वय कितीही असो, केस गळण्याची समस्या सध्या सगळ्यांच सतावते आहे. बदलेली जीवनशैली, चुकीचा आहार, प्रदूषण आणि केमिकलयुक्त शाम्पुमुळे केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही. (Hair Care Tips) बाजारात मिळणारे महागडे तेल, सिरम किंवा टॉनिक वापरुनही काही दिवसांत केसांसाठी पुन्हा तीच समस्या सुरु होते. पण काही आयुर्वेदिक उपाय केल्यास केसगळती रोखली जाता येते. (coconut oil for hair growth) आजी-आईच्या काळात केस गळणं, कोंडा किंवा केस कोरडे होणे या समस्यांना कमी सामोरे जावे लागायचे. (natural hair fall remedy) पण हल्ली ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. केस इतके गळतात की आता टक्कलच पडते की, काय अशी भीती देखील आपल्याला जाणवू लागते. (herbal hair oil) पण आपल्या आयुर्वेदात केसगळती कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. (home remedy for dandruff and hair fall) रासायनिक उत्पादनांऐवजी काही घरगुती उपचार केल्यास आपण केसगळती कमी करु शकतो. (hair growth tips)
चमचाभर हळद 'अशी' चोळा चेहऱ्यावर - १५ मिनिटांत हात-पाय- मानेचे टॅनिंग होईल कमी, त्वचा उजळेल
केसगळती रोखण्यासाठी आपल्याला घरगुती तेल बनवावे लागेल. यासाठी आपल्याला नारळाचे तेल, कांदा, कढीपत्ता, कांद्याच्या बिया आणि मेथीचे दाणे लागतील. हे तेल बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी खोबऱ्याचे तेल चांगले गरम करावे लागेल. नंतर तेलात चिरलेला कांदा, कढीपत्ता, मेथीचे दाणे आणि कांद्याच्या बिया घालाव्या लागतील. कांदा लालसर होईपर्यंत मंद आचेवर तेल शिजवा. यानंतर तेल गाळून घ्या. आठवड्यातून किमान दोन वेळा हे तेल लावा. एक किंवा दोन तासांनी केस धुवा, यामुळे केसांची वाढ होईल आणि केस नैसर्गिकरित्या मजबूत होण्यास मदत होईल.
नारळाचे तेल केसांच्या समस्या टाळण्यासाठी योग्य मानले जाते. हे तेल केसांना योग्य प्रकारे पोषण देते. यामुळे केसांना नैसर्गिक चमक तर मिळते पण फाटे देखील फुटतात. नारळाचे तेल टाळूला हायड्रेट करते आणि कोंडा टाळण्यास मदत होते.
कांद्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फर असते. जे केस वाढीसाठी चालना देते. यामुळे रक्ताभिसरण वाढून केसांची मुळे मजबूत होतात. कांद्याचा रस लावल्याने केस गळती रोखण्यास आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. मेथी दाणे आणि कांद्याच्या बिया या केसांच्या वाढीसाठी बहुगुणी मानल्या आहेत. यामुळे केसात कोंडा होत नाही. तसेच केस मऊ आणि नैसर्गिकरित्या चमकदार राहतात.