बऱ्याचदा आपलं केसांकडे व्यवस्थित लक्ष देणं हाेत नाही. आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल लावणं आणि नंतर शाम्पू करून केस धुणं एवढंच केसांसाठी पुरेसं नसतं. काही काही वेळा केसांची थोडी जास्त काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर केस कोरडे पडतात. राठ होतात. अशा कोरड्या झालेल्या केसांना मग लवकर फाटे फुटतात. म्हणजेच केस दुभंगतात. असे केस खूपच घाण दिसतात. म्हणूनच केसांचं सौंदर्य आणि त्यांच्यामधलं मॉईश्चर टिकवून ठेवायचं असेल तर ग्लिसरीन घेऊन पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा.(best home hacks for split hair and dry hair)
केसांना फाटे फुटू नयेत म्हणून काय उपाय करावा?
केसांना फटे फुटू नयेत यासाठी त्यांच्यामधलं मॉईश्चर टिकून राहाणं किंवा केस मॉईश्चराईज करणं खूप गरजेचं असतं. यासाठी फक्त तेल लावणं पुरेसं ठरत नाही. म्हणूनच नेमका काय उपाय करायला हवा याविषयीची माहिती पारस ताेमर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.
नाश्त्यासाठी करा इंस्टंट आटा उत्तप्पा, १० मिनिटांत चमचमीत नाश्ता तयार, रेसिपी एकदम सोपी
यासाठी ते सांगतात की एका वाटीमध्ये एक ते दिड चमचा ग्लिसरीन घ्या. ग्लिसरीन केसांना खूप छान पोषण देतं आणि त्यांना मॉईश्चराईज करून त्यांच्यावर छान चमक आणण्यास मदत करतं.
ग्लिसरीनमध्ये १ चमचा दालचिनीची पावडर घाला. दालचिनीदेखील केसांसाठी उपयुक्त ठरते. दालचिनीमुळे त्वचेखालचा रक्तप्रवाह अधिक चांगला होतो. त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं, तुटण्याचं प्रमाण कमी होतं.
आता याच मिश्रणामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला. बेकिंग सोड्यामुळे केसांमधली सगळी घाण, धूळ निघून जाते. शिवाय डोक्यात कोंडा असेल तर तो ही जातो. आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा.
कमी वयात केस पांढरे आणि पातळ झाले? बघा उपाय- केसांच्या सगळ्याच तक्रारी संपून जातील
तुमच्या केसांच्या लांबीनुसार पदार्थांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हा मास्क केसांना लावल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने माईल्ड शाम्पू लावून केस धुवून टाका. महिन्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास केसांवर खूप छान परिणाम दिसून येईल.
