Join us

भारती सिंग केसांना लावते घरगुती तेल! केस होतील लांबसडक, घनदाट - पाहा तिचे हेअर केअर सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 16:06 IST

Bharti Singh Homemade Hair Oil Recipe : Bharti Singh Hair Fall Control Oil : Homemade Oil for Hair Fall by Bharti Singh : bharti sing made homemade hair oil for hair control : भारती सिंग केसांची खास निगा राखण्यासाठी घरच्याघरीच बनवलेले नेमकं कोणतं तेल वापरते ते पाहा...

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग तिचा अभिनय, कॉमेडी आणि सौंदर्यासाठी देखील तितकीच लोकप्रिय आहे. भारती कायमच आपल्या त्वचेसोबतच केसांची देखील (Bharti Singh Hair Fall Control Oil) विशेष काळजी घेते. सध्याच्या काळात केसांची काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, पण तरीही अनेक सेलिब्रिटी पारंपरिक आणि घरगुती उपायांवर जास्त विश्वास ठेवतात, कॉमेडियन भारती सिंग ही त्यापैकीच एक आहे.  तिच्या सुंदर, लांबसडक, घनदाट केसांसाठी ती खास घरगुती तेलाचा वापर करते(bharti sing made homemade hair oil for hair control).

भारती केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी कोणत्याही महागड्या व आर्टिफिशियल हेअर केअर प्रॉडक्ट्सपेक्षा चक्क घरगुती तेलाचा वापर करणे अधिक पसंत करते. भारती स्वतः सांगते की, ती केसांना एक खास घरगुती तेल लावते. हे तेल बनवायला खूप सोपे आहे आणि त्याचे फायदेही खूप आहेत. हे तेल केसांना पोषण देते, केस गळणे थांबवते आणि त्यांना मजबूत बनवते. भारती केसांची खास निगा राखण्यासाठी घरच्याघरीच बनवलेले नेमकं कोणतं तेल वापरते तसेच तिचे हे सिक्रेट हेअर (Homemade Oil for Hair Fall by Bharti Singh) ऑईल कसे तयार करायचे याची सोपी कृती पाहूयात... 

भारतीचे सिक्रेट हेअर ऑईल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-

१. मेथी दाणे - १ टेबलस्पून २. कडीपत्त्याची पाने - १५ ते २० पाने३. खोबरेल तेल - २ ते ३ कप ४. कांद्याचा रस - ३ ते ४ कप 

तेल बनवण्याची पद्धत... 

जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येने हैराण होत असाल आणि अनेक उपाय वापरून थकून गेला असाल, तर आता वेळ आली आहे एक घरगुती आणि विश्वासार्ह उपाय वापरण्याची. यासाठी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने एक असा देशी उपाय सांगितला आहे, जो तिने स्वतः घरी तयार केला आणि तो वापरल्याने तिची केस गळण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी झाली. विशेष गोष्ट अशी आहे की, या उपायात कोणत्याही महागड्या उत्पादनाचा किंवा रसायनांचा  वापर केलेला नाही. पूर्णपणे नैसर्गिक आणि घरगुती सामग्रीपासून बनवलेले हे तेल केवळ केसांची मुळे मजबूत करत नाही, तर नवीन केसांच्या वाढीस देखील मदत करते.

सर्वात आधी, एका कढईत खोबरेल तेल टाकून ते गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात सर्वात आधी मेथीचे दाणे टाका. त्यानंतर त्यात कांद्याचा रस मिसळा. सर्वात शेवटी, त्यात कढीपत्ता टाका. हे तेल सतत ढवळत राहा. जेव्हा सगळे मिश्रण उकळू लागेल, तेव्हा गॅस बंद करून त्याला थोडा वेळ तसेच राहू द्या. आता काही वेळाने ते थंड झाल्यावर एका सुती कापडाच्या मदतीने गाळून घ्या आणि एका बाटलीत भरून ठेवा.

अशा प्रकारे वापरा घरगुती तेल... 

सर्वात आधी, आपले केस व्यवस्थित विंचरून घ्या. आता बोटांच्या मदतीने हे तेल स्काल्पवर लावा. हे तेल केसांना आणि विशेषतः केसांच्या मुळांना व्यवस्थित लागले आहे याची खात्री करा. तेल लावल्यानंतर एक ते दीड तास तसेच राहू द्या. त्यानंतर, एका सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा.

हे घरगुती औषधी तेल वापरण्याचे फायदे... 

१. मेथी दाणे :- केस गळती कमी करून केसांना मजबुती देतात.२. कडीपत्त्याची पाने :- केसांना पोषण देऊन त्यांना मऊ, लांबसडक आणि मजबूत करतात. ३. खोबरेल तेल :- केसांना पोषण देऊन त्यांना मऊ, लांबसडक आणि मजबूत करते.४. कांद्याचा रस :- केसांची वाढ वेगाने होण्यासाठी आणि स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीभारती सिंग