Join us

केस गळून टक्कल पडलं? ७ भन्नाट टिप्स – केसांचं गळणं होईल बंद, वाढतील दुप्पट वेगाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 11:43 IST

Hair growth home remedies: Hair Falling Out and Bald Spots: Stop Hair Fall and Boost Growth Twice as Fast: योग्य वेळी काही बदल केल्यास केसगळती थांबवता येते आणि नवीन केस उगवण्यास मदत होते.

माझेही केस सुंदर- लांबसडक असावे असं प्रत्येक तरुणीला वाटतं. लहानपणी घनदाट आणि लांब असणारे केस तरुण वयात आल्यानंतर गळू लागतात, विरळ होतात.(Hair growth home remedies) यामुळे सतत आपण चिंतेत सापडतो. केसगळतीच्या समस्यांमुळे अनेकदा रडू येतं, चिंता वाटू लागते. इतकंच नाही तर टाळूच्या अनेक भागावर केस विरळ होऊन टक्कल देखील दिसू लागते.(Hair Falling Out and Bald Spots) सध्या ही समस्या प्रत्येक वयोगटातील तरुणांना भेडसावत आहे. प्रदूषण, चुकीचा आहार, ताणतणाव, हार्मोनल बदल, केमिकलयुक्त शाम्पू या सगळ्यांमुळे आपले केस हळूहळू कमकुवत होतात आणि गळायला लागतात.(Stop Hair Fall and Boost Growth Twice as Fast) ज्यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. पण योग्य वेळी काही बदल केल्यास केसगळती थांबवता येते आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. (Bald spot treatment)महागड्या केमिकल्स ट्रीटमेंट्स आपल्याला कमी करायला हव्यात. वारंवार स्ट्रेटनिंग, कलरिंग किंवा हीट स्टायलिंग केल्याने केस कमकुवत होऊन तुटायला लागतात.(Hair growth home remedies) याऐवजी नैसर्गिक उपाय करायला हवे.(Natural hair care) आठवड्यातून किमान दोनदा तेल लावून हलका मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि केसांची वाढ वेगाने होते. नारळाचे तेल, कढीपत्ता तेल, कांद्याचा रस, आवळा तेल हे नैसर्गिकरित्या केसांना पोषण देतात. पण या ७ भन्नाट टिप्स लक्षात ठेवल्यास केस वाढण्यास मदत होईल. 

ब्लॅक टी केसांवर करतो जादू! ४ पद्धतीने लावा, केस होतील काळेभोर - कोंडाही कमी

1. केसांची काळजी घेण्यासाठी आपल्याला टाळूची मालिश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. केसांच्या वाढीसाठी भृंगराज, आवळा किंवा नारळ यांसारख्या नैसर्गिक तेलांचा वापर करा. नियमित मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन केस मजबूत होतात. 

2. नियमितपणे योगा आणि व्यायाम केल्याने टाळूमधील रक्ताभिसरण सुधारते. योगा ताण कमी करतो, हार्मोन्स संतुलित करतो आणि केसांना नैसर्गिकरित्या पोषण देतो. 

3. केसांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार देखील खूप महत्त्वाचा आहे. आपल्या आहारात लोह, प्रथिने, ओमेगा- ३ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वांचा समावेश करा. तसेच ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खा. ज्यामुळे केस मजबूत होतील. 

रोज लावा जास्वंदीच्या फुलांचे ‘हे’ तेल- महिनाभरात दिसेल फरक, डोक्यावरचा एक केस गळणार नाही

4. केसांना आठवड्यातून २ ते ३ वेळा शाम्पू लावा. रोज केसांना शाम्पू लावल्याने त्यातील नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे ते अधिक कोरडे आणि रुक्ष होतात. तसेच केसांसाठी हर्बल शाम्पू वापरा. ज्यामुळे केसांच गळणं कमी होईल. 

5. शरीराला कायम थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. शरीरातील उष्णता वाढल्याने केस पातळ होतात. त्यासाठी शरीर थंड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी प्या. चंदन आणि कडुनिंबाची पेस्ट केसांना लावा. ज्यामुळे टाळू देखील थंड राहिल. 

6. जास्त ताण घेतल्यावर त्याचा केसांवर परिणाम होतो.ज्यामुळे केसगळती वाढते. आपले मन शांत ठेवा. ध्यान करा ज्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटेल. यामुळे ताण देखील कमी होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी