Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहनाज हुसेन सांगतात, केसांसाठी ३ मॅजिकल ऑईल! केसांवर करतात जादू - डॅमेज केसही होतील सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2025 14:47 IST

best hair oils recommended by shahnaz husain : magical oils for damaged hair : प्रसिद्ध ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन यांनी सांगितलेली तीन खास तेल केसांसाठी वरदानच...

केस डॅमेज होणे, केसगळती, वाढ खुंटणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा केसांच्या एक ना अनेक समस्या असतात. केसांच्या अनेक समस्यांनी आपल्यापैकी बऱ्याचजणी हैराण असतात. केसांसाठी रासायनिक ब्यूटी प्रॉडक्ट्स सतत वापरणे आणि प्रदूषण यामुळे केसांचे आरोग्य बिघडते, ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळत नाही. केसांच्या अनेक समस्यां कमी करण्यासाठी यावर सर्वात बेसिक आणि घरगुती उपायांमध्ये आपण तेलाने केसांची मालिश करतो. तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या मुळांना योग्य पोषण आणि आवश्यक घटक मिळून केसांच्या बऱ्याच समस्या कमी होतात(magical oils for damaged hair).

प्रसिद्ध ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन यांच्या मते, केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत पोषण द्यायचे असेल, केसांवरील डॅमेज कमी करायचे असेल आणि नैसर्गिक चमक परत आणायची असेल तर तीन खास प्रकारची तेल नियमित वापरणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ही तेल केसांना खोलवर पोषण देतात, मुळं मजबूत करतात आणि केसांची वाढही सुधारतात. प्रसिद्ध ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन (Shahnaz Husain) यांनी सांगितलेले तीन खास तेल केसांसाठी वरदान ठरू शकते. केसांना मुळापासून पोषण देणारी आणि त्यांची गुणवत्ता सुधारणारी ही जादुई तीन तेल नेमकी कोणती? शहनाज हुसेन यांनी सुचवलेली ही तीन ‘मॅजिकल ऑईल’ आणि त्यांचा योग्य (best hair oils recommended by shahnaz husain) वापर कसा करायचा ते पाहूयात... 

केसांच्या अनेक समस्या कमी करणारी ३ ‘मॅजिकल ऑईल'... 

१. खोबरेल तेल :- हेअर स्ट्रेंथनर :- खोबरेल तेल केसांसाठी सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासार्ह तेल आहे असे मानले जाते. खोबरेल तेल केसांना दाट, चमकदार आणि मजबूत करण्यास मदत करते. हे तेल डॅमेज झालेले केस ठीक करते आणि केसांना फाटे फुटण्यापासून रोखते. खोबरेल तेलाने आपण केसांसाठी खास हॉट ऑईल थेरपी करू शकता. खोबरेल तेल थोडे गरम करा. रात्री झोपण्यापूर्वी गरम तेल हलकेच केसांच्या मुळांवर बोटांच्या टोकांनी हळूवारपणे मसाज करा. हे तेल रात्रभर केसांनवर तसेच राहू द्या. सकाळी केस माईल्ड शाम्पूने धुवा.

हिवाळ्यात मिळणाऱ्या रसरशीत आवळ्याचा करा हेअर डाय! प्रत्येक पांढरा केस होईल काळा - विकतच्या डायपेक्षा भारी पर्याय...

२. एरंडेल तेल :- डॅमेज केसांना वरदान :- एरंडेल तेलाचा वापर प्रामुख्याने कोरड्या आणि डॅमेज झालेल्या केसांसाठी केला जातो. एरंडेल तेल प्रामुख्याने  'टक्कल पडणे' 'केसगळती' या समस्येत फायदेशीर ठरते. हे तेल केसांचा रंग फिकट होऊ देत नाही, तसेच स्निग्धता किंवा पोषण कमी झालेल्या केसांना गडद रंग देण्यास मदत करते. एरंडेल तेल हे इतर तेलापेक्षा थोडे जाड आणि जास्त चिकट असते, म्हणूनच ते थेट केसांना लावण्याऐवजी आधी ते बदाम किंवा खोबरेल यांसारख्या इतर तेलात मिसळून मगच केसांवर लावावेत. हे तेल केसांना लावल्यानंतर शाम्पू आणि पाण्याने केस चांगल्या प्रकारे धुवावेत, जेणेकरून चिकटपणा केसांमध्ये तसाच राहणार नाही. स्काल्पवर येणाऱ्या खाज आणि कोरडेपणाला हे तेल नियंत्रित करते.

जपानी स्त्रियांच्या सुंदर सिल्की केसांचे पारंपरिक सिक्रेट? करतात फक्त ३ गोष्टी, एकदम साध्या सोप्या...

३. जोजोबा ऑईल :- डँड्रफ आणि कोरड्या केसांसाठी फायदेशीर :- जोजोबा तेलाचा विशेष वापर कोरड्या केसांसाठी आणि डँड्रफ कमी करण्यासाठी केला जातो. हे तेल स्काल्पवर होणारा कोंडा, खाज सुटणे आणि स्काल्पची उकलेली त्वचा यांसारख्या समस्या दूर करते आणि स्काल्पला निरोगी बनवते. एरंडेल तेल हलके गरम करा. त्यानंतर स्काल्पवर हळूवारपणे मालिश करा. एका तासानंतर केस स्वच्छ धुवा.

कांद्याची सालं फेकू नका, आहेत फायदेशीर! करा नॅचरल हेअर कलर - पांढरे केसही होतील काळेभोर... 

English
हिंदी सारांश
Web Title : Shahnaz Husain's 3 magical oils for hair: damage repair secrets.

Web Summary : Beauty expert Shahnaz Husain recommends coconut, castor, and jojoba oils for hair health. Coconut oil strengthens, castor oil repairs damage, and jojoba oil combats dandruff. Regular use promotes healthier, shinier hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी