lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > टिकलीचा ट्रेंड लै भारी! आता पुन्हा मोठी टिकली लावण्याची फॅशन! बघा, कोण कशी टिकली लावते..

टिकलीचा ट्रेंड लै भारी! आता पुन्हा मोठी टिकली लावण्याची फॅशन! बघा, कोण कशी टिकली लावते..

टिकली लावणं म्हणजे काकूबाई... हा समज कधीच मागे पडला आहे. स्टायलिश लूक करण्यासाठी लावा स्टायलिश टिकली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 07:43 PM2021-10-07T19:43:03+5:302021-10-07T19:43:29+5:30

टिकली लावणं म्हणजे काकूबाई... हा समज कधीच मागे पडला आहे. स्टायलिश लूक करण्यासाठी लावा स्टायलिश टिकली.

Bindi's trend again! Now it's time to put on a big tikli again! | टिकलीचा ट्रेंड लै भारी! आता पुन्हा मोठी टिकली लावण्याची फॅशन! बघा, कोण कशी टिकली लावते..

टिकलीचा ट्रेंड लै भारी! आता पुन्हा मोठी टिकली लावण्याची फॅशन! बघा, कोण कशी टिकली लावते..

Highlightsटिकली म्हणजे भारतीय संस्कृतीची एक ओळख. ही ओळख कायम टिकून रहावी म्हणून नॉर्थ अमेरिकेत राहणाऱ्या तरूणी भारतीय मुला- मुलींनी वर्ल्ड बिंदी डे ची सुरूवात केली आहे.

आजच्या मॉडर्न मुली टिकली लावतंच नाहीत, अशी तक्रार घराघरातल्या ज्येष्ठ महिला करत असतात. पण मागील काही वर्षांपासून हा ट्रेण्ड पुर्णपणे बदलला आहे आणि टिकलीचे मार्केट पुन्हा एकदा चांगलेच वधारले आहे. नवरात्री म्हणजे तर महिलांसाठी पर्वणी. प्रत्येक दिवशी वेगवेगळी स्टाईल आणि वेगवेगळे कपडे. कपडे घेतले की त्यासाेबत ॲक्सेसरीजची खरेदीही आवर्जून केलीच जाते. कारण जोपर्यंत कपड्यांना मिळतेजुळते दागिने मिळत नाहीत, तोपर्यंत आपले कपडे खूलत नाहीत. असंच काहीसं आता टिकलीचंही झालं आहे.  नवरात्रीत तर नटून- थटून घराबाहेर जाताना प्रत्येक क्षण अर्धा मिनिट तरी टिकल्यांची पाकिटे न्याहाळते आणि ड्रेसला, हेअरस्टाईलला शोभेल अशी टिकली शोधून मोठ्या थाटात कपाळावर लावते. मोठ्या टिकलीची फॅशन तर सध्या इन आहेच, पण त्यासोबतच आता नवरात्रीनिमित्त टिकल्यांचे वेगवेगळे प्रकारही बाजारात आले आहेत. 

 

वर्ल्ड बिंदी डे
टिकली म्हणजे भारतीय संस्कृतीची एक ओळख. ही ओळख कायम टिकून रहावी म्हणून नॉर्थ अमेरिकेत राहणाऱ्या तरूणी भारतीय मुला- मुलींनी वर्ल्ड बिंदी डे ची सुरूवात केली आहे. नवरात्रीचा पहिला दिवस वर्ल्ड बिंदी डे म्हणून साजरा करण्यात यावा, असं या तरूणांचं म्हणणं आहे. 

१. स्टोन टिकली.
साधी पांढऱ्या स्टोनची टिकली तर तरूणींची ऑल टाईम फेव्हरेट आहे. कोणत्याही ड्रेसवर मग तो वेस्टर्न असो की ट्रॅडिशनल,,, स्टोन टिकली त्यावर अगदी परफेक्ट सूट होते. यात आता वेगवेगळे कलर उपलब्ध असून प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग स्टोन लावणेही अनेक जणींना आवडते. 

 

२. रंगबिरंगी टिकल्या
मोठ्या आकाराची प्लेन टिकली लावण्याची फॅशन तर सध्या खूपच गाजते आहे. दिपिका पदूकाेनच्या पिकू चित्रपटापासून ही फॅशन आली. जीन्सपासून ते अगदी साडीपर्यंत कशावरहीही टिकली लावता येते. मोठी टिकली म्हणजे काकू बाई असा समज तर आता कधीच मागे पडला आहे. या टिकल्या लावल्याने तुम्ही अजिबातच ओल्ड फॅशन दिसत नाही, उलट अधिकच ट्रेण्डी  दिसू लागता. 

कोणी कशी टिकली लावावी
गोलाकार चेहरा

गोल चेहर्‍यावर लांब टिकल्या खूप उठून दिसतात. 

 

लंबगोलाकार चेहरा
अशा चेहऱ्यावर सगळ्याच प्रकारच्या, कोणत्याही आकाराच्या टिकल्या छानच दिसतात. 

त्रिकोणी चेहरा
अशा चेहऱ्यावर मोठी टिकली जास्त खुलून दिसत नाही. या चेहऱ्यावर छोट्या, बारीक किंवा सिंगल स्टाेन टिकल्या छान दिसतात. 

 

Web Title: Bindi's trend again! Now it's time to put on a big tikli again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.