Join us

काही केल्या केस गळणं थांबेना? 'या' काळ्या बिया खा, केस होतील दाट, लांब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2025 14:35 IST

Home Remedies to Stop Hair Fall: केस गळणं थांबविणाऱ्या काळ्या बियांचा सुपरडोस एकदा घेऊनच पाहा. काही दिवसांतच केस होतील दाट आणि लांब...(home hacks for hair growth)

ठळक मुद्देयामुळे केस तर छान होतीलच, पण आरोग्यालाही अनेक लाभ होतील. 

हल्ली केसांच्या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. काही जणांचे केस खूप गळतात तर काही जणींच्या केसांना अजिबातच वाढ नसते. याशिवाय कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारातून केसांना व्यवस्थित पोषण मिळत नाही. म्हणूनच केसांसाठी उपयुक्त ठरणारे काही विशिष्ट पदार्थ आपण आवर्जून खायला हवेत. हे पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास केसांच्या वेगवेगळ्या समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते..(Home Remedies to Stop Hair Fall) त्यापैकीच एक खास पदार्थ पाहूया आणि केसांच्या वाढीसाठी तो कशा पद्धतीने खायला हवा ते पाहूया..(home hacks for hair growth)

 

केस गळणं कमी करण्यासाठी उपाय

आपल्याला माहिती आहे की कलौंजी म्हणजेच कांद्याच्या बिया केसांसाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यामुळेच हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू, हेअरऑईल, कंडिशनर यांच्यामध्येही कलौंजीचा वापर केला जातो. कारण कलौंजीमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ओमेगा ३ असतात.

तुम्ही छोट्याछोट्या गोष्टींचाही फार विचार करता, टेंशन येतं, झोपही येत नाही? ‘ही’ एक याेगमुद्रा मन करेल शांत

हे दोन्ही पदार्थ केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी ठरतात. याविषयीची जी माहिती डॉक्टरांनी drrashmishahnutritionist या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे, त्यामध्ये ते सांगत आहेत की दररोज रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाणी घ्या. त्यात १ चमचा कलौंजी घाला आणि दररोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्या. तसेच कलौंजी बारीक चावून खा. यामुळे केस तर छान होतीलच, पण आरोग्यालाही अनेक लाभ होतील. 

 

कलौंजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

१. काही अभ्यासानुसार असे म्हटले आहे की बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कलौंजी खाणे फायदेशीर ठरते.

२. कलौंजीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्मही भरपूर प्रमाणात असतात.

नातवापासून आजीपर्यंत सर्वांनी लावावा ‘असा’ मस्त घरगुती फेसपॅक- दिवाळीत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येईल तेज

३. लिव्हर आणि किडनीच्या आरोग्यासाठीही कलौंजी उपयुक्त ठरते.

४. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही कलौंजी उपयुक्त ठरते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Stop hair fall with black seeds for thick, long hair.

Web Summary : Suffering from hair fall? Black seeds (Kalonji) can help! Rich in antioxidants and Omega-3, they nourish hair, promoting growth and thickness. Consume them daily with water for best results and overall health benefits.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी