Join us

भोगीला तिळाचे उटणे लावून आंघोळ करण्याचे फार महत्त्व! सौंदर्य खुलविण्यासाठी 'असे' वापरा तीळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 10:13 IST

Makar Sankranti 2025 Special: भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं लावून आंघोळ करण्याची परंपरा मराठवाडा तसेच इतर काही भागांत दिसून येते (benefits of using sesame ubtan). आता तिळाचं उटणं कसं तयार करायचं आणि त्याचे काय फायदे ते पाहूया...(how to make til face mask for glowing skin?)

ठळक मुद्देतिळाचं उटणं त्वचेसाठी नॅचरल स्क्रब म्हणून काम करतं. यामुळे डेड स्किन निघून त्वचा छान तुकतुकीत, चमकदार होते. 

वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. त्यामुळे या सणाचा उत्साह सगळीकडेच भरपूर असतो. संक्रांतीच्या काळात पतंग उडविले जातात म्हणून बच्चे कंपनी खुश असते, तर दुसरीकडे हळदी- कुंकू, तिळगुळाची देवाणघेवाण यामुळे महिला वर्ग  प्रचंड उत्साहात असतो. असं सगळं आनंदीमय वातावरण तयार करणाऱ्या संक्रांत सणाची सुरुवात खऱ्या अर्थाने होते ती संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीने. भोगीच्या दिवशी मराठवाड्यात अशी परंपरा आहे की महिला खास तिळापासून तयार केलेलं उटणं वापरून आंघोळ करतात (benefits of using sesame ubtan). एरवी वर्षभर तिळाचं उटणं आपण वापरत नाही. पण याकाळात त्याचे खूप महत्त्व आहे.  तिळाचं उटणं कसं तयार करायचं आणि त्याचे नेमके काय फायदे होतात ते पाहूया..(how to make til face mask for glowing skin?)

 

तिळाचं उटणं कसं तयार करायचं?

तिळाचं उटणं तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तीळ मंद आचेवर अगदी थोडेसे म्हणजे एखादा मिनीट भाजून घ्यावे. यानंतर ते पुर्णपणे थंड झाले की मिक्सरमधून फिरवून त्याची जाडसर पावडर करून घ्यावी. अगदी बारीक पावडर करून नये.  

फराह खान चाळिशी उलटल्यावर झाली तिळ्यांची आई, ती म्हणते-आईपण सोपं नव्हतंच पण..

त्यामध्ये थोडा  लिंबाचा रस, चिमूटभर हळद आणि दही घालून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर तसेच इतर अंगाला लावू शकता. तिळाचं उटणं लावून अंगाला हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. चेहऱ्यावर अधिक ग्लो येण्यासाठी तिळाच्या पावडरमध्ये तुम्ही पिठीसाखर, तांदळाचे पीठ, कॉफी पावडर असे पदार्थही टाकू शकता. तसेच तिळाचं उटणं कालविण्यासाठी दह्याऐवजी, कच्चं दूध, गुलाब पाणी यांचाही वापर करू शकता.

 

तिळाचं उटणं वापरण्याचे फायदे

१. तिळामध्ये व्हिटॅमिन ई आणि नॅचरल तेल भरपूर प्रमाणात असते. हिवाळ्यात जेव्हा त्वचा कोरडी पडते, अंग उलून भुरकट होते, तेव्हा कोरड्या पडलेल्या त्वचेला हायड्रेटेड करण्यासाठी तिळामधले व्हिटॅमिन ई आणि तेल खूप उपयोगी ठरतं. तिळाचं उटणं वापरल्याने कोरडी पडलेली त्वचा मऊ- मुलायम होते.

त्वचेचं तारुण्य टिकविण्यासाठी 'या' पद्धतीने वापरा लवंग! वय वाढलं तरी त्वचा सुरकुतणार नाही...

२. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने जास्त टॅन होते. त्यामुळे त्वचेचा काळवंडलेपणा कमी करण्यासाठीही तिळाच्या उटण्याचा उपयोग होतो.

३. तिळाचं उटणं त्वचेसाठी नॅचरल स्क्रब म्हणून काम करतं. यामुळे डेड स्किन निघून त्वचा छान तुकतुकीत, चमकदार होते.  

टॅग्स :मकर संक्रांतीत्वचेची काळजीहोम रेमेडीब्यूटी टिप्स