केसांची योग्य ती काळजी घेणं झालं नाही तर केसांचा कोरडेपणा वाढत जातो. हल्ली बऱ्याच जणी त्यांच्या कामांमध्ये एवढ्या जास्त अडकलेल्या असतात की केसांकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे मग केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत जातात आणि केस लांबसडक असूनही खूपच निस्तेज, डल, कोरडे पडल्यासारखे दिसू लागतात (how to get rid of dry hair?). असे झाडूसारखे काेरडे पडलेले केस असतील तर त्याची कोणती हेअरस्टाईल करतानाही खूप त्रास होतो शिवाय ते मोकळेही सोडता येत नाहीत (Simple Home Remedies For Dry Hair By Hair Expert Javed Habib). त्यामुळेच अशा केसांना पुन्हा एकदा छान चमकदार, सिल्की आणि मऊसूत करायचं असेल तर सेलिब्रिटी हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सुचविलेला हा उपाय करून पाहा..(hair care tips by Jawed Habib)
केस कोरडे, रुक्ष झाले असल्यास काय उपाय करावा?
कोरड्या केसांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याविषयी माहिती सांगणारा जावेद हबीब यांचा व्हिडिओ galattaindiaoffl या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
व्यायाम करूनही वजन कमी होईना? 'हा' चहा पिऊन बघा, मेटाबॉलिझम सुधारून वजन घटेल भराभर
यामध्ये जावेद हबीब असं सांगत आहेत की आपल्याकडे कोरड्या केसांवर तेल लावले जाते. पण जर तुमचे केस खूप जास्त ड्राय झाले असतील तर तेल लावण्याच्या क्रियेमध्ये थोडा बदल करा. केस आधी कोमट पाण्याने थोडे ओलसर करून घ्या.
त्यानंतर केसांना मोहरीचं तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. केसांसाठी मोहरीचं तेल जास्त योग्य आहे. त्यामुळे केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर मोहरीचं तेल लावा. अर्धा तास केस तसेच ठेवा आणि त्यानंतर तुमचा नेहमीचा शाम्पू लावून केस धुवा.
दीपिका पदुकोन म्हणते- आई झाल्यावर खूप गोष्टी बदलल्या आणि 'या' गोष्टीचा त्रास होऊ लागला..
यामुळे केसांमधलं नॅचरल माॅईश्चर टिकून राहण्यास मदत होईल आणि केस छान मऊसूत, सिल्की होतील. यापुढे तेल लावताना जावेद हबीब यांची ही ट्रिक वापरून पाहा.. कदाचित केसांचा कोरडेपणा पुर्णपणे कमी होऊ शकतो.