Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात केसांना तेल न लावण्याची चूक करु नका, पाहा उन्हाळ्यात केसांसाठी बेस्ट ५ तेल...

उन्हाळ्यात केसांना तेल न लावण्याची चूक करु नका, पाहा उन्हाळ्यात केसांसाठी बेस्ट ५ तेल...

best hair oils for hair loss in summer : hair oil to prevent hair fall in summer : उन्हाळा, घामाचा त्रास आणि केसांच्या गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा 'हे' बेस्ट हेअर ऑईल्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 17:11 IST2026-03-16T16:57:58+5:302026-03-16T17:11:42+5:30

best hair oils for hair loss in summer : hair oil to prevent hair fall in summer : उन्हाळा, घामाचा त्रास आणि केसांच्या गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा 'हे' बेस्ट हेअर ऑईल्स...

best hair oils for hair loss in summer hair oil to prevent hair fall in summer | उन्हाळ्यात केसांना तेल न लावण्याची चूक करु नका, पाहा उन्हाळ्यात केसांसाठी बेस्ट ५ तेल...

उन्हाळ्यात केसांना तेल न लावण्याची चूक करु नका, पाहा उन्हाळ्यात केसांसाठी बेस्ट ५ तेल...

उन्हाळा सुरु झाला की अनेक शारीरिक कुरबुरी त्रास देतात. रणरणत्या उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांच्या अनेक समस्या देखील डोकं वर काढतात. वाढलेलं तापमान, प्रचंड घाम आणि धूळ यामुळे टाळू चिकट होणे, कोंडा वाढणे, केस कोरडे पडणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस गळण्याची समस्या अधिक जाणवू लागते. दिवसभर घामामुळे केस तेलकट आणि चिकचिकीत होत असल्याने केसांची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं ठरतं(best hair oils for hair loss in summer).

उन्हाळ्यात भरपूर उष्णता आणि सतत येणारा घाम यामुळे केस प्रचंड चिकट होतात, ज्यामुळे 'स्कॅल्प'वर घाण साचते आणि परिणामी केस गळतीची समस्या दुपटीने वाढते. घामामुळे चिकट झालेले केस आणि विंचरताना हातात येणारे केसांचे पुंजके...उन्हाळ्यात ही समस्या आपल्यापैकी बहुतेकजणींना सतावते. वाढत्या तापमानामुळे (best oils for hair growth and strong roots) केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि घामामुळे केस अधिकच कमकुवत होतात. अशावेळी अनेकजण केसांना तेल लावणे टाळतात, पण हीच मोठी चूक ठरू शकते. उन्हाळ्यात केसांचा पोत सुधारण्यासाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी योग्य तेलाची मालिश करणे केसांसाठी फारच गरजेचे असते. योग्य तेलामुळे स्काल्पला पोषण मिळतं, केस मजबूत राहतात आणि उन्हाळ्यात होणाऱ्या केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होते. पण नेमकं उन्हाळ्यात केसांना कोणतं तेल लावावं ज्यामुळे केस गळणं कमी होईल आणि केस निरोगी राहतील? उन्हाळ्यात केसांसाठी कोणत तेल (hair oil to prevent hair fall in summer) सर्वात फायदेशीर ठरू शकते ते पाहूयात... 

उन्हाळ्यात केसगळती रोखण्यासाठी आणि वाढीसाठी बेस्ट तेल कोणतं ? 

१. खोबरेल तेल (Coconut Oil) :- आपल्या घराघरांत सर्वात जास्त वापरले जाणारे तेल म्हणजे खोबरेल तेल. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे तेल केवळ केसांच्या वरच्या थरापर्यंतच मर्यादित राहत नाही, तर ते केसांच्या मुळांपर्यंत खोलवर जाऊन त्यांना योग्य पोषण देते. यामध्ये असणारे 'फॅटी ॲसिड' केसांमधील प्रोटीन सुरक्षित ठेवतात, ज्यामुळे केस कमी तुटतात आणि मुळापासून मजबूत होतात. उन्हाळ्याच्या दिवसांत केसांमध्ये रात्रभर तेल लावून ठेवण्याऐवजी, आंघोळ करण्याच्या ३० मिनिटे आधी हलक्या हाताने मसाज करणे जास्त फायदेशीर ठरते. यामुळे स्काल्पला थंडावा मिळतो आणि घामामुळे होणारी खाज तसेच घामामुळे आलेला चिकटपणा कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात लाडक्या लेकीच्या केसांना नेमकं कोणतं तेल लावावं? केसांची वाढ आणि थंडावा देणारे ३ पर्याय...

२. बदाम तेल (Almond Oil) :- जर तुम्हाला केसांवर खूप जड किंवा चिकट तेल लावणं आवडत नसेल, तर बदाम तेल हा एक उत्तम पर्याय आहे. हे तेल अतिशय हलके असते आणि स्काल्पमध्ये लवकर शोषले जाते. यामध्ये 'व्हिटॅमिन-ई' आणि 'मॅग्नेशियम' भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या मुळांना मजबूती देते आणि केसगळती थांबवून केसांची वाढ होण्यास मदत करते. केस धुतल्यानंतर केसांच्या टोकांना बदामाच्या तेलाचे २ ते ३ थेंब लावल्यास केसांचा कोरडेपणा आणि गुंता कमी होतो, ज्यामुळे केस अधिक मऊ आणि मुलायम दिसतात.

३. एरंडेल तेल (Castor Oil) :- जर तुमचे केस खूपच पातळ होत असतील किंवा कपाळावरचे केस कमी होऊन 'हेअरलाईन' मागे जात असेल, तर एरंडेल तेल अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेल्या 'रिसिनोलिक ॲसिड' (Ricinoleic Acid) मुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक प्रमाणात पोषण मिळते. एरंडेल तेल खूप दाट, घट्टसर असते, त्यामुळे ते थेट केसांवर लावण्यापेक्षा खोबरेल किंवा बदाम तेलात मिसळून लावणे जास्त सोयीचे ठरते. यामुळे तेल लावणे सोपे जाते आणि केस धुतानाही जास्त त्रास होत नाही.

साडीच्या प्रकारानुसार ‘असा’ शिवा ब्लाऊजचा गळा-साधी साडीही दिसेल लाखांत एक, परफेक्ट लूकची सर्वत्र चर्चा...

४. आवळा तेल (Amla Oil) :- आयुर्वेदात आवळ्याला केसांसाठी अत्यंत गुणकारी मानले गेले आहे. यामध्ये 'व्हिटॅमिन-सी' आणि 'अँटी-ऑक्सिडंट्स' भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांना मजबूती देतात आणि केसगळती कमी करण्यास फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात केसांवर आवळा तेल लावल्याने स्काल्पला थंडावा मिळतो. कडक ऊन आणि उष्णतेमुळे डोक्याला होणारी जळजळ किंवा खाज यापासून यामुळे आराम मिळतो. तसेच, हे तेल केस अकाली पांढरे होण्याची समस्या रोखण्यासही मदत करते.

५. भृंगराज तेल (Bhringraj Oil) :- आयुर्वेदात भृंगराजला 'हेअर किंग' असेही म्हटले जाते. हे तेल केसांच्या मुळांना मजबूती देते, स्काल्पमधील रक्ताभिसरण (Blood Circulation) वाढवते आणि केसांच्या नैसर्गिक वाढीस मदत करते. जर तुम्हाला कोंडा मानसिक तणाव किंवा हवामानातील बदलांमुळे केस गळतीचा त्रास होत असेल, तर भृंगराज तेल अतिशय गुणकारी ठरू शकते. हे तेल स्काल्पचे आरोग्य उत्तम राखण्यास आणि केसांना नैसर्गिक चमक देण्यास मदत करते.

केसांवर लावल्या जाणाऱ्या तेलाचं खर काम टाळूला स्काल्पला योग्य पोषण देणे आणि केसांच्या वाढीसाठी एक निरोगी स्थिती तयार करणे हे असते, जेणेकरून केस मुळापासून मजबूत होऊन वाढू शकतील. केसांच्या आरोग्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा २० ते ३० मिनिटे हलक्या हाताने केलेला मसाज खूप फायदेशीर ठरू शकतो. यासोबतच, उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि स्काल्प स्वच्छ ठेवणं देखील तितकेच गरजेचे असते.

Web Title : गर्मी में बालों में तेल लगाना न छोड़ें; सर्वश्रेष्ठ तेल जानिए!

Web Summary : गर्मी में बालों की समस्याएँ बढ़ जाती हैं, जिससे बाल झड़ने लगते हैं। तेल लगाना ज़रूरी है। नारियल, बादाम, अरंडी, आंवला और भृंगराज तेल सिर की त्वचा को पोषण देते हैं, जड़ों को मजबूत करते हैं और गर्मी की समस्याओं से लड़ते हैं। नियमित मालिश और स्वस्थ जीवनशैली भी ज़रूरी है।

Web Title : Don't skip hair oiling this summer; best oils revealed!

Web Summary : Summer heat causes scalp issues, increasing hair fall. Oiling is crucial. Coconut, almond, castor, amla, and bhringraj oils nourish the scalp, strengthen roots, and combat summer hair problems. Regular massage and a healthy lifestyle are also vital.