श्रावणी बॅनर्जी
आपण कुठले रंग वापरायचे हे पूर्वी स्किन कलरवर ठरत असे. सावळ्या मुली गडद रंगांचे कपडे घालत नसत. गहू वर्णीय सेमी गडद घेत, पण लाल, काळा, सफेद, गुलाबी, हिरवा रंग म्हणजे जणू गोऱ्या रंगांचीच मक्तेदारी. मात्र आता ही बुरसटलेली विचारसरणी बाजूला ठेवत तरुणाईची फॅशन निऑन कलर्सनी सजली आहेत. निऑन कलर्स इन आहेत. हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी, लाल असे चमकणारे रंग. आता लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाणं बंद असलं तरी झूम मिटिंगा, फेसटाइम, इन्स्टा तर सुरुच आहे.कधी गळ्यातील बिडसचा नेकलेस, तर कधी हातातील ब्रेसलेट आणि बांगडय़ांच्या रूपात. तर कधी केसांवरील हेअरबॅंड ते मोबाईल कव्हर. अगदी उन्हाळ्यातही निऑनची चलती आहे. लाल,काळा, गुलाबी, सफेद, सोनेरी, चंदेरी या कॉमन कलर्स सोबत आत्ता निऑन पिंक, निऑन ग्रिन, निऑन यलो, निऑन ब्ल्यू असे हेअरबँड वापरले जातात.