Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केसांतील डँड्रफ आणि खाज होईल गायब! ब्राह्मी तेलाचा असरदार उपाय - केस होतील लांबसडक, चमकदार...

केसांतील डँड्रफ आणि खाज होईल गायब! ब्राह्मी तेलाचा असरदार उपाय - केस होतील लांबसडक, चमकदार...

brahmi hair oil for dandruff : benefits of brahmi oil for dandruff : how to use brahmi oil for dandruff : ब्राह्मी तेल नेमके कसे वापरायचे, जेणेकरून केसांमधील डँड्रफ पूर्णपणे नाहीसा होईल याचा खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2025 15:28 IST2025-10-26T15:16:41+5:302025-10-26T15:28:32+5:30

brahmi hair oil for dandruff : benefits of brahmi oil for dandruff : how to use brahmi oil for dandruff : ब्राह्मी तेल नेमके कसे वापरायचे, जेणेकरून केसांमधील डँड्रफ पूर्णपणे नाहीसा होईल याचा खास उपाय...

brahmi hair oil for dandruff benefits of brahmi oil for dandruff how to use brahmi oil for dandruff brahmi oil for dry scalp and dandruff | केसांतील डँड्रफ आणि खाज होईल गायब! ब्राह्मी तेलाचा असरदार उपाय - केस होतील लांबसडक, चमकदार...

केसांतील डँड्रफ आणि खाज होईल गायब! ब्राह्मी तेलाचा असरदार उपाय - केस होतील लांबसडक, चमकदार...

केसांमध्ये डँड्रफ होणे ही फारच कॉमन समस्या आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांना डोक्यांत डँड्रफ होण्याची समस्या सतावते. एकदा का केसांमध्ये डँड्रफ झाला की तो जाता - जात नाही. काहीवेळा तर केसांमधील डँड्रफचे प्रमाण इतके वाढते की, केसांमधील डँड्रफ चक्क खांद्यावर पडू लागतो. केसांमधील डँड्रफ वाढू लागला की, केसांचे नैसर्गिक सौंदर्य व लूक सगळंच बिघडतं. केसांमधील डँड्रफ कमी करण्यासाठी आपण बरेच वेगवेगळे उपाय करुन पाहतो. केसांमधील डँड्रफ (how to use brahmi oil for dandruff) कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये ब्राह्मीचे तेल सर्वात रामबाण उपाय म्हणून फायदेशीर ठरते. ब्राह्मीचे तेल स्काल्पला पोषण देऊन कोरडेपणा कमी करते, केसांच्या मुळांना बळकट करते आणि डँड्रफची समस्या मुळापासून दूर करते. जर तुम्हालाही वारंवार डँड्रफची समस्या सतावत असेल, तर ब्राम्ही तेलाचा वापर हा नैसर्गिक आणि दीर्घकाळ सहज करता येणारा फायदेशीर उपाय ठरू शकतो. ब्राम्हीतील नैसर्गिक अँटी-फंगल आणि कूलिंग गुणधर्म टाळूला शांत करतात आणि केसांची मुळे मजबूत करतात(brahmi oil for dry scalp and dandruff).

घरगुती उपायांमध्ये ब्राम्ही तेल केसांसाठी वरदान मानले जाते. हे तेल केसांच्या वाढीसोबतच डँड्रफसारख्या समस्येवरही असरदार ठरते. ब्राम्ही तेलाचा  नियमित वापर केल्यास स्काल्पवरील कोरडेपणा, खाज आणि डँड्रफचा त्रास हळूहळू कमी होतो. ब्राह्मी तेल नेमके कसे वापरायचे, जेणेकरून केसांमधील डँड्रफ पूर्णपणे नाहीसा होईल याचा खास उपाय पाहूयात... 

डँड्रफ कमी करण्यासाठी ब्राह्मी तेलाचा वापर कसा करावा ?

केसांतील डँड्रफचे प्रमाण कमी करण्यासाठी, २ चमचे ब्राम्ही तेल, १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा नारळ तेल एकत्र मिसळा. हे मिश्रण हलके गरम करा. आता हे सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे, त्यानंतर बोटांच्या टोकांनी हळूहळू हे तेल केसांच्या मुळांमध्ये लावून हलक्या हाताने मसाज करा. मग ३० ते ४० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुवा.

आलिया भट्टचा नवा लूक, लुंगी-कुर्ता ड्रेसचा नवा फॅशन ट्रेंड! घालून पाहा, दिसाल अतिशय सुंदर...

केसांच्या वाढीसाठी ब्राम्ही तेल... 

केसांच्या वाढीसाठी ब्राम्ही तेलाचा हेअर मास्क बनवू शकता. यासाठी २ चमचे ब्राम्ही तेल, १ चमचा आवळा पावडर आणि १ चमचा एलोवेरा जेल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि ३० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

केसांवर ब्राम्ही तेल लावण्याचे फायदे.... 

ब्राम्ही तेलात अँटिऑक्सिडंट्स, अल्कलॉइड्स आणि नैसर्गिक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. हे तेल लावल्याने स्काल्पमधील रक्तप्रवाह सुधारतो. थंडावा देणाऱ्या गुणधर्मांमुळे हे स्कॅल्पला शांत ठेवते आणि डँड्रफ तयार करणाऱ्या बॅक्टेरिया व फंगसचा नायनाट करते. तसेच हे तेल नवीन केसांच्या वाढीस मदत करते.

Web Title : ब्राह्मी तेल: रूसी और खुजली का असरदार उपाय, बालों को बढ़ाए

Web Summary : ब्राह्मी तेल रूसी के लिए एक शक्तिशाली घरेलू उपाय है, जो खोपड़ी को पोषण देता है और बालों की जड़ों को मजबूत करता है। नियमित उपयोग से सूखापन, खुजली और रूसी कम होती है। ब्राह्मी तेल, नींबू के रस और नारियल तेल का मिश्रण धोने से पहले 30-40 मिनट तक लगाया जा सकता है। यह बालों के विकास को भी बढ़ावा देता है।

Web Title : Brahmi Oil: Effective Remedy for Dandruff and Itch, Promotes Hair Growth

Web Summary : Brahmi oil is a potent home remedy for dandruff, nourishing the scalp and strengthening hair roots. Regular use reduces dryness, itchiness, and dandruff. A mix of Brahmi oil, lemon juice, and coconut oil can be applied for 30-40 minutes before washing. It boosts hair growth too.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.