Lokmat Sakhi >Beauty > भुवयांचे केस विरळ झाले? ३ सोपे उपाय- भुवया होतील काळ्याभोर- दाट, चेहरा दिसेल रेखीव

भुवयांचे केस विरळ झाले? ३ सोपे उपाय- भुवया होतील काळ्याभोर- दाट, चेहरा दिसेल रेखीव

What To Do If Eyebrows Are Very Thin: भुवयांचे केस वाढतच नसतील तर हे काही सोपे उपाय करून पाहा..(how to get dark black and thick eyebrows?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2025 18:56 IST2025-02-03T18:56:02+5:302025-02-03T18:56:45+5:30

What To Do If Eyebrows Are Very Thin: भुवयांचे केस वाढतच नसतील तर हे काही सोपे उपाय करून पाहा..(how to get dark black and thick eyebrows?)

best home remedies to get thick eyebrows, what to do if eyebrows are very thin, how to get dark black and thick eyebrows? | भुवयांचे केस विरळ झाले? ३ सोपे उपाय- भुवया होतील काळ्याभोर- दाट, चेहरा दिसेल रेखीव

भुवयांचे केस विरळ झाले? ३ सोपे उपाय- भुवया होतील काळ्याभोर- दाट, चेहरा दिसेल रेखीव

Highlights जाड, दाट, काळ्याभोर भुवया असतील तर मग चेहऱ्यालाही आणखी जास्त रेखीवपणा येतो

काही जणांच्या भुवयांच्या केसांना अजिबातच वाढ नसते. वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतर म्हणजेच साधारण २५- ३० वर्षांनंतर तर काही जणींच्या भुवया खूप पातळ होत जातात. इतक्या पातळ भुवया चेहऱ्यालाही शाेभत नाहीत (best home remedies to get thick eyebrows). जाड, दाट, काळ्याभोर भुवया असतील तर मग चेहऱ्यालाही आणखी जास्त रेखीवपणा येतो (what to do if eyebrows are very thin?). म्हणूनच भुवयांचे केस जर वाढतच नसतील तर हे काही सोपे उपाय तुम्ही करून पाहू शकता.(how to get dark black and thick eyebrows?)

भुवयांचे केस वाढत नसतील तर काय उपाय करावा?

 

१. कॅस्टर ऑईल

भुवयांचे केस चांगले वाढावेत यासाठी कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल खूप उपयुक्त ठरते. एरंडेल तेलामध्ये असणारे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि फॅटी ॲसिड केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.

सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल

त्यामुळे आठवड्यातून ३ ते ४ वेळा एका कापसावर कॅस्टर ऑईलचे काही थेंब घ्या आणि ते भुवयांच्या आसपास लावा. त्यानंतर मस्कारा ब्रशने किंवा साध्या कंगव्याने त्या भागाला थोडा मसाज करा.

 

२. कोरफडीचा गर

भुवया छान दाट, काळ्याभोर होण्यासाठी कोरफडीचा गर देखील खूप उपयुक्त ठरतो. हा उपाय करण्यासाठी कोरफडीच्या पानांंमधला फ्रेश गर काढा.

वांगाच्या डागांमुळे चेहरा खराब दिसू लागला? ३ फळं चेहऱ्याला लावा, काही दिवसांतच डाग गायब

तो भुवयांच्या आसपास लावून एखादा मिनीट हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मसाज करा. त्यानंतर ३० मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास भुवयांच्या केसांमध्ये खूप छान फरक दिसून येईल. 

 

३. रोजमेरी ऑईल

रोजमेरी ऑईल हे केसांच्या वाढीसाठी खूप उत्तम मानले जाते. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सीडंट्स असतात. रोजमेरी ऑइल भुवयांच्या आसपास लावून मसाज करा.

आपल्याच अंगणातली तुळस का बहरत नाही? नेहमी का सुकते? ३ गोष्टी तपासा- तुळस वाढेल जोमानं 

यामुळे तिथल्या भागातल्या त्वचेमध्ये रक्ताभिसरण अधिक चांगले होते आणि भुवया जाडसर होण्यास मदत होते. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा. 

 

Web Title: best home remedies to get thick eyebrows, what to do if eyebrows are very thin, how to get dark black and thick eyebrows?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.