Join us

लांब-घनदाट केसांचं सिक्रेट! अभिनेत्री रेखा वयाच्या सत्तरीत लावते 'हा' हेअर मास्क, केस राहतात काळेभोर-गळतही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2025 16:51 IST

Rekha hair care secret: Rekha hair mask recipe: Rekha beauty secrets at 70: रेखा आपल्या केसांची काळजी कशी घेते. तिचे हेअर सिक्रेट काय आहे जाणून घेऊया.

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते.(Rekha hair care secret) तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. वयाच्या ७० व्या वर्षी देखील तिची ब्यूटी आजही तितकीच सुंदर आणि सोज्वळ दिसते. तिचे लांबसडक काळेभोर केस आजही अनेकांच्या मनाचा ठाव घेतात. (Rekha hair mask recipe)सध्याच्या जीवनशैलीत अगदी कमी वयातच आपल्याला केसगळती आणि केसांच्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो.(How Rekha maintains black hair) परंतु, वयाच्या ७० व्या वर्षी देखील रेखाचे केस काळेभोर आणि लांबसडक आहेत. तितकेच तिचे केस मजबूतही आहेत. रेखा आपल्या केसांची काळजी कशी घेते. तिचे हेअर सिक्रेट काय आहे जाणून घेऊया. (Home remedies for black and shiny hair like Rekha)

रोजच्या 'या' ६ चुकांमुळे त्वचा होते खराब, ऐन तारुण्यात चेहऱ्यावर सुरकुत्या-ओघळतात गाल

तिने एका मुलाखतीत सांगितले की, ती केसांसाठी महागडे उत्पादने वापरत नाही. तसेच केसांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करते. केसांसाठी अंडी, दही आणि मधापासून तयार केलेला हेअर मास्क लावते. हा हेअर मास्क केसांना खोलवर पोषण देतो. तसेच केस मजबूत, जाड आणि चमकदार बनवतो. 

हेअर मास्क कसा बनवाल? 

हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एक अंडे चांगले फेटून घ्या. त्यात थोडे दही घालून चांगले मिसळा. नंतर त्यात दोन चमचे मध घाला आणि पेस्ट तयार करा.हेअर मास्क तयार होईल. हा मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. आणि २० मिनिटांनी शॅम्पूने केस धुवा. 

वयाच्या चाळिशीतही पांढरे केस होतील काळे, तेलात मिसळा एक गोष्ट- केसगळतीही थांबेल, सोपा घरगुती उपाय

हेअर मास्क लावण्याचे फायदे

हा हेअर मास्क केसांना मऊ आणि चमकदार बनवतो. तसेच केसांना आवश्यक प्रथिने आणि ओलावा देतो. मास्कमध्ये असलेले अंडे केसांना प्रथिने पुरवते. ज्यामुळे केस मजबूत होतात. दही केसांना कंडिशनिंग करते. मध टाळूमधला ओलावा आणि थंडपणा राखण्यासाठी प्रभावी आहे. तसेच आठवड्याचून एकदा केसांना नारळाच्या तेलाने मालिश केल्यास आपले केस दाट-लांबसडक होण्यास मदत होतील.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी