हिवाळा सुरू झाला की त्वचेसोबतच केसांच्या समस्याही वाढू लागतात. वातावरणातील बदल, थंड आणि कोरडी हवा तसेच गारठ्यामुळे केस खूपच फ्रिझी होतात किंवा त्यांची चमक कमी होऊन ते गळायला लागतात. हिवाळा ऋतू सुरु झाला की केसांच्या अनेक समस्या वाढतात. केस फ्रिझी होणे, राठ वाटणे, फाटे फुटणे किंवा केस गळती वाढणे यांसारख्या समस्या थंडीच्या दिवसांत जरा जास्तच जाणवतात. खरंतर, या दिवसांत केसांतील नैसर्गिक ओलावा हरवतो आणि स्काल्पही कोरडी पडते, इतकंच नाही तर केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे केसांना पुरेशा पोषणाची वारंवार गरज भासते(Hair oil for frizzy hair in winter).
थंडीच्या दिवसांतील केसांच्या या अनेक समस्या सोडवण्यासाठी बेसिक उपाय म्हणून योग्य तेलाचा वापर करणे अत्यंत गरजेचे असते. केसांना योग्य पोषण देणारे, खोलवर मॉइश्चर लॉक करणारे तेल वापरणे खूपच आवश्यक असते. हिवाळ्यातील केसांशी संबंधित या समस्या दूर करण्यासाठी आणि केसांना मजबूत, चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम तेल कोणतं असा प्रश्न पडतो. हिवाळ्यात केसांना कोणते तेल लावल्याने केसांच्या समस्या कमी होतात आणि त्यांना ( Best oil for dry hair in winter) भरपूर फायदा मिळतो, ते पाहूयात...
हिवाळ्यात केसांना लावण्यासाठी सर्वोत्तम तेल कोणतं ?
१. खोबरेल तेल :- नारळाचे तेल केसांसाठी सर्वात उत्तम मानले जाते. खोबरेल तेल हेअर डॅमेज ठीक करते, केस जाड, चमकदार आणि मजबूत बनवण्यास मदत करते. खोबरेल तेल केसांचे झालेलं नुकसान कमी करते आणि केसांना फाटे फुटण्यापासून बचाव करते. सर्वात आधी खोबरेल तेल हलके गरम करा. रात्री झोपण्यापूर्वी तेलाने स्काल्पवर हळूवार मसाज करा. रात्रभर केसांना तसेच राहू द्या. सकाळी केसांना माईल्ड शाम्पूने स्वच्छ धुवा. खोबरेल तेलात असलेले फॅटी अॅसिड केसांमध्ये खोलवर पोहोचतात आणि त्यांना दीर्घकाळ पोषण देतात, ज्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो. हे तेल स्काल्पचे आरोग्य सुधारते, कोंड्याची समस्या कमी करते आणि केसांना एक नैसर्गिक चमक देते. तसेच, तेलाचा नियमित वापर केल्यास केस मजबूत होतात, तुटणे कमी होते आणि केसगळती थांबण्यास मदत मिळते, ज्यामुळे थंडीच्या दिवसांतही केस घनदाट आणि निरोगी राहतात.
२. एरंडेल तेल :- एरंडेल तेल केसांच्या मुळांना मजबूत करते आणि डॅमेज केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे केस घनदाट, मजबूत होतात. तसेच, याच तेलामुळे केस पांढरे होत नाहीत. हे तेल पोषण कमतरतेमुळे गळणाऱ्या केसांना ताकद देऊन मजबूत करते. हे तेल खूप जाड आणि जास्त चिकट असते. त्यामुळे, हे तेल शाम्पू करण्यापूर्वी लावणे उत्तम असते. याचबरोबर हे तेल लावताना ते इतर प्रकारच्या तेलांमध्ये म्हणजेच खोबरेल किंवा बदाम तेलामध्ये मिसळून मगच केसांवर लावावे. तेल लावल्यानंतर केस गरम पाण्याने आणि शाम्पूने स्वच्छ धुवा. हिवाळ्यातील गारठ्यामुळे अनेकदा केस गळू लागतात आणि कमजोर होतात. अशावेळी, एरंडेल तेल केसांना लावणे खूप उपयुक्त ठरते. हे तेल जाड आणि चिकट असल्यामुळे, ते केसांच्या मुळांना खोलवर पोषण देते. एरंडेल तेलात रिसिनोलिक अॅसिड असते, जे स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारून केसांची वाढ उत्तेजित करते. हे तेल केसांना जाडी आणि घनता देते. थंडीमुळे केसांमधील आर्द्रता कमी झाल्यास एरंडेल तेल ते भरून काढते, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि तुटणे कमी होते. थोडक्यात, हिवाळ्यात हे तेल केसांना ताकद देऊन त्यांना घनदाट आणि निरोगी बनवतात.
३. जोजोबा ऑईल :- थंडीच्या दिवसांत केस खूप कोरडे, रुक्ष, निस्तेज होतात आणि कोंड्याची समस्या वाढते. अशावेळी, जोजोबा ऑईलचा वापर केल्याने कोरडे केस आणि कोंडा कमी होण्यास मदत होते. हे तेल थंडीत होणारा कोंडा आणि स्काल्पवरील कोरडेपणा दूर करते आणि स्काल्पला आरोग्यदायी करते. सर्वात आधी तेल हलके गरम करा. स्काल्पवर हलका मसाज करा. १ तासानंतर केस धुवून टाका. जोजोबा ऑईल स्काल्पला ओलावा पोहोचवते, ज्यामुळे खाज सुटणे आणि कोरड्या त्वचेचे थर निघणे कमी होते. तसेच, हे तेल केसांचा ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे केस मऊ, चमकदार आणि फ्रिझी होत नाहीत.
हातावर तेल घेऊन थेट केसांना लावण्याची जुनी पद्धतच चुकीची, ‘असं’ तेल लावा-केसगळती होते बंद...
