Join us

वयाच्या मानाने चेहरा खूपच म्हातारा दिसतो का? घरात मूग डाळ आहे ना, मग हा घ्या उपाय.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 16:57 IST

आजकाल प्रदूषण आणि तणाव यामुळेही वेळेआधीच चेहेर्‍यावर सुरकुत्या पडायला लागतात. पण यावर एक परिणामकारक घरगुती उपाय आहे. ही समस्या जर आपल्याबाबतीतही असेल तर त्यासाठी पार्लरमधे जाऊन महागडे उपचार घेण्याची गरज नाही. या समस्येवर सालीच्या मुगाच्या डाळीचा फेसपॅक उत्तम काम करतो.

ठळक मुद्देमूग डाळीच्या फेसपॅकसाठी मुगाची डाळ ही सालीचीच हवी. अख्खे मूग किंवा पिवळी मुगाची डाळ घेऊ नये.सौंदर्याशी संबंधित विविध समस्यांसाठी मूग डाळीचा फेसपॅक विविध प्रकारे तयार करता येतो.हा मूग डाळीचा फेसपॅक आठवड्यातून तीन वेळा लावावा.छायाचित्रं- गुगल

 चेहेर्‍यावर सुरकुत्या पडणं आणि चेहेर्‍याची त्वचा सैल होणं या एकमेकांशी संबधित बाबी आहेत. पण त्याचा परिणाम म्हणजे चेहेर्‍यावरुन वय दिसायला लागतं. नुस्तं वयच दिसत नाही तर आपण आहे त्यापेक्षा जास्त वयाचं वाटू लागतो. चेहेर्‍यावर सुरकुत्या पडणं, चेहेर्‍याची त्वचा सैल होणं या गोष्टी फक्त वयामुळेच घडून येतात असं नाही तर आजकाल प्रदूषण आणि तणाव यामुळेही वेळेआधीच चेहेर्‍यावर सुरकुत्या पडायला लागतात. पण यावर एक परिणामकारक घरगुती उपाय आहे. ही समस्या जर आपल्याबाबतीतही असेल तर त्यासाठी पार्लरमधे जाऊन महागडे उपचार घेण्याची गरज नाही. या समस्येवर सालीच्या मुगाच्या डाळीचा फेसपॅक उत्तम काम करतो.

छायाचित्रं- गुगल

मुगाची डाळ सालीचीच हवी?

मूग डाळीच्या फेसपॅकसाठी मुगाची डाळ ही सालीचीच हवी. अख्खे मूग किंवा पिवळी मुगाची डाळ घेऊ नये. कारण अख्खे मूग वाटण्याआधी ते भिजवावे लागतात. तर पिवळ्या मुगाच्या डाळीतून फायबर निघून गेलेले असतात. त्यामुळे ही डाळ आपल्या त्वचेचं पोषण करु शकत नाही. त्यामुळे सालीची मुगाची डाळ घ्यावी.

छायाचित्रं- गुगल

मूग डाळीचा फेसपॅक कसा तयार करावा?

खरंतर सौंदर्याशी संबंधित विविध समस्यांसाठी मूग डाळीचा फेसपॅक विविध प्रकारे तयार करता येतो. सुरकुत्या घालवण्यासाठी 2 चमचे मूग डाळ, एक चमचा चंदन पावडर, 4 बदाम, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा मध आणि गुलाबपाणी घ्यावं.सर्वात आधी मूग डाळ आणि कढी पत्ता धुवून घ्यावा. नंतर ते मिक्सरमधून वाटून घ्यावं. डाळ आणि कढीपत्ता वाटून झाला की मग त्यात इतर सर्व गोष्टी घालून पुन्हा एकदा वाटून त्याची मऊसर पेस्ट तयार करुन घ्यावी. हे एवढं करायला केवळ अर्धा मिनिट लागतो. फक्त डाळ वाटताना गुलाबपाण्याचाच उपयोग करायला हवा.

हा मूग डाळीचा फेसपॅक आठवड्यातून तीन वेळा लावावा. हा फेसपॅक लावल्यानं चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या निघून जातात, चेहेर्‍याची त्वचा घट्ट होते. या दोन फायद्यासोबतच त्वचेचा रंग उजळतो, त्वचा तजेलदार होते. तसेच चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्याही जातात.