Lokmat Sakhi >Beauty > केस गळणं थांबेना? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात रोज 'ही' पावडर चिमूटभर खा, ८ दिवसांतच केस गळणं कमी  

केस गळणं थांबेना? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात रोज 'ही' पावडर चिमूटभर खा, ८ दिवसांतच केस गळणं कमी  

Ayurvedic Remedies For Controlling Hair Loss: केस गळणं काही केल्या कमी होत नसेल तर आता हा एक घरगुती उपाय करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 12:11 PM2024-05-24T12:11:01+5:302024-05-24T12:11:49+5:30

Ayurvedic Remedies For Controlling Hair Loss: केस गळणं काही केल्या कमी होत नसेल तर आता हा एक घरगुती उपाय करून पाहा...

ayurvedic remedies for controlling hair loss, how to stop hair fall, best ayurvedic solution for thick and strong hair | केस गळणं थांबेना? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात रोज 'ही' पावडर चिमूटभर खा, ८ दिवसांतच केस गळणं कमी  

केस गळणं थांबेना? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात रोज 'ही' पावडर चिमूटभर खा, ८ दिवसांतच केस गळणं कमी  

Highlightsआता केसांना नैसर्गिक पद्धतीने मजबूत करण्यासाठी हा एक आयुर्वेदिक उपाय करून पाहा.

केस गळण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कोणाचे केस खूप गळत आहेत, तर कोणाच्या केसांना मुळीच वाढ नाही. या समस्यांचे मुख्य कारण तुमच्या आहारात आहे. सध्या आपल्या प्रत्येकाचीच जीवनशैली एवढी बदलली आहे की त्यामुळे आपल्याला पुरेसं पोषण मिळत नाही. म्हणूनच अपुऱ्या पोषणामुळे केसांशी संबंधित समस्या वाढल्या आहेत. केस गळणं कमी करण्यासाठी आपण वरवरचे उपाय करतो. पण त्यातून केसांना पुरेसं पोषण मिळत नाही. म्हणूनच आता केसांना नैसर्गिक पद्धतीने मजबूत करण्यासाठी हा एक आयुर्वेदिक उपाय करून पाहा (how to stop hair fall). हा उपाय केल्याने अगदी काही दिवसांतच केस गळणं कमी झाल्याचं दिसून येईल. (best ayurvedic solution for thick and strong hair)

 

केस गळणं कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

केस गळणं कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीची माहिती आयुर्वेद तज्ज्ञांनी  या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

रस काढून लिंबू फेकू नका- डासांना पळवून लावण्यापासून ते घराच्या स्वच्छतेपर्यंत ५ कामांसाठी वापरा...

यामध्ये त्यांनी ३ असे पदार्थ सांगितले आहेत जे केसांना आतून पोषण देतात आणि त्यामुळे केस नैसर्गिक पद्धतीने मजबूत होतात. केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते आणि त्यामुळे ते दाट आणि लांब होतात. 

त्या ३ पदार्थांपैकी पहिला पदार्थ आहे आवळ्याची पावडर, दुसरा पदार्थ आहे किसलेलं खोबरं आणि तिसरा पदार्थ आहे खडीसाखर. आता हे पदार्थ वापरून नेमका काय उपाय करायचा ते पाहा...

 

सगळ्यात आधी तर आवळा पावडर, किसलेलं खोबरं, खडीसाखर हे तिन्ही पदार्थ सम प्रमाणात एकत्र करून हे मिश्रण एखाद्या बरणीमध्ये करून ठेवा.

कडिपत्ता चांगला वाढतच नाही? ४ सोपे घरगुती उपाय, काही दिवसांतच होईल डेरेदार- हिरवागार...

दररोज सकाळी या मिश्रणाची एक चिमूट खा आणि त्यावर पाणी प्या. किंवा हे मिश्रण ग्लासभर पाण्यात टाकून ते पाणी पिऊन घ्या. हा उपाय नियमितपणे केल्यास अगदी ८ दिवसांतच केस गळणं कमी झाल्याचं जाणवेल.

काही आठवडे हा उपाय नियमितपणे केल्यास केस गळणं तर कमी होईलच पण केसांची वाढही जोमाने होऊ लागेल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

Web Title: ayurvedic remedies for controlling hair loss, how to stop hair fall, best ayurvedic solution for thick and strong hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.