Join us
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या सालांचा ‘असा’ हेअर मास्क लावा - केस चमकतील काचेसारखे - होतील गुडघ्यापर्यंत लांब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 17:44 IST

banana peel for hair growth remedy : banana peel hair mask for long hair : banana peel hair pack for shiny hair : केस लांबसडक, घनदाट आणि चमकदार करण्यासाठी केळीच्या सालींचा घरगुती उपाय...

आपले केस काळेभोर, घनदाट, लांबसडक आणि तितकेच सुंदर व आकर्षक असावेत अशी प्रत्येकीचीची इच्छा असते. परंतु केसांच्या अनेक समस्या आपल्याला वरचेवर सगळ्यांनाच असतात. केसगळती, केसांत कोंडा होणे, केसांची वाढ खुंटणे अशा एक ना अनेक समस्या असतात. केसांच्या या अनेक समस्यांवर उपाय म्हणून केळ अत्यंत फायदेशीर ठरते. केळ्याच्या सालीला आपण शक्यतो कचरा समजून फेकून देतो, परंतु त्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी - ६ आणि बी - १२ सारखे पोषक घटक भरपूर प्रमाणांत असतात. केसांच्या मुळांना पोषण देऊन ते लांबसडक, घनदाट आणि रेशमी करण्यासाठी केळ्याच्या सालीचा हेअर मास्क हा सर्वात स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय आहे(banana peel for hair growth remedy).

केळ्याच्या सालीमध्ये फक्त पोटॅशियमच नाही, तर सिलिका आणि नैसर्गिक तेल असते, जे केसांच्या आतपर्यंत जाऊन त्यांना ओलावा पोहोचवते. जेव्हा या सालींचा वापर विशिष्ट पद्धतीने हेअर मास्क म्हणून केला जातो, तेव्हा केसांच्या अर्ध्या अधिक समस्यांचे प्रमाण कमी होते. केसांना मुळापासून मजबुती देऊन ते गुडघ्यापर्यंत लांबसडक, घनदाट आणि आरशासारखे चमकदार करण्याचा सर्वात स्वस्त आणि घरगुती उपाय नेमका काय आहे ते पाहूयात. केळ्याच्या सालीपासून हेअर मास्क (banana peel hair mask for long hair) कसा तयार करायचा आणि केसांचे सौंदर्य कसे खुलवायचे याचं सिक्रेट... 

केसांसाठी केळ्याच्या सालीचा हेअर मास्क तयार कसा करायचा... 

केसांसाठी केळ्याच्या सालीचा हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला केळीच्या सालींची पावडर, १ टेबलस्पून मध, १ टेबलस्पून दही इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. केळीच्या सालीची पावडर नसली तरी आपण ताज्या सालींचा देखील वापर करू शकता. 

केसांसाठी हेअर मास्क कसा करायचा ? 

सर्वात आधी केळ्याच्या काही साली घ्या. आता या साली ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये २१० डिग्रीवर २० मिनिटांपर्यंत ठेवा. जेव्हा तुम्ही त्या बाहेर काढाल तेव्हा त्या पूर्णपणे सुकलेल्या असतील आणि हाताने क्रश (बारीक) होऊ लागतील. आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर गाळणीने गाळून घ्या, जेणेकरून त्यातील मोठे कण निघून जातील. किंवा केळीच्या सालीची पावडर नसेल तर आपण ताज्या सालींचा देखील वापर करु शकतो. सर्वात आधी केळ्याच्या सालींचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये दही आणि मध मिसळून पुन्हा एकदा फिरवून घ्या, जेणेकरून एक मऊ मिश्रण तयार होईल. आता हा तयार मास्क एका वाटीत काढून घ्या.

आप्पेपात्रात घाला चमचाभर हळद आणि चहा, ‘असा’ हेअर डाय करतो ५ मिनिटांत केस काळेभोर...

हा हेअर मास्क वापरण्याची योग्य पद्धत... 

केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत हा मास्क व्यवस्थित लावा. साधारण ३० ते ४० मिनिटे हा मास्क केसांवर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आणि सौम्य शाम्पूने  केस स्वच्छ धुवून घ्यावेत. 

रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

हा हेअर मास्क लावण्याचे फायदे... 

१. केळ्याच्या सालीतील अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना मजबूत करतात.

२. केळ्याचा हेअर मास्क केसांसाठी नैसर्गिक 'कंडिशनर'चे काम करतो, ज्यामुळे केस आरशासारखे चमकतात. 

३. दह्यासोबत वापरल्यामुळे डोक्यातील कोंडा आणि खाज कमी होण्यास मदत होते.

४. यातील पोषक घटकांमुळे केस मुळापासून वेगाने वाढतात आणि घनदाट दिसू लागतात.

५. केळ्याच्या सालीमध्ये नैसर्गिक सिलिका असते, जी केसांमधील 'कोलेजन' वाढवण्यास मदत करते. यामुळे केसांची वाढ प्रचंड वेगाने होते आणि केस गुडघ्यापर्यंत लांबसडक होण्यास मदत होते.

६. या सालींमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे केसांच्या मुळांना आतून मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Banana peel hair mask: Get shiny, long hair naturally.

Web Summary : Banana peel hair masks promote hair growth and shine. Rich in nutrients, they strengthen roots, reduce dandruff with added yogurt, and boost collagen for longer, thicker hair. A cost-effective, natural remedy.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी