Join us

फक्त एक चमचाभर चहा पावडरच्या पाण्याने केसांच्या समस्या होतील दूर, 'असा' करा उपयोग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2025 17:04 IST

Benefits Of Tea Water For Hair How To Use : Chai Ki Patti Ka Pani For Hair Growth : How to wash your hair with tea water to stop hair fall : Magic of Tea leaves for hair care – How to use it : Black Tea Hair Rinse for Hair Growth : How to Make a Tea Hair Rinse and the Benefits : अनेक पोषक तत्त्वे चहाच्या पावडरमध्ये असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही केसांचे आरोग्य सुधारू शकता...

आपले केस घनदाट, लांबसडक, काळेभोर असावेत असे प्रत्येकीलाच वाटते. असे असेल तरीही आज बरेचजण केसांच्या अनेक लहान - मोठ्या समस्यांनी हैराण आहे. केस गळणे, केस पांढरे होणे, केसांची मूळ कमकुवत होणे, केस पातळ होणे अशा (Benefits Of Tea Water For Hair How To Use) अनेक समस्यांचा सामना ( How to wash your hair with tea water to stop hair fall ) आपल्याला करावा लागतो. केसांसंबंधित वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारची तेल, शाम्पू यांसारख्या इतर प्रॉडक्ट्सचा वापर करतो. परंतु काहीवेळा हे महागडे उपाय देखील केसांच्या या समस्यांवर फायदेशीर ठरत नाहीत. अशावेळी आपण घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देतो(Black Tea Hair Rinse for Hair Growth : How to Make a Tea Hair Rinse and the Benefits).

आपल्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात. ज्या अत्यंत गुणकारी असतात, आणि याचा फायदा आरोग्य, त्वचा आणि केसांनाही होतो. यात चहापावडरचा देखील समावेश आहे. चहापावडरचा वापर करून आपण चहा करतो, पण याचा वापर आपण केसांसाठीही करू शकता. यामुळे केसांच्या अनेक समस्या कायमच्या दूर होऊन केसांचे आरोग्य व सौंदर्य अधिक खुलून येते. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी चहा पावडरचे पाणी कसे करायचे व त्याचा वापर केसांसाठी कसा करायचा ते पाहूयात. 

केसांसाठी चहा पावडरचे पाणी कसे तयार करायचे ? 

सर्वात आधी एक भांडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात दोन कप पाणी घाला. त्यात ३ चमचे चहा पावडर घाला. पण याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. एका भांड्यावर गाळणी ठेवा, त्यात गाळून चहाचे पाणी वेगळे करा.

आयुर्वेदातील पारंपरिक पद्धतीने करा तुपाचे नॅचरल मॉइश्चरायझर, हिवाळ्यात त्वचेच्या समस्या होतील दूर...

चहाचे पाणी वेगळे केल्यानंतर थंड होण्यासाठी काही वेळ ठेवा. चहा पावडरचे पाणी थंड झाल्यानंतर त्यात व्हिटॅमिन-ई कॅप्सूल (पर्यायी आहे, आपण फक्त चहा पावडरचे नुसते गाळून घेतलेले पाणी देखील वापरु शकता) घालून मिक्स करा. तयार पाणी केसांवर लावण्याआधी केस विंचरून घ्या. चहा पावडरचे पाणी केसांच्या मुळांवर लावा आणि हातांनी हलका मसाज करा. ३० मिनिटानंतर केस पाण्याने धुवा. आपण या पाण्याने केस आठवड्यातून एकदा धुवू शकता. याच चहा पावडरच्या पाण्यांत आपण १ चमचा एलोवेरा जेल देखील मिक्स करु शकता. चहा पावडरचे पाणी व एलोवेरा जेल केसांसाठी एक उत्तम कंडिशनर म्हणून काम करेल. 

चहा पावडरचे पाणी केसांवर लावण्याचे फायदे... 

१. पांढरे केस काळे करण्यास मदत :- चहा पावडरचे पाणी आपल्या केसांमधील कोलेजनचे प्रमाण वाढवते आणि केसांना नैसर्गिक काळा रंग देण्यास मदत करते. २. केसांची वाढ होते :- चहाच्या पाण्याने केसांची वाढ अधिक चांगली होते. यामुळे केसगळती कमी होते. स्काल्पवर चहा पावडरच्या पाण्याने मसाज केल्याने   रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केसांची वाढ होण्यास अधिक मदत होते. 

व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल 'या' ५ पदार्थात मिसळून लावा, केसांच्या समस्या होतील दूर- केस दिसतील चमकदार...

पार्लर कशाला ? चक्क फुगे वापरुन केस करा परफेक्ट कुरुळे, पार्लर सारखा महागडा लुक्स घरच्याघरीच...

३. केस होतील चमकदार :- चहा पावडरच्या पाण्याने केस चमकदार व शायनी होतात. यामुळे केसांना चमक येते आणि पोतही सुधारतो. चहा पावडरचे पाणी केसांसाठी कंडिशनर म्हणून देखील वापरले जाऊ शकते. ४. अनेक समस्यांवर फायदेशीर :- चहा पावडरमध्ये ४ % नायट्रोजन, ०.२४% फॉस्फरस, ०.२५ %  पोटॅशिम असते. यातील पोषक तत्व केस गळणं, तुटणं यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवून देतात. चहाच्या पानातील पोषक घटक केसगळती रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी