Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केसगळती होऊन टक्कल पडायच्या आधी लावा हे 'काळं तेल'! केसांच्या समस्यांवर एकच उपाय - वाढतील भराभर...

केसगळती होऊन टक्कल पडायच्या आधी लावा हे 'काळं तेल'! केसांच्या समस्यांवर एकच उपाय - वाढतील भराभर...

Homemade Black Hair Oil : how to make black hair oil at home : black hair oil recipe for rapid hair growth : घरातच उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने केसांसाठी गुणकारी 'काळं तेल' तयार करता येतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 18:28 IST2026-02-13T14:03:07+5:302026-02-16T18:28:13+5:30

Homemade Black Hair Oil : how to make black hair oil at home : black hair oil recipe for rapid hair growth : घरातच उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने केसांसाठी गुणकारी 'काळं तेल' तयार करता येतं.

black hair oil recipe for rapid hair growth Homemade Black Hair Oil how to make black hair oil at home | केसगळती होऊन टक्कल पडायच्या आधी लावा हे 'काळं तेल'! केसांच्या समस्यांवर एकच उपाय - वाढतील भराभर...

केसगळती होऊन टक्कल पडायच्या आधी लावा हे 'काळं तेल'! केसांच्या समस्यांवर एकच उपाय - वाढतील भराभर...

केसांच्या अनेक समस्यांपैकी सगळ्यांनाच सर्वात जास्त सतावणारी समस्या म्हणजे केसगळती आणि केसांची वाढ खुंटणे. केसगळती एकदा सुरु झाली की थांबण्याचे नावचं घेत नाही... अनेकदा तर, भरपूर प्रमाणात केस गळून टक्कल पडेल की काय अशी भीती वाटते. आजकाल आरशासमोर उभं राहिल्यावर विरळ होणारे केस आणि कंगव्यात अडकलेले केसांचे पुंजके पाहून आपल्याला फार दुःख होत. सतत होणारी केसगळती थांबवून केसांच्या वाढीस चालना देणारा ठोस घरगुती उपाय करणेच अधिक फायदेशीर ठरते. केसगळती थांबवून त्या जागी टक्कल न पडता नवीन केसांची वाढ भराभर व्हावी यासाठी अस्सल नैसर्गिक व घरगुती काळ तेल म्हणजे अमृतच जणू...(Homemade Black Hair Oil).

आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या नैसर्गिक औषधी घटकांच्या मदतीने केसांसाठी गुणकारी आणि परिणामकारक काळं तेल तयार करता येतं. केसांसाठी फायदेशीर असणारं 'काळं तेल' कोणत्याही केमिकलपासून बनवलेलं नसून, स्वयंपाकघरातील औषधी घटकांपासून तयार केल्यामुळे आपण अगदी बिनधास्तपणे ते वापरू शकतो. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन केसगळती कमी करण्यास आणि नवीन केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करते. केसगळती थांबवण्यासाठी (how to make black hair oil at home) आणि केसांची वाढ होण्यासाठी घरच्याघरीच औषधी व घरगुती काळं तेल (black hair oil recipe for rapid hair growth) कसं तयार करायचं, त्याचे फायदे काय आहेत आणि ते योग्य पद्धतीने कसं वापरायचं, ते पाहूयात... 

केसांसाठी काळं तेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य... 

१. मेथी दाणे - १ टेबलस्पून
२. तांदुळ - १ टेबलस्पून
३. कलोंजी - १ टेबलस्पून
४. बदाम - ३ ते ४ 
५. खोबरेल तेल - १ कप 

काळं तेल कसं तयार करायचं ? 

काळं तेल तयार करण्यासाठी सर्वात आधी पॅन व्यवस्थित गरम करुन घ्यावा. मग या पॅनमध्ये, मेथी दाणे, तांदुळ, कलोंजी, बदाम असे सगळे घटक एकत्रित घालावेत. चमच्याने हे सगळे घटक हलवत भाजून घ्यावेत. या सगळ्या घटक पदार्थांचा नैसर्गिक रंग बदलून जोपर्यंत संपूर्णपणे काळा होत नाही तोपर्यंत हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यावेत. त्यानंतर हे सगळे पदार्थ एका डिशमध्ये काढून थोडे थंड करून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे सगळे पदार्थ घालून त्याची थोडी जाडसर भरड होईल अशी पूड तयार करुन घ्यावी. ही तयार पूड एका काचेच्या बाटलीत भरुन मग त्यात कपभर खोबरेल तेल ओतावे.  मग या बाटलीचे झाकण लावून २४ तासांसाठी ही पावडर तेलात व्यवस्थित भिजू द्यावी, त्यानंतरच हे तेल वापरावे. 

लाडक्या लेकीसाठी ‘पैठणी मॅक्सी गाऊन!’-इवलीशी लेक दिसेल परीसारखी-न टोचणारा पारंपरिक स्टायलिश लूक....

डायबिटीसमध्ये भात खा बिंधास्त, 'नो टेन्शन'! 'या' स्मार्ट पद्धतीने भात खाल्ला तर ना शुगर वाढेल ना वजन...

या तेलाचा वापर कसा करावा ? 

हे तेल केसांवर लावताना, तेल आणि त्यातील बारीक पूड असे दोन्ही घटक एकत्रित घेऊन ते केसांवर लावावे. हे तेल केस आणि स्काल्पला बोटांनी लावून ५ ते १० मिनिटे मसाज करावा. रात्रभर हे तेल केसांवर तसेच राहू द्यावे दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. 

हे तेल केसांसाठी वापरण्याचे फायदे... 

१. मेथी दाणे :- मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केसगळती रोखण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. केसांच्या मुळांना मजबुती मिळते आणि केसांमधील कोंडा मुळापासून नष्ट करण्यास मदत करते. यातील लेसिथिन मुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते.

२. बदाम :- बदाम हे व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ॲसिड्सचा खजिना आहे. बदाम केसांच्या टोकांना फाटे फुटण्यापासून बचाव करते. बदामाच्या पोषणामुळे केस मऊ, रेशमी आणि दाट होतात. बदाम स्काल्पची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते.

३. कलोंजी :- कलौंजी केसांच्या मुळांना नवजीवन देते, ज्यामुळे टक्कल पडलेल्या जागी नवीन केस येण्यास मदत होते. तसेच, केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी कलौंजी अत्यंत गुणकारी आहे.

४. तांदूळ :- तांदळामध्ये अमिनो ॲसिड्स आणि इनोसिटॉल नावाचे घटक असतात. तांदूळ केसांची लवचिकता टिकवून ठेवतो, केसांचा पोत सुधारतो. यामुळे केसांचा गुंता होत नाहीत आणि लांब सडक होण्यास मदत होते. केसांच्या वाढीचा वेग वाढवण्यासाठी फायदेशीर असते. 

५. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांच्या आतपर्यंत जाऊन पोषण देते. हे अँटी-बॅक्टेरियल असल्याने स्काल्पला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव करते. हे नैसर्गिकरीत्या केसांना कंडिशनिंग करते आणि त्यांना तुटण्यापासून वाचवते.


Web Title : बालों के लिए काला तेल: बालों का झड़ना और गंजापन रोके

Web Summary : बाल झड़ने से परेशान हैं? मेथी, चावल, कलौंजी, बादाम और नारियल तेल से बना यह घरेलू काला तेल, स्कैल्प को पोषण देता है, बालों की जड़ों को मजबूत करता है और बालों के तेजी से विकास को बढ़ावा देता है। सर्वोत्तम परिणामों के लिए इसे रात भर इस्तेमाल करें।

Web Title : Black Oil for Hair Growth: Prevents Hair Fall & Baldness

Web Summary : Struggling with hair fall? This homemade black oil, a blend of fenugreek, rice, kalonji, almonds, and coconut oil, nourishes the scalp, strengthens hair roots, and promotes rapid hair growth. Use it overnight for best results.