आपले केस सुंदर, काळेभोर, घनदाट असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असतेच. केसांचे आरोग्य आणि सौंदर्य जपून ठेवण्यासाठी आपण केसांची वेळोवेळी योग्य ती काळजी घेतोच. परंतु अनेकदा केसांची योग्य ती काळजी घेऊन देखील केसांच्या एक ना अनेक समस्या सतावतात. केसांमध्ये कोंडा, खाज, कोरडेपणा आणि वाढ खुंटणे या समस्या आजकाल प्रत्येकीला सतावतात. केसांच्या या समस्येवर घरगुती आणि कायमचा एकच रामबाण उपाय करणे फायदेशीर ठरते. जेवणाची चव वाढवणारे तमालपत्र केसांचे आरोग्य आणि सौंदर्यही जपण्यास मदत करते. स्वयंपाकघरात सहज मिळणारी तमालपत्राची पाने केसांसाठी खूपच उपयुक्त ठरू शकतात(bay leaf for hair growth & reduce dandruff).
अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि पोषक घटकांनी समृद्ध असलेली तमालपत्रे डँड्रफ कमी करण्यास मदत करतात तसेच केसांच्या मुळांना बळकट करून केसांची वाढ वाढवतात. घरच्याघरी, अगदी सोप्या पद्धतीने तमालपत्राच्या पानांचा वापर करून तयार केलेले हेअर सिरम केमिकल-फ्री असून केसांना नैसर्गिक चमक आणि मजबुती देऊ शकते. बदलत्या हवामानामुळे होणारा कोंडा आणि केसांची खुंटलेली वाढ यावर महागड्या उपयांऐवजी तमालपत्राच्या पानांचा खास घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. डँड्रफ मुळापासून घालवण्यासाठी आणि केसांची लांबी वेगाने वाढवण्यासाठी तमालपत्राचे सिरम अत्यंत उपयुक्त मानले जाते. कमी खर्चात आणि कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय हे सिरम घरी कसे तयार करायचे याची साधीसोपी कृती पाहूयात. तमालपत्राचा वापर करून घरच्याघरीच तयार केलेलं 'हेअर ग्रोथ आणि अँटी-डँड्रफ सिरम' केसांवर करेल जादू...
केसांसाठी 'हेअर ग्रोथ आणि अँटी-डँड्रफ सिरम'...
केसांसाठी 'हेअर ग्रोथ आणि अँटी-डँड्रफ सिरम' तयार करण्यासाठी आपल्याला ३ ते ४ तमालपत्राची पाने, ग्लासभर पाणी, १० ते १२ लवंग काड्या, प्रत्येकी १ टेबलस्पून मेथी दाणे आणि कलोंजी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केसांसाठी फायदेशीर आहे घरगुती हेअर सिरम...
केसांसाठी घरगुती हेअर सिरम तयार करण्यासाठी सर्वातआधी, एका मोठया भांड्यात ग्लासभर पाणी ओतावे. पाणी व्यवस्थित मंद आचेवर उकळवून घ्यावे. त्यानंतर या पाण्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मेथी दाणे आणि कलोंजी घालावी. त्यानंतर तमालपत्राच्या पानांचे छोटे - छोटे तुकडे घालावेत. यासोबतच लवंग काड्या देखील घालाव्यात. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून पाणी अर्धे होईपर्यंत उकळवून घ्यावे. भांड्यातील पाणी आटून अर्धे झाल्यावर गाळणीच्या मदतीने गाळून एका स्प्रे बॉटल किंवा एअर टाईट काचेच्या कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे.
केसांसाठी आई-आजीचा सुपरहिट फॉर्म्युला! चमचाभर पावडर करेल जादू - महिन्याभरात वेणी दिसेल दुप्पट जाड...
याचा वापर कसा करावा ?
तमालपत्राचे हे घरगुती हेअर सिरम स्प्रे बॉटल मधून स्काल्प, केसांच्या मुळांवर आणि संपूर्ण केसांवर स्प्रे करावेत. रात्रभर हे सिरम केसांवर तसेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा तरी करावा.
केसांसाठी हे घरगुती सिरम वापरण्याचे फायदे...
१. तमालपत्र :- तमालपत्रामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूवरील कोंडा आणि खाज मुळापासून दूर करण्यास मदत करतात.
२. मेथी दाणे :- मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड भरपूर असते, ज्यामुळे केस गळणे थांबते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.
३. कलोंजी :- कलोंजीमधील अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना पोषण देऊन केसांची वाढ वेगाने करण्यास मदत करतात.
४. लवंग :- लवंग स्कॅल्पमधील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात.
Web Summary : Bay leaf hair serum combats dandruff and boosts hair growth. This homemade remedy, enriched with bay leaves, fenugreek, and cloves, strengthens roots and adds shine. Use 2-3 times weekly for best results.
Web Summary : तेज़ पत्ता हेयर सीरम रूसी से लड़ता है और बालों के विकास को बढ़ावा देता है। यह घरेलू उपाय, तेज पत्ता, मेथी और लौंग से भरपूर, जड़ों को मजबूत करता है और चमक लाता है। सर्वोत्तम परिणामों के लिए सप्ताह में 2-3 बार उपयोग करें।