काही जणींची केसांच्या वाढीबाबत नेहमीच तक्रार असते. त्यांचे केस अजिबातच वाढत नाहीत. अगदी कित्येक महिने उलटून जातात तरीही त्यांचे केस इंचभरही वाढलेले नसतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे केसांना मिळणारं अपूरं पोषण. काही बाबतीत अनुवंशिकता हे देखील कारण असतं. पण काही घरगुती उपाय केले आणि केसांची वाढ होण्यास पोषक ठरतील अशा काही पदार्थांचा वापर केल्यास केस भराभर वाढू शकतात (best home remedies for fast hair growth). त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(best hair oil to stimulate hair growth)
केसांची वाढ होत नसल्यास घरगुती उपाय
केस अजिबातच वाढत नसतील तर कोणते घरगुती उपाय करता येतील, याविषयीची माहिती ब्यूटी एक्सपर्टने rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
अपचनाचा त्रास- पोट गुबारून जातं? 'या' पद्धतीने वेलची,ओवा खा- ॲसिडीटी, अपचन होणार नाही
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ टेबलस्पून तुमचं नेहमीचं खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेल डोक्याची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं.
या तेलामध्ये १ टेबलस्पून एरंडेल तेल घाला. एरंडेल तेलाने आपण जेव्हा डोक्याला मालिश करतो तेव्हा त्वचेखालील भागात रक्ताभिसरण अधिक जलद होऊ लागते आणि त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढ जोमात होते.
याशिवाय या मिश्रणातच ५ ते १० थेंब रोजमेरी इसेंशियल ऑईल घाला. हे तिन्ही तेल एकत्र करा आणि त्याने डोक्याला मालिश करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता.
अंग आखडून गेलं? ६ व्यायाम करा, शरीर होईल लवचिक आणि वजनही झरझर उतरेल..
हा उपाय नियमितपणे केल्यास अगदी महिनाभरातच तुम्हाला केसांमध्ये खूप छान फरक जाणवेल. केस तर वाढतीलच पण ते थोडे दाट आणि सिल्कीही झाल्यासारखे वाटतील, असं ब्यूटी एक्सपर्ट सांगत आहेत.