Join us

स्काल्पची त्वचा वारंवार कोरडी पडतेय? ३ पदार्थांनी करा मिनिटभर स्काल्पचा मसाज - कोरडेपणा होईल दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 10:00 IST

Beauty tips for dry scalp home remedies : 3 best home remedies for dry scalp : how to get rid of dry scalp naturally : home remedies to remove scalp dryness : natural remedies for dry itchy scalp : स्काल्पची त्वचा कोरडी पडल्यास, नेहमीच्या वापरातील ३ पदार्थांनी मसाज करा आणि फरक पाहा...

डोक्यातील त्वचेचा म्हणजेच स्काल्पचा कोरडेपणा ही समस्या आपल्यापैकी बऱ्यांचजणींना सतावते. स्काल्पला कोरडेपणा येऊ लागला की, हळूहळू केसांचे आरोग्य व सौंदर्य बिघडू लागते. असा हा स्काल्पचा कोरडेपणा (3 best home remedies for dry scalp) वाढू लागला की, स्काल्पला खाज येते, तसेच त्वचेचे पांढरेशुभ्र पापुद्रे हळूहळू निघू लागतात. यामुळे अनेकदा केसांना फाटे फुटणे, केस गळणे यांसारख्या केसांच्या अनेक समस्या देखील सतावतात(Beauty tips for dry scalp home remedies).

स्काल्प कोरडी पडू लागली की त्याचा थेट परिणाम केसांवर दिसू लागतो. अशा परिस्थितीत, केस व स्काल्प यांचे आरोग्य व सौंदर्य दोन्ही टिकवून ठेवण्यासाठी काही खास घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. घरातीलच नेहमीच्या वापरातील तीन खास पदार्थांचा वापर करून आपण कोरड्या स्काल्पचा मसाज करू शकता, ज्यामुळे कोरडेपणा दूर होईल आणि स्काल्प निरोगी राहील. घरातील उपलब्ध काही खास पदार्थांमुळे स्काल्पला ओलावा मिळतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि कोरडेपणा दूर होतो. स्काल्पचा कोरडेपणा (how to get rid of dry scalp naturally) कमी करणारे असे कोणते ३ खास घरगुती पदार्थ आहेत ते पाहूयात... 

स्काल्पचा कोरडेपणा कमी करणारे ३ खास घरगुती पदार्थ... 

१. खोबरेल तेल (Coconut Oil) :- खोबरेल तेल प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतेच. हे फक्त केसांनाच पोषण देत नाही, तर कोरड्या स्काल्पसाठी वापरणे अधिक फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी हलक्या गरम खोबरेल तेलाने स्काल्पची मालिश करू शकता आणि सकाळी केस धुऊ शकता. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसून येईल.

केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...

२. एलोवेरा जेल (Aloe Vera Gel) :- एलोवेरामध्ये मॉइश्चरायझिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे स्काल्पचा कोरडेपणा आणि खाज कमी करण्यास मदत करते. यासाठी, ताजे एलोवेरा जेल थेट स्काल्पवर लावा आणि ५ मिनिटे बोटांनी हलका मसाज करा त्यानंतर २० मिनिटे तसेच राहू द्या. मग  पाण्याने केस धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा असे केल्यास स्काल्पचा कोरडेपणा लवकरच कमी होऊन स्काल्प निरोगी होईल.

मेहेंदी चोपडूनही केसांना रंगच येत नाही ? 'अशी' भिजवा मेहेंदी, केस दिसतील कलर केल्यासार‌खे सुंदर...

३. दही आणि मध (Curd & Honey) :- दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे स्काल्प स्वच्छ करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. एका वाटी दह्यामध्ये थोडे मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या स्काल्पवर लावा आणि ३० मिनिटांनी धुऊन टाका. हा मास्क तुमच्या स्काल्पला हायड्रेट करेल, तसेच केसांना मऊ बनवेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय