Lokmat Sakhi >Beauty > खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा! केसांवर दिसेल कमालीचा फरक - वाटेल आधीच का नाही केला उपाय...

खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा! केसांवर दिसेल कमालीचा फरक - वाटेल आधीच का नाही केला उपाय...

Benefits of using fitkari with coconut oil for hair : how to use fitkari and nariyal tel for strong hair : natural remedies for hair fall control with alum : नारळाचे तेल केसांना पोषण देतेच, पण जेव्हा यात तुरटी मिसळली जाते तेव्हा त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2025 14:52 IST2025-09-27T13:26:51+5:302025-09-27T14:52:11+5:30

Benefits of using fitkari with coconut oil for hair : how to use fitkari and nariyal tel for strong hair : natural remedies for hair fall control with alum : नारळाचे तेल केसांना पोषण देतेच, पण जेव्हा यात तुरटी मिसळली जाते तेव्हा त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात...

benefits of using fitkari with coconut oil for hair natural remedies for hair fall control with alum how to use fitkari and nariyal tel for strong hair | खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा! केसांवर दिसेल कमालीचा फरक - वाटेल आधीच का नाही केला उपाय...

खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा! केसांवर दिसेल कमालीचा फरक - वाटेल आधीच का नाही केला उपाय...

केसांच्या बाबतीत वारंवार केस गळणे, तुटणे यांसारख्या समस्या बऱ्याचजणांना त्रास देतात. केसांच्या या समस्यांमुळे डोक्यावरील केस हळूहळू कमी होऊन आपल्याला टक्कल पडेल की काय, अशी भीतीच वाटू लागते. अशा परिस्थितीत, जर वेळीच केसांची योग्य ती काळजी घेतली नाही तर केस गळण्याचं प्रमाण अधिकच वाढू शकते. केस गळणे किंवा तुटण्याची समस्या कमी करण्यासाठी काही पारंपरिक घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरतात(Benefits of using fitkari with coconut oil for hair).

चमकदार, दाट आणि निरोगी केसांसाठी फार पूर्वीपासून वापरला जाणारा एक खास म्हणजे खोबरेल तेल आणि तुरटीचा खडा. नारळाचे तेल केसांना पोषण देते, हे आपल्याला माहीत आहेच, पण जेव्हा यात तुरटी मिसळली जाते, तेव्हा त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात. हे मिश्रण फक्त केस गळणे आणि तुटण्यावरच नियंत्रण ठेवत नाही, तर (how to use fitkari and nariyal tel for strong hair) स्काल्पच्या बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि खाजेवरही रामबाण उपाय म्हणून काम करते. नारळाचे तेल आणि तुरटी यांचे मिश्रण हा एक साधा घरगुती उपाय केसांसाठी जादूई ठरतो. नारळाच्या तेलात तुरटी मिसळून केसांची योग्य देखभाल (natural remedies for hair fall control with alum) करण्याचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूयात. 

खोबरेल तेलात तुरटी मिसळून केसांवर लावण्याचे फायदे... 

१. नारळाच्या तेलात फॅटी ॲसिड असते, ज्यामुळे केसांची चमक टिकून राहते. त्यातील अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आणि लॉरिक ॲसिड स्काल्पवर होणाऱ्या बुरशीजन्य संसर्ग होण्यापासून रोखतात. 

२. दुसरीकडे, तुरटीमध्ये, अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे टाळूच्या समस्या, सूज, खाज, कोंडा, जळजळ दूर करतात.

३. तुरटी नैसर्गिक ॲस्ट्रिंजेंटप्रमाणे केसांसाठी फायदेशीर असते. अँटीसेप्टिक (Antiseptic) गुणांनीयुक्त असलेली तुरटी केसांना भरपूर पोषण देते. तुरटी  केसांच्या मुळांना मजबुती देते, ज्यामुळे केस गळणे कमी होते. तुरटी नारळाच्या तेलात मिसळून लावल्याने केस पांढरे होत नाहीत आणि केसांची वाढही होते.

एकच साडी पुन्हा पुन्हा नेसली तरी लूक दिसेल आकर्षक वेगळा! ७ टिप्स- साडी एकच-स्टायलिंग अनेक...

हेमामालिनी साबण वापरत नाही, १ देसी उपाय ठेवतोय त्वचा तरुण, सत्तरीतही  सुंदर...

४. नारळाच्या तेलात थोडीशी तुरटीची पूड मिसळून लावल्यास केसांचा फ्रिजिनेस कोरडेपणा, रूक्षता कमी होते. सोबतच केसांना भरपूर पोषण मिळते.
नारळाच्या तेलात तुरटी मिसळून लावा. काहीवेळ हे मिश्रण केसांवर तसेच राहू द्या. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. 

५. ज्यांना कोंड्याची समस्या खूप जास्त आहे, त्यांनी देखील नारळाच्या तेलात तुरटीची पूड मिसळून स्काल्पवर व्यवस्थित लावावी आणि बोटांनी मालिश करावी. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूचा पीएच बॅलन्स कायम ठेवण्यास मदत करतात.

६. तेलात तुरटी मिसळून काही दिवस केस आणि स्काल्पवर चांगल्या प्रकारे लावा. यात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म स्काल्पवरील डेड स्किन, पुळ्या  कोंडा आणि मुरुम कमी करू शकतात. यामुळे स्काल्पमध्ये ओलावा टिकून राहतो आणि केस व स्काल्प कोरडे होत नाहीत.

खोबरेल तेल आणि तुरटीचे मिश्रण कसे तयार करावे ?

एका वाटीत एक ते दोन मोठे चमचे नारळाचे तेल घ्या. त्यामध्ये एक छोटा चमचा तुरटी बारीक वाटून पूड करून टाका. हे मिश्रण चांगले मिसळून घ्या. आता हे मिश्रण गॅसवर ठेवून मंद आचेवर गरम करा. त्यानंतर ते थोडे कोमट होऊ द्या. कोमट झाल्यावर, बोटांच्या मदतीने हे मिश्रण केसांना आणि स्काल्पला व्यवस्थित लावा.

चहा पावडरचा सुपरहिट हेअर कलर! केसांवर येईल सुंदर रंग - पार्लरचा खर्च वाचेल असा बजेट फ्रेंडली उपाय... 

याचा वापर कसा करावा ?

केसांना शाम्पू करण्यापूर्वी हे खोबरेल तेव व तुरटीचे मिश्रण केसांवर तसेच स्काल्पला लावून घ्या. मिश्रण डोक्याला चांगले लावल्यावर एक ते दोन तास तसेच राहू द्या. त्यानंतर तुम्ही कोणत्याही सौम्य किंवा हर्बल शाम्पूने केस स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा नक्की करा. काही दिवसांतच तुम्हांला केसांमध्ये फरक दिसून येईल.

Web Title : नारियल तेल और फिटकरी का मिश्रण: बालों के लिए अद्भुत फायदे!

Web Summary : नारियल तेल और फिटकरी का मिश्रण बालों की जड़ों को मजबूत करता है, बालों का झड़ना कम करता है और रूसी को रोकता है। इसके एंटीमाइक्रोबियल गुण खोपड़ी को पोषण देते हैं, जिससे बालों का स्वस्थ विकास होता है। नियमित उपयोग से बाल मजबूत और चमकदार बनते हैं।

Web Title : Coconut oil and alum mix: Amazing hair benefits revealed!

Web Summary : Coconut oil and alum mixture strengthens hair roots, reduces hair fall, and prevents dandruff. Its antimicrobial properties nourish the scalp, promoting healthy hair growth and shine. Regular use makes hair stronger and lustrous.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.