प्रत्येक आईला आपल्या मुलीचे केस लांबसडक आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण उन्हाळा सुरू झाला की, कडक ऊन आणि घामामुळे केसांचे फारच नुकसान होते. विशेषतः आपल्या लाडक्या लेकीच्या केसांची काळजी घेणे या दिवसांत आईंसाठी मोठे आव्हान ठरते.उन्हाळ्याचा ऋतू आला की लहान मुलांच्या सुट्ट्यांची मजा तर असतेच, पण त्यासोबतच केसांच्या अनेक समस्याही त्रासदायक ठरतात. विशेषतः लहान मुलींच्या आयांची चिंता उन्हाळ्यात दुपटीने वाढते. कडक ऊन, खेळताना येणारा घाम आणि प्रदूषणामुळे मुलींचे केस चिकचिकीत होणे, स्काल्पला खाज सुटणे किंवा केसांची वाढ थांबणे अशा तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात वाढलेले तापमान केवळ त्वचेसाठीच नाही, तर केसांसाठीही तितकेच हानिकारक असते(best oil for kids hair growth in summer).
लहान मुलींच्या बाबतीत तर ही समस्या (hair growth tips for children) अधिक त्रासदायक ठरते. घामामुळे केसांच्या मुळाशी घाण साचते, ज्यामुळे डोक्यात खाज सुटते आणि परिणामी केसांची नैसर्गिक वाढ थांबते.अनेक आईंना मुलींचे केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी काय करावे, असा प्रश्न पडतो. अशा वेळी योग्य पद्धतीने केसांची निगा राखणे, स्वच्छता ठेवणे आणि केसांना पोषण देणाऱ्या योग्य तेलाचा वापर करणे खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात मुलांच्या केसांची काळजी कशी घ्यावी आणि कोणते तेल वापरल्यास केस निरोगी (how to grow long hair for kids naturally) राहू शकतात, याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात नेमके कोणते तेल वापरावे आणि केस निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहूयात.
उन्हाळ्यात लाडक्या लेकीच्या केसांना नेमकं कोणतं तेल लावावं ?
१. खोबरेल तेल आणि एरंडेल तेल (Coconut Oil & Castor Oil) :- खोबरेल तेलात एरंडेल तेल मिसळून लावल्यास विशेषतः लहान मुलींचे केस निरोगी राहण्यास मोठी मदत होते. मुळात, एरंडेल तेल खूप दाट (घट्ट) असते. त्यामुळे त्यात खोबरेल तेल मिसळल्यामुळे त्याचा दाटपणा थोडा कमी होतो आणि ते केसांना लावणं सोपं जातं. १ चमचा एरंडेल तेल आणि २ चमचे खोबरेल तेल एकत्र करा. हे मिश्रण थोडे कोमट करून घ्या. मुलांच्या स्काल्पवर या तेलाने हलक्या हाताने मसाज करा.
२. बदाम तेल आणि एरंडेल तेल (Almond Oil & Castor Oil) :- बदाम तेल हे व्हिटॅमिन - ई, मॅग्नेशियम आणि फॅटी ॲसिडयुक्त असते. मुलींच्या स्काल्पचे आरोग्य राखण्यासाठी हे अत्यंत गुणकारी आहे. तसेच, केसांना फाटे फुटण्याच्या समस्येवर हे तेल फायदेशीर ठरते. जेव्हा हे तेल एरंडेल तेलात समप्रमाणात मिसळले जाते, तेव्हा तयार होणारे मिश्रण अतिशय हलके होते, जे उन्हाळ्याच्या दिवसांसाठी अगदी योग्य आहे. बदाम तेल आणि एरंडेल तेल समप्रमाणात एकत्रित करा. आठवड्यातून दोनदा रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाने स्काल्पला आणि केसांना हलक्या हाताने मसाज करा.
फक्त २१ दिवस मुलांवर ओरडू नका ! दिसतील ३ बदल, करून तर पाहा 'हा' छोटासा प्रयोग...
३. जोजोबा ऑईल आणि एरंडेल तेल (Jojoba Oil & Castor Oil) :- जोजोबा तेलाचे टेक्श्चर आपल्या शरीरातून नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या तेलासारखेच (सीबम - Sebum) असते. हे तेल केसांना चिकट न करता नैसर्गिकरित्या हायड्रेटेड ठेवण्याचे काम करते. उन्हाळ्याच्या दिवसांत मुलांच्या डोक्याला खूप घाम येतो. अशा परिस्थितीत, जोजोबा ऑईल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावल्यास केसांची वाढ अत्यंत वेगाने होते. घामामुळे होणारा चिकचिकीतपणा टाळून केसांना पोषण देण्यासाठी या दोन्ही तेलांचे मिश्रण वापरणे फायद्याचे ठरते.
Web Summary : Summer heat damages children's hair. Coconut, almond, and jojoba oils, mixed with castor oil, nourish the scalp, promote growth, and combat greasiness. Regular massage keeps hair healthy.
Web Summary : गर्मी में बच्चों के बाल खराब होते हैं। नारियल, बादाम, और जोजोबा तेल, अरंडी के तेल के साथ मिलाकर, खोपड़ी को पोषण देते हैं, विकास को बढ़ावा देते हैं और चिपचिपाहट से लड़ते हैं। नियमित मालिश से बाल स्वस्थ रहते हैं।