केसगळती, केसांचा कोरडेपणा आणि केसांची चमक कमी होणे ही समस्या अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. (Hair care) अशावेळी घरच्या घरी, रासायनिक पदार्थ न वापरता केळीपासून तयार केलेला नैसर्गिक हेअर मास्क अतिशय फायदेशीर ठरतो.(Hair mask for dry hair) आपल्यापैकी अनेकांच्या घरात केळी सहज पाहायला मिळते. परंतु, ४ ते ५ दिवसानंतर ही केळी अधिक पिकते किंवा काळी पडू लागते. अशावेळी फेकण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. (Home remedy for damaged hair)
केळ्यामध्ये पोटॅशियम, नैसर्गिक तेलं, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी६, सी यांसारखी पोषणमूल्यं असतात. जी आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करतात.(Moisturizing hair mask) पिकलेली केळी फेकण्याऐवजी जर त्याचा मास्क केसांना लावल्यास ते सॉफ्ट आणि चमकण्यास मदत होतील.(Banana hair mask) हा मास्क केसांना मऊपणा देतो, तसेच पोषणही केसांना मिळते. केसातील कोरडेपणा देखील दूर होतो. हा हेअर मास्क कसा बनवायचा पाहूया.
नॅचरल समजून केसांना मेहंदी लावताय? या चुकांमुळे पडू शकते टक्कल - वाढते केसगळतीची समस्या..
केळीचा मास्क तयार करण्यासाठी एक पिकलेली केळी घ्यावी आणि चांगली मॅश करून त्यात १ चमचा मध आणि १ चमचा नारळाचं तेल किंवा बदाम तेल मिसळावं. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावावं आणि ३० मिनिटांसाठी राहू द्यावं. नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवावेत.
केळीमुळे केसातील गुंता सहज निघतो. तसेच केसांना चांगले मॉइश्चरायझर मिळते ज्यामुळे केस अधिक मजबूत होतात. दही आपल्या टाळूला आराम देते. ज्यामुळे टाळूला जळजळ होणे, खाज सुटणे यांसारख्या समस्या कमी होतात. जर आपल्या डोक्यात कोंड्याची समस्या असेल तर ही समस्या देखील टाळता येते.
मध हे केसांसाठी मॉइश्चरायझर आहे. जे केसातील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच खोबऱ्याच्या किंवा बदामाच्या तेलाने केसांना चमक मिळते. स्काल्पचा कोरडेपणा कमी होतो. यामुळे केसातील कोंडाही कमी होईल. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावल्याने केसगळती तर थांबेल पण केस मऊ आणि चमकण्यास मदत होईल.