उन्हाळा सुरु झाला की त्वचेसोबत केसांच्या देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कडक ऊन, घामामुळे होणारी चिडचिड आणि वाढते प्रदूषण यामुळे केसांचे नैसर्गिक सौंदर्य हरवते.(Hair Care Tips) अनेकांना या दिवसांत केसात कोंडा किंवा फाटे फुटण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यात केस प्रचंड कोरडे होतात. (Treatment for split ends without cutting hair) केसांमधील ओलावा कमी झाल्यास ते झाडूसारखे रुक्ष होतात ज्यामुळे केसगळती मोठ्या प्रमाणात वाढते. (Summer hair care routine for oily scalp)
केसांच्या या समस्यांवर मात करण्यासाठी आपण महागडे शाम्पू किंवा पार्लरमधील महागड्या ट्रिटमेंट्सवर हजारो रुपये खर्च करतो. पण केमिकल्समुळे केसांचे नुकसान अधिक होते.(Best summer hair mask for dandruff and split ends) पण आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या अनेक गोष्टी केसांसाठी फायदेशीर ठरतात. ज्या फक्त केसांच्या मुळांना मजबूत करत नाहीत तर त्यांना नैसर्गिक चमक देण्याचे देखील काम करते. उन्हाळ्यात केसांसाठी कोणते २ हेअर मास्क लावायला हवे पाहूया.
चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग होतील कमी, खोबऱ्याच्या तेलात 'अशी' मिसळा तुरटी; ७ दिवसांत दिसेल फरक
उन्हाळ्यात घामामुळे टाळूवर बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे कोंड्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी दही आणि लिंबाचा हेअर मास्क लावा. दही हे नैसर्गिक कंडिशनर आहे, तर लिंबू अँटी-फंगल म्हणून काम करते. यासाठी १ वाटी ताजे दही, १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध घ्या. एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यात लिंबाचा रस आणि मध नीट मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. ३० मिनिटांनी कोमट पाण्याने आणि माईल्ड शाम्पूने केस धुवा. दह्यामुळे केसांना प्रोटीन मिळेल. ज्यामुळे मुळे मजबूत होतात. लिंबू हे केसातील कोंडा काढून टाकण्यास मदत करते. मध केसातील ओलावा टिकवून ठेवते.
कोरफड हे केसांसाठी संजीवनी मानली जाते. उन्हाळ्यात फाटे फुटलेल्या केसांसाठी हा मास्क चांगला आहे. यासाठी आपल्याला ३ ते ४ चमचे ताज्या कोरफडीचा गर, २ चमचे नारळाचे तेल आणि १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्यावी लागेल. कोरफड जेल आणि नारळाचे तेल एकत्र करुन फेटून घ्या. त्यात व्हिटॅमिन ई ऑइल मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या टोकांना व्यवस्थित लावा. १ तास ठेवल्यानंतर केस धुवा. कोरफडीच्या गरात अमिनो अॅसिड्स असतात. जे फाटे फुटलेल्या केसांना रिपेअर करतात. नारळाचे तेल केसांना पोषण देण्याचे काम करते.
उन्हात घराबाहेर पडताना स्कार्फ किंवा टोपीचा वापर करा. ज्यामुळे उन्हापासून केसांचे संरक्षण होईल. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास केस कोरडे पडतात. त्यासाठी दिवसाला किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. उन्हाळ्यात केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नका, यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. नेहमी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.
