तर तिची किंमत कमीतकमी ६ हजार असते.

प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणारं आर्थिक बजेट १ फेब्रुवारी रोजी सादर झालं. या बजेटने कोणाला काय दिलं, कोणाला काय नाही मिळालं याची चर्चा तर दरवर्षीच रंगते, तशी ती यावर्षीही झाली. पण त्यासोबतच आणखीही एक चर्चा रंगली आणि ती म्हणजे आपल्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेसलेल्या साड्यांची. त्यापैकी अर्थमंत्र्यांनी नेसलेली साडी तर कांजीवरम होती. गुलाबी साडी आणि काळे काठ अशी सुरेख साडी त्यांना खूप शोभून दिसत होती. त्याचप्रमाणे द्रौपदी मुर्मू यांनी नेसलेल्या संबळपुरी साडीचीही खूप चर्चा होती.(President Draupadi Murmu wore sambalpuri saree on budget 2026)

 

संबळपुरी साडी ही मुळशी ओडिसाची. काही ठिकाणी ती साडी ओरिसा सिल्क म्हणूनही ओळखू येते. या साडीचे काठ खूप मोठेही नसतात आणि अगदी नाजूकही नसतात. पण त्यांच्यावरची नक्षी एकसारखी असते. त्यामुळे काठांवरूनच संबळपुरी साडीची ओळख होते. ही साडी म्हणजे ओडिसाची ओळख आहे. तिथल्या संबळपूर प्रांतात ही साडी प्रामुख्याने तयार होते आणि आता बारगाह, बालगिर, बौध, सोनेपूर या जिल्ह्यांमध्येही हातमाग व्यवसाय वाढत आहे. शंख, चक्र, फुलं, हत्ती अशी नक्षी बहुतांश करून या साडीवर दिसून येते.

 

राष्ट्रपतींनी जी साडी नेसली होती त्यावर हत्ती होते, हत्तींची अंबारी होती. त्याचप्रमाणे वारली कलेचा नमुनाही त्यांच्या साडीवर दिसून आला. गुलाबी आणि ग्रे अशा दोन रंगात असणाऱ्या त्या साडीचे काठ आणि पदर गुलाबी रंगाचे होते. गळ्यात नाजूक साखळी आणि हातात बांगडी असे मोजकेच दागिने त्यांच्या अंगावर होते. सध्या लग्नाचा सिझन असल्यान संबळपुरी साड्यांचे बरेच रंग आणि प्रकार बाजारात पाहायला मिळतात. ही साडी जर प्युअर सिल्क प्रकारात तुम्हाला घ्यायची असेल तर तिची किंमत कमीतकमी ६ हजार असते. अतिशय सोबर आणि डिसेंट लूक देणारी एक तरी संबळपुरी साडी आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी.  

English
हिंदी सारांश
Web Title : Budget 2026: President Murmu's Sambalpuri saree featuring elephants sparked discussion.

Web Summary : President Murmu's Sambalpuri saree, a dual-toned Odisha handloom, became a talking point alongside the budget. The saree featured elephant motifs and Warli art, showcasing Odisha's rich textile heritage. Sambalpuri sarees, known for unique designs, are a popular choice for their sober and decent look.
टॅग्स :अर्थसंकल्प २०२६साडी नेसणेद्रौपदी मुर्मूनिर्मला सीतारामन