Join us

दिवाळीपूर्वी केसांना लावा स्पेशल हेअर मास्क! रुक्ष, निस्तेज केसांवर येईल चमक - पार्लरची ट्रिटमेंटही फिकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2025 16:22 IST

banana hair mask recipe : ayurvedic hair care tips : silky & smooth hair naturally : दिवाळीत केसांना तो 'शायनी लूक' देण्यासाठी, घरगुती पदार्थांपासून हेअर मास्क कसा तयार करायचा ते पाहा...

दिवाळीच्या सणाला अवघे काहीच दिवस बाकी आहेत, आणि सणाच्या धामधुमीत सगळं काही अगदी परफेक्ट दिसायला हवं! नवीन कपडे, मेकअप लूक तर असतोच, पण केसांची नैसर्गिक चमक देखील तितकीच महत्त्वाची असते. दिवाळीचा सण जवळ आला की आपल्यापैकी प्रत्येकजण डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला सुंदर दिसण्याची तयारी करतो. आपला खास फेस्टिव्ह लूक सुंदर दिसावा यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन केसांवर अनेक हेअर ट्रिटमेंट्स करुन घेतो. परंतु या सणासुदीच्या घाईगडबडीत जर तुम्हाला पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर आपण चमकदार केसांसाठी एक खास घरगुती उपाय नक्की करु शकतो(silky & smooth hair naturally)

घरात उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन घरच्याघरीच केसांची नैसर्गिक चमक पुन्हा आणू शकतो. हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला फारसा खर्च आणि मेहेनत देखील करावी लागणार नाही. घरच्याघरी नैसर्गिक पदार्थ वापरून हेअर मास्क तयार केला, तर केसांना  अप्रतिम चमक, मऊपणा आणि पोषण देणं होईल अगदी सोपं... हा घरगुती स्पेशल हेअर मास्क तुमच्या केसांना पोषण देईल आणि दिवाळीच्या दिव्यांसारखी नैसर्गिक, निरोगी चमक आणण्यास (banana hair mask recipe) मदत करेल. मग, यंदाच्या दिवाळीला तुमच्या केसांना तो 'शायनी लूक' देण्यासाठी, घरगुती पदार्थांपासून हेअर मास्क कसा तयार करायचा ते  पाहूयात...  

पार्लरमध्ये केसांना ट्रीटमेंट घेण्यासाठी चांगलेच पैसे खर्च करावे लागतात. मात्र, आपण घरगुती सोपे उपाय करूनही केसांना नैसर्गिक चमकदारपणा देऊ शकतो. ज्यामुळे केसांना खूप फायदा होईल आणि तुमचे वेगळे पैसेही खर्च होणार नाहीत. केसांना चमक आणण्यासाठीच्या घरगुती उपायाची माहिती आयुर्वेदिक डॉक्टर शोभना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये दिली आहे.

हेअर मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य... 

१. पिकलेलं केळं - १२. पाणी - २ ते ३ टेबलस्पून ३. खोबरेल तेल - ३ ते ४ टेबलस्पून ४. व्हिटॅमिन ई कॅप्सूल - ३ ते ४ कॅप्सूल

केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...  

हेअर मास्क कसा तयार करावा ? 

सर्वातआधी एक केळ सोलून घ्याया आणि त्यात थोडे पाणी घालून ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्या. आता या केळ्याच्या पेस्टमध्ये खोबरेल तेल  आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकून ते चांगले मिसळून घ्या. तुमचा होममेड हेअर मास्क तयार आहे! ही तयार पेस्ट केसांना कमीतकमी ४० मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर, सौम्य शाम्पू वापरून केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी, हा उपाय आठवड्यातून एकदा नक्की करा.

महागड्या फेशियलशिवाय चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो! जावेद हबीब सांगतात खास फेसपॅक - दिवाळीचं तेज दिसेल चेहऱ्यावर...

हा हेअर मास्क केसांवर लावण्याचे फायदे... 

१. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांच्या मुळांपर्यंत खोलवर जाऊन पोषण देते. यामुळे केस कोरडे होण्यापासून वाचतात, त्यांची चमक वाढते आणि तुटणे कमी होते.

२. केळं :- केळ्यामध्ये असलेले नैसर्गिक तेल, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे केसांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवतात. यामुळे केस मऊ, रेशमी होतात. 

३. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल :- हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे केसांच्या वाढीस मदत करते आणि केसांच्या मुळांना मजबूती देते. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते आणि केसांना नैसर्गिक, निरोगी चमक येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Special Hair Mask: Shine Naturally, Skip the Parlor!

Web Summary : Get shiny, smooth hair for Diwali with a homemade banana hair mask. This easy recipe uses banana, coconut oil, and vitamin E for nourished, radiant hair. Skip expensive salon treatments!
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय