केसांच्या अनेक समस्यांपैकी केसांत डँड्रफ होणे ही फारच कॉमन आणि बहुतेकजणींना सतावणारी समस्या आहे. केसांत डँड्रफचे प्रमाण वाढल्याने असा डँड्रफ केसांवर तर दिसतोच, सोबतच तो सतत आपल्या कपड्यांवर देखील पडतो. डँड्रफमुळे केसांचे आरोग्य आणि सौंदर्य बिघडते आणि त्यांचा लूक (How To Use Carom Seeds For Dandruff Control) खराब होतो. डँड्रफ म्हणजेच केसांत सतत दिसणारे पांढरे कण, डोक्यातील खाज आणि स्काल्पचा कोरडेपणा यामुळे केसांचे सौंदर्य हरवून जाते. केसांत होणाऱ्या डँड्रफवर (How to Use Carom Seeds for Hair Care) वेळीच काही उपाय केले नाही तर डँड्रफ वाढतो, हा वाढलेला डँड्रफ सतत डोक्यावरुन आपल्या खांद्यावर पडतो. चारचौघात अशाप्रकारे डँड्रफ खांद्यावर पडू लागला तर काहीवेळा आपल्याला लाजिरवाणे वाटते(Benefits of Carom Seeds To Reduc Hair Dandruff).
केसांतील डँड्रफचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू, तेल वापरुन पाहतो परंतु याचा पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय करावेसे वाटतात. केसांतील डँड्रफ काढून टाकण्यासाठी आपण घरगुती उपायांमध्ये, मसाल्यांच्या डब्यांतील ओव्याच्या मदतीने एक खास उपाय करुन नक्की पाहू शकतो. केसांतील डँड्रफ काढून टाकण्यासाठी ओव्याचा खास उपाय काय आहे ते पाहूयात.
डँड्रफ दूर करण्यासाठी ओवा कसा फायदेशीर ठरतो ?
केसांत होणाऱ्या डँड्रफच मुख्य कारण म्हणजे फंगल इन्फेक्शन. मलसेझिया नावाच्या फंगसची वाढ झाल्यास डँड्रफ वाढतो. पण ओव्यात असणारा थायमॉल हा घटक या फंगसची वाढ रोखण्यात मदत करतो. त्यामुळे कोंडा हळूहळू कमी होऊ लागतो. तसंच, ओव्यात असणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म स्काल्पवरील इन्फेक्शन व खाज कमी करण्यात मदत करतात. २०२० मध्ये ‘जर्नल ऑफ एथ्नोफार्माकोलॉजी’मध्ये छापलेल्या एका अभ्यासानुसार, ओव्याचं तेल फंगल इन्फेक्शनवर प्रभावी ठरतं. यामुळे डँड्रफ दूर होण्यास मदत मिळते.
फेस फॅट वाढून चेहरा वयस्क - थोराड दिसतो? ५ सवयी, तारुण्य परत येईल कायमचं...
केसांतील डँड्रफ काढण्यासाठी ओव्याचा वापर कसा करावा ?
उपाय १ :- ओवा आणि कडुलिंबाच्या पानांचा हेअर मास्क :- डँड्रफ दूर करण्यासाठी ओव्याबरोबरच आपण कडुलिंबाच्या पानांच्या पेस्टचा देखील वापर करु शकतो. कडुलिंबाची पाने स्काल्प खोलवर स्वच्छ करतो आणि फंगल इन्फेक्शन देखील कमी करण्यास मदत करतो, यामुळे कमी वेळात चांगले परिणाम मिळतात. केसांतील डँड्रफ कमी करण्यासाठी ओवा, कडुलिंबाची पाने आणि थोडे पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. २ ते ३ टेबलस्पून ओवा पाण्यांत रात्रभर पाण्यांत भिजत ठेवावा. दुसऱ्या दिवशी भिजवलेला ओवा, कडुलिंबाची पाने आणि थोडे पाणी असं सगळं साहित्य मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांवर आणि स्काल्पला लावून हलकेच चोळून मसाज करून घ्यावा. ही पेस्ट केसांवर अर्धा तास अशीच लावून ठेवा त्यानंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय...
फेशियल हेअर रिमूव्हलचा घरगुती उपाय! वेदना न होता केस निघतील सहज - वॅक्सिंग, थ्रेडींग विसरा!
उपाय २ :- ओव्याचं पाणी :- केसांसाठी ओव्याचं पाणी तयार करण्यासाठी २ ते ३ टेबलस्पून ओवा आणि ग्लासभर पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. ओवा पाण्यात टाकून ५ ते १० मिनिटं उकळा. पाणी गार झाल्यावर गाळून घ्या. केस शाम्पू केल्यानंतर या ओव्याच्या पाण्याने केस धुवा. ओव्याच्या या खास दोन उपायांमुळे केसांतील डँड्रफचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.