Lokmat Sakhi >Beauty > केस ना गळणार, ना पांढरे होणार! 'हा' घरगुती शाम्पू वापरा- विकतच्या महागड्या शाम्पूंपेक्षा भारी असरदार

केस ना गळणार, ना पांढरे होणार! 'हा' घरगुती शाम्पू वापरा- विकतच्या महागड्या शाम्पूंपेक्षा भारी असरदार

Hair Care Tips: विकतचे महागडे शाम्पू वापरण्यापेक्षा हा एक खास घरगुती शाम्पू वापरून केस धुवून पाहा..(how to get rid of white hair?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 16:22 IST2025-08-20T15:11:48+5:302025-08-20T16:22:33+5:30

Hair Care Tips: विकतचे महागडे शाम्पू वापरण्यापेक्षा हा एक खास घरगुती शाम्पू वापरून केस धुवून पाहा..(how to get rid of white hair?)

best home made shampoo for controlling hair fall and graying of hair | केस ना गळणार, ना पांढरे होणार! 'हा' घरगुती शाम्पू वापरा- विकतच्या महागड्या शाम्पूंपेक्षा भारी असरदार

केस ना गळणार, ना पांढरे होणार! 'हा' घरगुती शाम्पू वापरा- विकतच्या महागड्या शाम्पूंपेक्षा भारी असरदार

Highlightsआवळा, दही, व्हिटॅमिन ई, रोजमेरी तेल हे सगळेच पदार्थ केसांना छान पोषण देऊन मऊ करतात. काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहा. 

हल्ली केसांच्या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. अगदी तरुण वयातले लोकही केसांचं गळणं, कमी वयातच केस पांढरे होणं या दाेन समस्यांनी वैतागलेले आहेत. जेव्हा केस गळू लागतात किंवा मग पांढरे होऊ लागतात तेव्हा बहुसंख्य लोक लगेचच शाम्पू, तेल, कंडिशनर बदलून पाहतात. म्हणजेच काय तर केसांवर आणखी वेगळ्या केमिकल्सचा मारा केला जातो. यामुळे बऱ्याचदा केसांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं (Hair Care Tips). म्हणूनच पांढरे केस आणि केस गळणं हा त्रास तुम्हालाही होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय अगदी लगेचच करून पाहा (home made shampoo for controlling hair fall). हा उपाय अतिशय सोपा आहे आणि त्यामुळे केस दाट, लांब आणि काळेभोर होतील.(how to get rid of white hair?)

 

केसांसाठी घरगुती शाम्पू कसा तयार करायचा?

केसांसाठी घरगुती शाम्पू कसा तयार करावा याविषयी माहिती सांगणारा एक खास व्हिडिओ swekshaavyamvlogss या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

मुसळधार पावसात भाज्या महागल्या? करा २ टोमॅटोंचा ठेचा फक्त ५ मिनिटांत, जेवणाचा बेत होईल मस्त

शाम्पू तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आवळा पावडर, रिठा पावडर, शिकेकाई पावडर आणि जास्वंदाच्या फुलाची पावडर सम प्रमाणात घेऊन एकत्र करा. 

यानंतर त्यामध्ये रोजमेरी इसेंशियल ऑईलचे काही थेंब आणि १ ते २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. आता दही घालून हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. आता हा लेप तुमच्या केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा.

 

१५ ते २० मिनिटे लेप डोक्यावर तसाच राहू द्या आणि त्यानंतर केस धुवून टाका. केसांवर पाणी घालून जसे तुम्ही केस चाेळाल तसे तसे शिकेकाई आणि रिठा पावडर यांचा फेस तयार होतो. या फेसामुळे केस अगदी स्वच्छ निघतात. यानंतर डोक्यावर भरपूर पाणी घेऊन केस अगदी स्वच्छ धुवून घ्या.

फ्रिजच्या दरवाज्याच्या रबरवर फंगस साचलं? २ सोपे उपाय- १० मिनिटांत काळवंडलेलं रबर होईल स्वच्छ 

या पद्धतीने केस धुतल्यास तुम्हाला दुसरे कंडिशनर लावण्याची गरज नाही. कारण आवळा, दही, व्हिटॅमिन ई, रोजमेरी तेल हे सगळेच पदार्थ केसांना छान पोषण देऊन मऊ करतात. काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहा. 


 

Web Title: best home made shampoo for controlling hair fall and graying of hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.